मुंबई: ईडी ने मोठी कारवाई करत मनी लाँड्रिंग विरोधी कायद्याअंतर्गत शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित अलिबागमधील आठ जमीनी आणि मुंबईतील दादर उपनगरातील एक फ्लॅट जप्त केला आहे, असे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.मुंबईतील एक हजार 34 कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना ईडीनं काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. (Sanjay Raut Property Seize by ED) याच पार्श्वभूमीवर ईडीनं कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.या कारवाईमुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या आर्थिक हितसंबंधांच्या दृष्टीने कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे.या अनुषंगाने महाविकास आघाडीचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. तपास यंत्रणांच्या राजकीय वापरावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वारंवार खटके उडत असल्याचं पाहायला मिळालं होतं. केंद्रात सत्ता असलेलं भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन बिगर भाजपशासित राज्यांमधील इतर पक्षांच्या नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप महाराष्ट्रातील नेत्यांकडून केला जात होता. यामध्ये प्रामुख्यानं एक नाव आघाडीवर होतं, ते म्हणजे संजय राऊत.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
संजय राऊत म्हणाले, आमचं कष्टाचं राहतं घर जप्त केले आहे. लहानशी जमीन आहे.त्यावर भाजपचे नाचे आता नाचतायत फटाके वाजवत आहेत. ते जो शब्द वापरत आहेत.मनी लॉन्डरिंग त्यातला एक रुपया जरी मी किंवा माझ्या पत्नीने वापरला असेल तर सगळी संपत्ती भारतीय जनता पक्षाच्या खात्यावर जमा करायला मी तयार आहे.हे भिकारी लोक आहेत.मराठी माणसाचे हक्काचे राहते घर जप्त केल्याबद्दल. आनंद आहे. असेच करत राहिले पाहिजे. यातून लढण्याची अजून प्रेरणा मिळते. असत्यमेव जयते!!, असे ट्विट त्यांनी केले आहे.
माध्यमांना प्रतिक्रिया देताना पत्रकारांनी किरीट सोमय्या यांचे (Kirit Somaiya) नाव घेतले असता तर राऊत चांगलेच संतापले.
राऊत म्हणाले, किरीट सोमय्या चु… आहे, महाराष्ट्रद्वेष्टा आहे. जो माणूस मराठीच्या विरोधात कोर्टात जातो. महाराष्ट्र द्रोही आहे. त्याच्याबद्दल काय प्रश्न विचारता तुम्ही असं बोलत राऊतांनी शेलक्या शब्दात भाजपावर टीकास्त्र सोडलं. कष्टाने कमवलेली संपत्ती ईडीने जप्त केली. १ रुपयाही अवैध मार्गाने जमा झाला असेल तर सगळी संपत्ती भाजपाला दान करू. ५५ लाखांचे कर्ज होते हे प्रतिज्ञापत्रात सांगितले होते. ईडीच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी आम्ही खंबीर आहोत. जप्त केलेल्या फ्लॅटमध्ये माझं कुटुंब राहतं. संपत्तीची व्याख्या बदलावी लागेल. तुमच्या बापाला घाबरत नाही असंही राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी शिवसेना भवनात जाहीर पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते
किरीट सोमय्यांना फैलावर घेतलं होतं. किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्यावर त्यांनी निशाणा साधला होता.
तसेच, संजय राऊतांनी भाजप नेत्यांसोबतच थेट ईडी अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याचा घणाघाती आरोप केला होता.
“ईडीचे मोठे अधिकारी भाजपाच्या तिकिटावर निवडणुक लढवत आहेत. ईडी भाजपाची एटीएम मशीन बनली आहे.
त्यांच्या खंडणीबाबत संपूर्ण यादी मी पंतप्रधान कार्यालयात दिली आहे. मी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात तुमचे स्वच्छ भारत अभियान हे कचरा साफ करण्याचे नसून भ्रष्ट्राचार ही नष्ट करण्यासाठी तुमचा जयजयकार होत आहे असे म्हटले आहे. तुमचे विरोधक असणाऱ्यांच्या मागे तुम्ही ईडीची कारवाई लावली आहे. मी पंतप्रधानांना एका भागाचीच माहिती दिली आहे. अशा दहा भागांची माहिती मी त्यांना देणार आहे,” असे राऊत त्यावेळी म्हणाले होते.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
अमित ठाकरे याना हनुमान चालीसा म्हणायला सांगा – सुजात आंबेडकर
आर्यन खान:समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्या साक्षीदाराचा मृत्यू
द काश्मिर फाईल्स:भाजप देशाचे वातावरण बिघडवत आहे:शरद पवार
Bank frauds in india मागील सात वर्षात सर्वात मोठा घोटाळा
प्रधानमंत्री मोदी यांचे कौतुक केल्यानंतर राष्ट्रवादी च्या नेत्यांचा यु-टर्न
काश्मीर फाईल्स:तेव्हा कुणीही अश्रू देखील ढाळले नाहीत-उद्धव ठाकरे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on APR 05, 2022 16:35 PM
WebTitle – Sanjay Raut’s property confiscated from ED