मुंबई : राज्यसभा निवडणूक निकाल : निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर महाराष्ट्रात काल रात्री उशिरा राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली. येथील 6 जागांवर झालेल्या निर्णयानुसार महाविकास आघाडीचे 3 तर भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीला धक्का बसला. या जागेवर भाजपचे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव केला.
सुहास कांदे यांचे मतदान निष्कासित तर आणि अनिल देशमुख व नवाब मलिक यांना मतदान करता न येणे याचाही परिणाम झाला.
धनंजय महाडिक यांना ४१.५८ तर संजय पवार यांना ३९.२६ मते मिळाली.
महाविकास आघाडीकडून संजय राऊत, प्रफुल्ल पटेल आणि इम्रान प्रतापगढ़ी विजयी झाले आहेत.
तर भाजपकडून पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांनाही विजयी घोषित करण्यात आले.सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप आमनेसामने होते.
विजयासाठी 41 मतांची गरज होती. शिवसेनेचे संजय राऊत यांना ४१, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना ४४
आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना ४३ मते मिळाली.
तर भाजपचे पियुष गोयल यांना ४८ तर अनिल बोंडे यांना ४८ मते मिळाली.
निवडणुकीनंतर काँग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, आम्ही जिंकलो, ही आनंदाची गोष्ट आहे,
मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार हरला, याचे आम्हाला दुःख आहे.
काँग्रेसचे विजयी उमेदवार इम्रान प्रतापगढ़ी यांनीही आम्ही जिंकलो, मात्र महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झाल्याचे सांगितले.
निवडणूक जिंकण्यासाठी लढविली होती
सहाव्या जागेवर विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले की, “निवडणूक फक्त लढण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढली होती. जय महाराष्ट्र!
देवेंद्र फडणवीसांचे करेक्ट प्लॅनिंग
धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर भाजपच्या गोटात जल्लोष सुरू झाला.काल सकाळी 9 वाजता मतदान सुरु झालं,यावेळी भाजपच्या गोटात विजयाचा मोठा विश्वास दिसत होता. विजयी खासदार अनिल बोंडेंनी तर निकाल वर्तवून टाकला होता.दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला होता. हे सगळं सुरु असतानाच भाजपच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस मात्र मतदान प्रक्रियेत बिझी होते. एक-एक मत कसं आपल्या बाजूनं पडेल याकडेच त्यांचं लक्ष होते.भाजपचे आजारी आमदार लक्ष्मण जगताप जेव्हा मतदानासाठी आले, तेव्हा खुद्द देवेंद्र फडणवीसांनी त्याचं स्वागत केलं आणि याच मेहनतीला मध्यरात्री 3.30 नंतर यश आलं.
महाविकास आघाडीची 10 मतं फुटली
सगळ्यात धक्कादायक म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीची 10 मतं फुटली आणि धनंजय महाडिक यांचा विजय झाला. महाविकास आघाडीनं शक्तीप्रदर्शन केलं, चार उमेदवार जिंकणार असे दावे केले. पण देवेंद्र फडणवीसांनी पडद्याआडून निवडणुकीचं चोख प्लॅनिंग केलं. मतदानाच्या काही तास आधी आमदारांना विश्वासही दिला आणि तोच विश्वास निकालानंतर खरा ठरला.
‘निवडणूक आयोगाने भाजपची बाजू घेतली’ – संजय राऊत
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहापैकी तीन जागा भाजपने जिंकल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी निवडणूक आयोग भाजप पक्षाच्या बाजूने असल्याचा आरोप केला. “निवडणूक आयोगाने आमचे एक मत अवैध ठरवले. आम्ही दोन मतांवर आक्षेप घेतला, पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. निवडणूक आयोगाने त्यांची (भाजप) बाजू घेतली,” असे संजय राऊत म्हणाले.
या निवडणुकीचा आगामी एमएलसी निवडणुकांसह महापालिका निवडणुकीवरही परिणाम होऊ शकतो.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
नूपुर शर्मा च्या अटकेच्या मागणीवरून हिंसाचार, रांचीमध्ये संचारबंदी
भीमा कोरेगाव चौकशी समितीचे मुख्यमंत्र्यांसह 6 राजकीय पक्षांना समन्स
दलित मुलाशी प्रेम ; पित्याने केली मुलीची हत्या : आई पाहत राहिली
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
Samrat Prithviraj Review : प्रेक्षकांनी टॅक्स फ्री सम्राट पृथ्वीराज का नाकारला?
Samrat Prithviraj Box Office Collection पहिल्याच दिवशी निराशा
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 11 2022, 07 : 52 AM
WebTitle – Rajya Sabha elections Mahavikas Aghadi’s votes split – Fadnavis’ strategy successful