ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी यापेक्षा चांगली सुरुवात काय असू शकते? कोरोना जागतिक महामारीच्या प्रभावाने एक वर्ष उशिरा सुरू झालेल्या आँलिम्पिकच्या,पहिल्याच दिवशी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले – तेही वेटलिफ्टिंगमध्ये 26 वर्षीय सैखोम मीराबाई चानू मणिपूरच्या महिला खेळाडूने.आँलिम्पिकच्या कामगिरीविषयी खेळाडू आणि देश उपहास टीकेचे कारण बनले आहे कारण ऑलिम्पिक पदक मिळवण्याच्या बाबतीत देश जगात लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकावर असूनही 121 वर्षांच्या ऑलिम्पिक क्रीडा प्रवासात भारतासाठी हे फक्त 17 वे वैयक्तिक पदक आहे आणि महिलांच्या वेटलिफ्टिंग मधील एकूण दुसरे पदक आहे.

हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की वैयक्तिक स्पर्धेत नॉर्मन पिचर्ड, राज्यवर्धन राठोड, सुशील कुमार, विजय कुमार आणि पीव्ही सिंधू नंतर ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताचे हे एकूण सहावे रौप्य पदक आहे.या पदकांसाठी खडतर मेहनत आणि चिकाटी यांना खूप महत्त्व असते.
महिला वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी पहिले पदक 21 वर्षांपूर्वी 2000 सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने जिंकले होते.त्यानंतरच पहिल्यांदा ऑलिम्पिकमधील वेटलिफ्टिंग स्पर्धा महिलांसाठी खुली करण्यात आली.कर्णम यांनी त्यावेळी 69 किलो गटात कांस्य पदक जिंकून भारताचा गौरव केला होता,आता चानूने 49 किलो गटात रौप्य पदक जिंकून देशाला अभिमान दिला आहे.
मणिपूरच्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेली सैखोम मीराबाई चानू ही असामान्य प्रतिभा अन जिद्दअसलेली खेळाडू आहे.तिचे तिरंदाज बनण्याचे स्वप्न होते, पण जेव्हा तिने तिच्या सहाव्या इयत्तेच्या पुस्तकात कुंजुराणी या महिला वेट लिफ्टरबद्दल वाचले तेव्हा तिने ठरवले की त्याच खेळात प्राविण्य मिळवून देशाला पदक मिळवून द्यायचे.खेळाच्या मैदानात – तेही वेटलिफ्टिंगमध्ये, करिष्मा दाखवण्याचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता खुप कष्ट करावे लागले.12 वर्षीय चानूला सरावासाठी ट्रकमध्ये सुमारे 40 किलोमीटरचा प्रवास करावा लागत असे.
कौटुंबिक पार्श्वभूमी
कौटुंबिक परिस्थिती सामान्य होती, पण चानूचा उद्देश अन हेतू आणि तिच्या वरील कुटुंबाचा विश्वास नक्कीच विलक्षण होता.
जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास असतो आणि तुमचा हेतू अटळ असतो,
तेव्हा कोणतेही ध्येय अशक्य राहत नाही.या छोट्या उंचीच्या चानूने ते सिद्ध केले.
त्या दिवसांत माजी आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर,प्रशिक्षक अनिता यांची नजर चानू यांच्यावर पडली.पहिल्यांदा वजन उचलल्यानंतर त्यांनी पाहिले की या मुलीमध्ये काही करिष्मा करून दाखवण्याची ताकद आहे.मणिपूर ते टोकियो हा प्रवास प्रत्यक्षात मीराच्या समर्पण आणि मेहनतीची कथा आहे.
2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये चानूची स्वप्ने भंग झाली असली तरी
पाच वर्षांच्या आत तिने स्वतःचे आणि देशाचे नाव खेळांच्या या महामेळाव्यात आपलं नाव कोरलं.
2016 मध्ये, चानूने वरिष्ठ महिला राष्ट्रीय वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि त्यानंतर पुढच्या वर्षी जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.
या कामगिरीसाठी, तिला राजीव गांधी खेलरत्न आणि नंतर 2018 मध्ये पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले.
त्याच वर्षी, चानूने वरिष्ठ महिला राष्ट्रीय वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले

इतकेच नव्हे तर स्वतःसाठी आणि देशासाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
या वर्षी, कोरोनाच्या सावलीत, फिटनेस समस्यांशी झुंज देत असूनही, चानूने ताश्कंद येथे झालेल्या आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये
क्लीन अँन्ड जर्कमध्ये 119 किलो वजन उचलून टोकियो ऑलिम्पिकसाठी आपली दावेदारी केली व नवीन विश्वविक्रम केला.
नॅशनल चॅम्पियनशिप ते ऑलिम्पिक हा पाच वर्षांचा प्रवास केवळ चानूच्या समर्पणाची आणि मेहनतीची कहाणी नाही,
तर देशातील मुलींसाठी विशेषतः मणिपूरसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे.
जिथून वेटलिफ्टिंगमध्ये चांगली प्रतिभां उदयास येत आहे.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 07, 2021 11:30 AM
WebTitle – Saikhom Mirabai Chanu Tokyo ; History of the Olympics