वारणानगर- बुधवार दि. १० मार्च २०२१ रोजी छ. सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या जयंती निमित्ताने महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने, प्रकाशन समिती, महाराष्ट्र राज्य, औरंगाबाद, समाजशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर आणि जनता दरबार यांच्या संयुक्त विद्यमाने “ग्रंथ आणि चित्र चरित्र प्रदर्शन” वारणा महाविद्यालयात पार पडले.
प्रदर्शनाचे उद्घाटन मा. प्र. प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांचे हस्ते झाले. प्रतिमा अभिवादन आणि उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे मा. प्रा. व्ही. जी. सावंत हे होते. यावेळी विभागप्रमुख प्रा. डॉ. दिनेश पाटील, प्रा. सातपुते, प्रा. मुजावर, प्रा. सत्यनारायण आरडे, मा. देवदत्त कदम, मा. सौरभ गायकवाड, मा. निलोफर मुजावर, डॉ. संतोष भोसले इत्यादी मान्यवर आणि अनेक जिज्ञासू विद्यार्थी उपस्थित होेते.
या प्रदर्शनामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा राज्यकारभार, त्यांचे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक विशेषतः ग्रंथ चळवळीवर प्रकाश टाकणारे सचित्र डिजिटल कटआऊट, सयाजीरावांची प्रकाशित चरीत्र खंड, त्यांच्या पत्रव्यवहाराचे खंड यांचा समावेश होता.
सयाजीराव गायकवाड महाराजांचे आयुष्यभराचे कार्य सर्वव्यापी करण्यासाठी डॉ. दिनेश पाटील
आणि त्यांची व्यासंगी टीम सातत्याने संशोधन, लेखन, व्याख्यान आयोजन आणि प्रचार आणि प्रसार करत आहे.
ही पुरोगामी महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखंड भारताच्या अभिमानाची बाब आहे.
लेखन – डॉ. संतोष भोसले, कोल्हापूर
सयाजीराव गायकवाड: आधुनिक भारतातील ‘शैक्षणिक क्रांती’चा दस्ताऐवज
हे ही वाचा.. संविधान का समजून घ्यायचे ?
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 13, 2021, 17:30 PM
WebTitle – revisiting sayajirao gaikwad sayajirao gaekwad