सावित्री उत्सव 2021 घरकामगार महिलांनी उत्स्फूर्तपणे साजरा केला.सावित्रीमाई मुळे शिक्षण घेऊन लाखोंचे पॅकेज घेणाऱ्या मुली,महिलांना घर आणि ऑफिस मध्ये मान सन्मान मिळत आहे.हे त्या विसरतात. त्यांना सावित्रीमाईला एक दिवस आठवण करून मानवंदना द्यावी आणि ऋण मान्य करावे असे वाटत नाही. म्हणूनच कदाचित शासनाने सावित्री उत्सवाची जबाबदारी असंघटित अंगणवाडी सेविकांना दिली असावी, ऑफिसमध्ये नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालून त्यांना मिरवण्यास वेळ असतो.
पण सावित्रीमाईच्या फोटो जवळ उभे राहण्यासाठी वेळ नाही. ही जाणीव असंघटित घर कामगार महिलांनी ठेऊन त्यांनी एकत्र येऊन सावित्रीमाईस अभिवादन केले. सत्यशोधक घरकामगार संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष भारती फडणीस यांनी ठाणे,दिवा,डोंबिवली कल्याण येथील प्रमुख संघटक महिलांना एकत्र करून प्रथमच सावित्री उत्सव सदगुरु नगर दिवा येथे उत्स्फूर्तपणे साजरा केला.
सत्यशोधक घरकामगार संघटनेच्या वतीने दरवर्षी घर कामगार महिलांना संघटित करून
त्यांचे वैचारिक प्रबोधन करणार असे सुनीता सातपुते राज्य महासचिव
सत्यशोधक घरकामगार संघटना यांनी सावित्री उत्सव निमित्ताने महिला समोर बोलतांना सांगितले.
मुलगी शिकली प्रगती झाली असे म्हणतात, पण ती कोणामुळे शिकली
हे जर शिकलेल्या मुलींना महिलांना समजत नसेल तर आम्ही असंघटित अशिक्षित असुरक्षित घर कामगार महिला
शंभर टक्के जागृत आहोत असे भारती फडणीस अध्यक्ष
सत्यशोधक घरकामगार संघटना ठाणे जिल्हा यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना सांगितले.
यावेळी अनिता बाल्हे,वैजयंती साळवी,सुहासिनी गोनबरे, रेश्मा परब,
सुवर्णा फाटक,मनीषा बेनेरे,मनस्वी जाधव, इत्यादी महिला संघटकासह घर कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)