अहमदाबाद : मनुस्मृती वाचा, वयाच्या 17 व्या वर्षी मुली मुलांना जन्म द्यायच्या, कोर्टाच्या वक्तव्याने खळबळ: भाजपचं सरकार आल्यापासून भारतीय न्यायव्यवस्थेत मनुस्मृती चे दाखले देण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.आडून आडून न्यायाधीश मनुस्मृती ची आठवण काढत कौतुक करण्यात कसर सोडत नाहीत.मागे मनुस्मृती सारखे ग्रंथ महिलांना खूप सन्माननीय स्थान देतात: असं न्या.प्रतिभा सिंह यांनी म्हटल्याने देशात एकच खळबळ उडाली होती,अनेकांनी यावर आक्षेप घेत खडे बोल सुनावले होते.आता असेच एक प्रकरण समोर आले आहे.गुजरात हायकोर्ट मधिल सिंगल जज असणाऱ्या बेंच ने एका प्रकरणात सुनावणी करताना अवांतर चर्चेदरम्यान चक्क मनुस्मृती चा दाखला देत बलात्कार पीडित मुलीचा गर्भपात संदर्भात निर्णय राखून ठेवला.इतकच नाहीतर बचावपक्षाच्या वकिलाला मनुस्मृती वाचण्याचा सल्ला देत,त्यावेळी मुली कशा अल्पवयीन असतानाच मुलांना जन्म देत होत्या याचीही भलामण गुजरात हायकोर्ट कडून केली गेली,यामुळे सोशल मिडियात आता टीकेची झोड उठली आहे,अनेकांनी हे गंभीर आणि चिंताजनक असल्याचं म्हटलंय.यासंदर्भात देशातील सर्वच महत्वाच्या प्रसारमाध्यमांनी दखल घेत बातमी केली आहे.
मनुस्मृती वयाच्या 17 व्या वर्षी मुली मुलांना जन्म द्यायच्या,हे नेमकं प्रकरण काय जाणून घ्या
देशातील सर्वच महत्वाच्या प्रसारमाध्यमांनी केलेल्या बातमीनुसार,न्या. समीर दवे यांच्या *त्या वक्तव्याचा उल्लेख केलाय की , ‘पूर्वी मुलींचे वय 14-15 व्या वर्षी लग्न होत असे आणि मुली 17व्या वर्षी आई बनत होत्या’, अशी टिपण्णी गुजरात उच्च न्यायालयाने गुरुवारी केली. हे प्रकरण १७ वर्षीय बलात्कार पीडितेने आपल्या सात महिन्यांच्या गर्भाचा गर्भपात करण्याच्या याचिकेशी संबंधित आहे.न्यायालयाने ही टिप्पणी तोंडी केली आहे. गुजरात उच्च न्यायालयाने यावेळी मनुस्मृतीचा हवाला दिला.इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार,अल्पवयीन मुलगी बलात्कार पीडित आहे. तिच्या वडिलांना तिच्या गरोदरपणाबद्दल सात महिने उलटल्यानंतरच समजलं. यानंतर त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून मुलीचे वय पाहता गर्भपात करण्याची मागणी केली.
मुली लवकर वयात येतात
न्यायाधीश खटल्याशी संबंधित चर्चेत म्हणाले की, जर गर्भ आणि बलात्कार पीडितेची स्थिती चांगली असेल तर न्यायालय गर्भपाताला परवानगी देऊ शकत नाही. आता आपण २१व्या शतकात जगत आहोत म्हणून…पण, तुम्ही तुमच्या आईला किंवा आजीला विचारा की, पूर्वी मुलींचे लग्न १४-१५ व्या वर्षी होत असे. वयाच्या 17 व्या वर्षापर्यंत ती मुलाला जन्म देत असे. मुली मुलांपेक्षा लवकर वयात येतात. ते म्हणाले, ‘तुम्ही वाचणार नाही, पण त्यासाठी तुम्ही एकदा मनुस्मृती वाचली पाहिजे’.(Gujarat High Court Manusmruti )
खटल्याचा निकाल राखून ठेवला, पुढील सुनावणी
न्यायाधीश या प्रकरणातील बलात्कार पीडितेच्या वक्तव्याची दखल घेतली आणि राजकोट रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाच्या प्रमुखांचा सल्ला घेतला. त्यानंतर न्यायाधीश समीर दवे (justice Dave Gujarat high-count )यांनी पीडितेची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी ऑर्थोपेडिक तपासणी आणि मानसोपचार तपासणी करण्याचे आदेश दिले.कोर्टाने किशोरवयीन मुलीची स्थिती जाणून घेतली असून कोर्टाने गर्भपात करण्याचे आदेश दिल्यास तिचा गर्भपात करणे योग्य आहे का, याबाबत मत मागवले आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी 15 जून रोजी निश्चित केली आहे. पीडितेच्या प्रसूतीची तारीख 16 ऑगस्ट आहे.
बलात्कारातून जन्माला आलेल्या संततीचा गंभीर प्रश्न
अशा बलात्कारातून जन्माला आलेल्या संततीचा भविष्यात गंभीर प्रश्न बनू शकतो.या मुलांच्या सामाजिक अस्तित्वाचा प्रश्न,
त्यांचे संगोपन,त्यांच्या पित्याचा, पालकांचा,अन त्यामुळे निर्माण होणाऱ्या पुढील आयुष्याचा मोठा पेच निर्माण होऊ शकतो,
यासोबत सर्वात बेसिक मुद्दा म्हणजे अशा मुलांची मानसिक अवस्था.तिची जडणघडण हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे.
अशावेळी या प्रश्नाकडे कसं पाहणार? यावर विचारमंथन होणं गरजेचं आहे.तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कळवा.
सोशल मिडियातील काही निवडक प्रतिक्रिया
जेष्ठ पत्रकार आणि सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक दिलीप मंडल यांनी म्हटलं की,न्यायमूर्ती समीर दवे भूतकाळातील कटू सत्य बोलत आहेत, पण त्यांनी मनुस्मृतीचा उल्लेख टाळावा. त्या घाणेरड्या मजकुरावर त्यांनी कधीही आपला निर्णय घेऊ नये.
एक ट्विटर युजर पॉल यांनी म्हटल की,
यामुळे होणाऱ्या नुकसानातून मोदी सरकार कधीही सावरू शकणार नाही.
भारताच्या लोकसंख्येपैकी 50% महिला आहेत. इतिहास साक्षी आहे की प्राचीन भारतीय संस्कृती, तसेच #मनुस्मृतीत देखील स्त्रियांवर अन्याय केला गेला आहे.
निवडणुकांचा संदर्भ देत ते म्हणाले की,2024 हा काळ भारतीय महिलांसाठी त्यांचे मूल्य आणि भारतातील स्थान पुन्हा स्थापित करण्याची वेळ आहे
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक मधिल उद्धरण
“शूद्र जातींचा उपमर्द करणारी, त्यांची प्रगती खुंटविणारी, त्यांचे आत्मबळ नष्ट करून त्यांची सामाजिक, राजकीय व आर्थिक गुलामगिरी कायम करणारी ‘मनुस्मृती’तील पुढील वचने ध्यानात घेऊन व वरील हिंदुमात्राच्या जन्मसिद्ध हक्कांच्या जाहीरनाम्यात गोवलेल्या तत्त्वाशी तुलना करून सदरहू ग्रंथ धर्मग्रंथ या पवित्र नावास शोभण्यास अपात्र आहे, असे या परिषदेचे ठाम मत झाले आहे व ते मत व्यक्त करण्यासाठी असल्या लोकविग्रही व माणुसकीचा उच्छेद करणाऱ्या धर्मग्रंथाचा मी दहनविधी करीत आहे.” (बहिष्कृत भारत आणि मूकनायक : महाराष्ट्र शासन १९९०, पृ. १६३-१६७) भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक मधिल हे उद्धरण इथं अगत्याने द्यावे लागते.ते देत असताना आणखी एक महत्वाची गोष्ट ध्यानात घ्यायची आहे.
मनुस्मृती दहन 25 डिसेंबर 1927 रोजी करण्यात आलं.त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्मातच “अजूनही” होते आणि तो धर्म सुधारण्याची अपेक्षा धरून होते.त्यामुळे वरील उद्धरणात नीटपणे वाचल्यास लक्षात येईल की बाबासाहेब म्हणतात, “‘मनुस्मृती’तील पुढील वचने ध्यानात घेऊन व वरील हिंदुमात्राच्या जन्मसिद्ध हक्कांच्या जाहीरनाम्यात गोवलेल्या तत्त्वाशी तुलना करून सदरहू ग्रंथ धर्मग्रंथ या पवित्र नावास शोभण्यास अपात्र आहे, असे या परिषदेचे ठाम मत झाले आहे व ते मत व्यक्त करण्यासाठी असल्या लोकविग्रही व माणुसकीचा उच्छेद करणाऱ्या धर्मग्रंथाचा मी दहनविधी करीत आहे.”
मनुस्मृतीचे दहन झाले तरी मनुची मानसिकता जीवंत आहे
हिंदू तरुणाला दाढी पाहून मारहाण; धर्म जाणून घेण्यासाठी अंतर्वस्त्रे काढली
Nikki Yadav Murder :निक्की यादव चा खून,फ्रीजमध्ये मृतदेह;संपूर्ण प्रकरण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 09, JUN 2023, 12:12 PM
WebTitle – Read Manusmriti, 17-year-old girls used to give birth to children, gujrat high court dave