बीजिंग: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना चा संसर्ग सुरू झाल्याचे कळत असून, गुरुवारी वाढलेल्या आकडेवारीनंतर चीन प्रशासनानं शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विमान उड्डाणं देखील रद्द करण्यात आली आहेत. चीनमधील कोरोना प्रादुर्भाव वाढीसाठी प्रशासनानं यावेळी पर्यटकांना जबाबदार धरलं आहे.पर्यटकांच्या एका गटामार्फत संसर्ग होऊन चीनमध्ये करोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे.चीनमध्ये सध्या देशांतर्गत संसर्ग नाही; पण देशात सलग पाचव्या दिवशी गुरुवारी १३ नवे रुग्ण आढळले आहेत.काही शहरात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे.
चीन च्या वायव्य भागात पर्यटनासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या एका ग्रुप मार्फत हा कोरोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक झाल्याचे मानले जात आहे. या गटातील एका जोडप्याला कोरोनाची लागण झाली होती. हा गट आधी शांघायमध्ये आला. तेथून ते गान्सू प्रांतातील शीआन आणि इनर मंगोलियामध्ये गेले. त्यांच्या संपर्कात आलेले अनेक जण करोनाबाधित झाल्याचे आढळले आहे. यात काही जण राजधानी बीजिंगमधीलही आहेत.
लोकांनी घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन
स्थानिक पातळीवर सरकारनं मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे. तसंच पर्यटन स्थळं बंद केली आहेत.
प्रभावित ठिकाणांमधील शाळा आणि सर्व मनोरंजन ठिकाणं देखील बंद करण्यात आली आहे.
हाऊसिंग कंपाऊंडमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
लांझूहो येथे नागरिकांना घराबाहेर पडण्यावरही निर्बंध लागू करण्यात आले आहे.
अत्यावश्यक कामासाठीच नागरिकांना बाहेर पडता येणार आहे.
ईशान्येकडील लान्झोऊ या ४० लाख लोकसंख्येच्या शहरात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.
घराबाहेर पडायचे असल्यास कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
शीआन आणि लान्झोऊ विमानतळावरून होणाऱ्या ६० टक्के विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सियान आणि लांझूहो येथून उड्डाण घेणाऱ्या जवळपास ६० टक्के विमान उड्डाणं रद्द केली गेली आहेत.
इन मंगोलियातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
चीनमध्ये २४ तासामध्ये फक्त १३ करोनाबाधित आढळले. मात्र, तरीही चीन सरकारने संसर्ग रोखण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. देशात शून्य करोनाबाधित आकडा ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
कायदा आणि न्यायव्यवस्थेला आव्हान
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 22, 2021 13 :08 PM
WebTitle – Re-emergence of corona in China; Lockdown announced