अहमदाबाद: जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावावर.अहमदाबाद येथील ‘सरदार पटेल स्टेडियम’ डागडुजी नंतर मोदींच्या नावाने नामकरण केल्याने आता नव्या वादाला तोंड द्यावे लागत आहे.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बुधवारी दुपारी नव्याने बांधलेल्या स्टेडियमचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते.
Refurbished Sardar Patel stadium in Ahmedabad renamed after PM as Narendra Modi stadium
‘मोतेरा’ म्हणून ओळखले जाणारे हे स्टेडियम आतापर्यंत ‘सरदार पटेल स्टेडियम’ म्हणून ओळखले जात असे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कोरोना चे सावट असताना याच स्टेडियममध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यावेळी भारत भेट दिली होती.
आतापर्यंत सरदार पटेल स्टेडियम म्हणून ओळखल्या जाणा या स्टेडियमचे उद्घाटन होण्याच्या वेळेअगोदरच नाव बदलण्यात आले आहे.जगातील हे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आता नरेंद्र मोदी स्टेडियम म्हणून ओळखले जाईल.या स्टेडियमची प्रेक्षकांची क्षमता एक लाख 10 हजार आहे. जगातील कोणत्याही क्रिकेट स्टेडियममध्ये प्रेक्षकांची क्षमता इतकी नाही.
नाव बदलल्या नंतर विरोध सुरू झाला
सरदार पटेल यांचे नाव बदलल्याने कॉँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी यावर आक्षेप नोंदवत
हा सरदार पटेल यांचा अपमान नाही का असा रोकडा प्रश्न विचारला आहे.
गुजरातची जनता हा अपमान सहन करणार नाही,असेही ते म्हणाले आहेत.
सरदार वल्लभभाई पटेल अनुसुचित जातीजमातींच्या आरक्षणाचे विरोधक
बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहामुळे आणि महात्मा गांधींच्या पाठींब्यामुळे अनुसुचित जाती व जमातींना राज्यघटनेने आरक्षण दिलेले होते. गांधींजींची हिंदुत्ववादी नथुराम गोडसेने ३० जानेवारी १९४८ ला हत्त्या करताच काँग्रेसमधल्या सनातनी गटाने आरक्षणविरोधी उसळी घेतली. त्यांचे नेते होते वल्लभभाई पटेल. पटेल यांचा हिंदुत्ववाद्यांना पुळका असतो, त्याची जी अनेक कारणे आहेत त्यातले मुख्य कारण पटेल आरक्षणविरोधी होते हे होय. गांधीहत्त्येच्या अवघ्या २५ व्या दिवशी पटेलांनी आरक्षणविरोधकांची बैठक बोलावली आणि आरक्षण काढून घेण्याचे डावपेच आखायला सुरुवात केली. पटेल घटना परिषदेच्या अल्पसंख्यांक उपसमितीचे अध्यक्ष होते.
सरदार वल्लभभाई पटेल अनुसुचित जातीजमातींच्या आरक्षणाचे विरोधक
महाश्वेता देवी, शोषित-उत्पीडित वंचिताच्या वेदनेचा आवाज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on February 24, 2021 14:05 pm
Web Title: Sardar Patel cricket stadium has been renamed as a narendra modi stadium in Ahmedabad