Russia Ukraine Crisis Live:गेले अनेक दिवस युद्धाचे सावट केवळ रशिया आणि युक्रेन दोन देशांवर नाही तर संपूर्ण जगावरच दाटून आलेले आणि आज अखेर युद्ध सुरु झाल्याची अधिकृत घोषणा करत रशियाने युक्रेन वर हल्ला केला.रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की युक्रेनचे हवाई तळ आणि लष्करी बेस उध्वस्त करण्यात आले आहेत, IFX वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार. युक्रेनच्या लष्कराने सांगितले की, लुहान्स्क प्रदेशात रशियाची पाच विमाने आणि एक रशियन हेलिकॉप्टर पाडण्यात आले, अशी माहिती रॉयटर्सने दिली.अमेरिका एक्शन मोडमध्ये आली अमेरिकेने रशियावरील निर्बंध आणखी कडक करत संयुक्त राष्ट्रांची तातडीची बैठक बोलावली आहे.
रशिया युक्रेन युद्ध
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी पहाटे युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा केली. पुतिन बोलत असताना, कीव, खार्किव आणि युक्रेनच्या इतर भागात मोठे स्फोट ऐकू आले. नंतर, कीवमध्ये एअर सायरन वाजले, आणि शहरावर हल्ला सुरु झाला.युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी देशात मार्शल लॉ घोषित केला आणि सांगितले की रशियाने युक्रेनियन पायाभूत सुविधांवर आणि देशाच्या सीमा रक्षकांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून, रशिया-युक्रेन सीमेवर रशियन लष्करी सैन्य मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. पुतिन यांनी युक्रेनमधील दोन फुटीरतावादी प्रदेशांना स्वतंत्र म्हणून मान्यता दिल्यानंतर आणि त्यांना शांतीरक्षक म्हणून तैनात करण्याचे आदेश दिल्यानंतर दोन देशात तणाव वाढला होता.
युक्रेनच्या अध्यक्षांनी मदतीसाठी केला ज्यो बायडेन याना फोन
दरम्यान , रशियाने हल्ला केल्यांनतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन याना रात्री फोन करून मदत मागितली आहे.यासंदर्भात ज्यो बायडेन यांनी ट्विट करून सांगितलं की “युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आज रात्री माझ्याशी संपर्क साधला.मी रशियन लष्करी सैन्याने केलेल्या या अन्यायकारक हल्ल्याचा निषेध करतो. मी युक्रेनच्या अध्यक्षांना आज रात्री UN सुरक्षा परिषदेत आंतरराष्ट्रीय निषेध करण्यासाठी आम्ही उचलत असलेल्या पावलांची माहिती दिली.”
“त्यांनी मला जगातील इतर नेत्यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या या आक्रमकतेविरुद्ध स्पष्टपणे बोलण्यासाठी आणि युक्रेनच्या लोकांच्या पाठीशी उभे राहण्यास सांगितले.उद्या, मी G7 च्या नेत्यांना भेटणार आहे आणि युनायटेड स्टेट्स आणि आमचे मित्र राष्ट्र आणि भागीदार रशियावर कठोर निर्बंध लादणार आहेत.आम्ही युक्रेन आणि युक्रेनच्या लोकांना पाठिंबा आणि मदत देत राहू.”असं ज्यो बायडेन यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.
वाचकांना आम्ही सांगू इच्छितो की हे तिसरे महायुद्ध सुरु झाले आहे.हे किती मोठे होईल हे आताच सांगणे कठीण आहे,
ते येत्या काळात स्पष्ट होईलच.पण यात आणखी किती देश भरडले जातील हेही पाहावे लागणार आहे,
यासोबतच भारताचे शेजारी देश यावेळी काय भूमिका घेत आहेत हेही पाहणे गरजेचे आहे.
चीन ने फोडले अमेरिकेवर खापर
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी
युक्रेन-रशियाच्या सध्या निर्माण झालेल्या संकटासाठी अमेरिकेला जबाबदार धरले.
“जेव्हा अमेरिकेने नाटोच्या विस्ताराच्या दृष्टीने पूर्वेकडे रशियाच्या दारापर्यंत गेले,
तेव्हा एका मोठ्या देशाला भिंतीवर ढकलण्याच्या परिणामांचा विचार केला होता का?” असं चीनने म्हटलं आहे.
पाकिस्तान चे प्रधानमंत्री रशियाला जाऊन भेटले
युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान हे रशियाच्या भेटीस गेले आहेत.रशियाला रवाना होण्यापूर्वी इम्रान खान म्हणाले की, माझा लष्करी संघर्षावर विश्वास नाही. माझा विश्वास आहे की सुसंस्कृत समाज संवादातून वाद सोडवतात आणि लष्करी संघर्षावर विश्वास ठेवणाऱ्या देशांनी इतिहासाचा नीट अभ्यास केलेला नाही. मला खात्री आहे की रशिया आणि युक्रेनच्या लोकांना लोकांना युद्ध आणि संघर्षाच्या परिणामांची जाणीव आहे.”
थरूर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या रशियाच्या दौऱ्यावर टीका केली आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे उदाहरण दिले,
ज्यांनी 1979 मध्ये तत्कालीन परराष्ट्र मंत्री म्हणून बीजिंगने व्हिएतनामवर हल्ला केला तेव्हा चीनचा दौरा कमी केला होता.
रशिया आणि युक्रेन मध्ये सुरु झालेल्या युद्ध जन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांना त्यांच्या रशिया दौऱ्याबाबत सल्ला दिला आहे. रशियाने युक्रेनवर नव्याने केलेल्या हल्ल्याबाबत आम्ही आमची भूमिका पाकिस्तानला कळवली आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.
शेअर बाजार कोसळला
रशियाने युद्धाची घोषणा करताच जगभरातील शेअर बाजार कोसळताना दिसून आले.गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारावर युद्धाचे सावट असल्याने गुतंवणूकदारांनी विक्रमी विक्री करत आपले पैसे काढून घेण्यास सुरुवात केली.या विक्रीमुळे सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला. Sensex down 1200 points : शेअर बाजारातील गुंतवणुकदारांसाठी आजचा दिवस निराशाजनक असल्याचे चित्र आहे. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला.
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनच्या डोनबास प्रदेशात लष्करी कारवाईची घोषणा केली असून,
इतर राष्ट्रांनी हस्तक्षेप केल्यास परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.
रशिया युक्रेन संघर्षामागील कारणे;आतापर्यंत काय घडले पहा अपडेट्स
Jhund film।झुंड चित्रपट,आंबेडकरांचे पोस्टर व्हायरल,पाहा रिलीज डेट
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिवजयंती च्या मिरवणुकीत सामील होतात
आंबेडकर आणि पेरियार यांचं भगत सिंग यांच्या बलिदानावर मत..
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 24, 2022 14:05 PM
WebTitle – Russia-Ukraine war latest update US convenes meeting in action mode