पुणे: गुढी पाडाव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची दादर,छत्रपती शिवाजी पार्क येथे सभा झाली.या सभेत त्यांनी मशिदीच्या भोंग्यासमोर मोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा म्हणा असे आवाहन मनसे कार्यकर्त्यांना केले होते.त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघाले आहे.मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न केला,त्यांना पोलिसांनी अटक केली.राज ठाकरेंच्या भूमिकेवरून पुण्यातील मनसे च्या मुस्लिम पदाधिका-यांमध्ये नाराजी पसरली.या पार्श्वभूमीवर मनसे मधील मुस्लिम कार्यकर्त्यांनी आता मनसे सोडण्याचा निर्णय घेतला.(MNS Muslim workers resign from Party)
पुण्यातील वॉर्ड क्रमांक 84 चे शाखाध्यक्ष माजीद शेख यांच्यासह अनेक मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी वसंत मोरे यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. येत्या काही दिवसात मनसेचे अनेक मुस्लीम पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. राज ठाकरे यांनी मुस्लीम समाजाविरोधातील केलेल्या भाषणामुळे मुस्लीम समाज नाराज झाला आहे . पूर्वी पक्षाची भूमिका वेगळी होती पक्षाची भूमिका बदलल्यामुळे आम्ही तर राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
मशिदींवर मोठ्या आवाजात भोंगे लावले, तर मी तिथे हनुमान चालीसा म्हणायला लावेन, मुंबईतील मशिदी आणि मदरशांमध्ये देशविरोधी कृत्ये सुरू आहेत. घातपाती कारवायांची भयानक कटकारस्थाने कशी सुरू आहेत, याची माहिती तुम्हाला पोलिस देतील. आपल्याला घातपाती कारवायांसाठी पाकिस्तानची गरजच नाही. या मशिदी आणि मदरशांमध्येच घातपाती कारवाया करणारे दडले आहेत. याविषयी माहिती मिळाली तर तुम्हाला धडकी भरेल,असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.
अमित ठाकरे याना हनुमान चालीसा म्हणायला सांगा – सुजात आंबेडकर
सुजात आंबेडकर यांची काल रविवारी मुंबईत भव्य रॅली आयोजित कऱण्यात आली होती.
तसेच आगामी निवडणुकांना केंद्रस्थानी ठेवून पहिली राजकीय सभा देखील आयोजित करण्यात आली होती.
यावेळी त्यांनी अनेक विषयावर आपलं मत मांडलं.यावेळी त्यांनी अमित ठाकरे यानी हनुमान चालीसा म्हणावा असे आव्हान दिले आहे.
माझा तुमच्या वक्तव्याला शंभर टक्के पाठिंबा आहे…फक्त एक गोष्ट आहे.. तिकडे अमित ठाकरेंना हनुमान चाळीसा म्हणायला लावा.. मला एकही बहुजन पोरगा नकोय तिकडे..जी कुणी जात आहेत तिकडे हनुमान चालीसा म्हणायला.. त्यांनी टीशर्ट काढून जानवं दाखवा आतमध्ये.. मग हनुमान चालीसा म्हणा..मला एकही एक बहुजन माणूस तिथे नकोय तिकडे.
राज साहेबांना ही कळकळीची विनंती..तुम्ही शरद पवारांचा इंटरव्हू घ्या…तुम्ही स्वतःचा उभा पक्ष भाड्यानं लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा..पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लिम दंगलीवर उभा नका करु, एवढी कळकळीची विनंती आहे आणि महाराष्ट्र ऑथोरीटी, मुंबई ऑथोरीटी, महाराष्ट्र मुंबई पोलीस, या सगळ्यांना एवढं आव्हान देतो..की तुमच्या सगळ्यांसमोर हे वक्तव्य केलंय त्यांनी! जर दंगल झाली, तर तुम्हाला माहितीये कुणाला पकडायचं..असं सुजात आंबेडकर म्हणाले.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
अमित ठाकरे याना हनुमान चालीसा म्हणायला सांगा – सुजात आंबेडकर
आर्यन खान:समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्या साक्षीदाराचा मृत्यू
द काश्मिर फाईल्स:भाजप देशाचे वातावरण बिघडवत आहे:शरद पवार
Bank frauds in india मागील सात वर्षात सर्वात मोठा घोटाळा
प्रधानमंत्री मोदी यांचे कौतुक केल्यानंतर राष्ट्रवादी च्या नेत्यांचा यु-टर्न
काश्मीर फाईल्स:तेव्हा कुणीही अश्रू देखील ढाळले नाहीत-उद्धव ठाकरे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on APR 04, 2022 22:12 PM
WebTitle – Resignation of Muslim activists from MNS after Raj Thackeray’s statement regarding loudspeaker