Raju Srivastava Biography in Marathi : अमिताभ बच्चन यांचा काहीसा झाक दिसणारी व्यक्ती कॉमेडी करताना तुम्ही पाहिली असेल होय, ती व्यक्ती म्हणजे स्टँडअप कॉमेडी कलाकार राजू श्रीवास्तव.राजू श्रीवास्तव हे एक लोकप्रिय भारतीय विनोदी कलाकार, अभिनेता आणि राजकारणी देखील होते. त्यांनी भारतात आणि परदेशात 3500 हून अधिक स्टेज शोमध्ये काम केलं आहे. राजू श्रीवास्तव यांनी ऑडिओ कॅसेट आणि व्हिडीओ सीडीची के सिरिजही लाँच केली. दिसायला काहीसा अमिताभ बच्चनसारखा असं अनेकांनी त्याचं कौतुक केलेलं. तुम्हाला त्याचं ‘गजोधर भय्या’ पात्र माहित असेलच, ‘गजोधर भय्या’ हे पात्र लोकाना खूप आवडलं आणि तेच जास्त प्रसिद्ध झालं.खरतर हे पात्र एका अस्तित्वात असलेल्या व्यक्तीवर आधारित आहे , राजूच्या आजोळी गजोधर नावाचा एक नाभीक होता आणि त्यांच्याकडून राजू केस कापून घ्यायचा.त्याच्यावर त्याला हे पात्र सुचलं
संघर्षमय जीवन
लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या राजूचं सुरुवातीचं आयुष्य संघर्षमय होतं. 10 ऑगस्ट 2022 रोजी, राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं. राजू श्रीवास्तव यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आलं.तिथं त्याच्यावर 42 दिवस उपचार केले गेले.अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आज या लेखात आम्ही तुम्हाला कॉमेडीचा बादशाह राजू श्रीवास्तव यांच्या विषयी सविस्तर माहिती देणार आहोत,त्यामुळे लेख संपेपर्यंत सोबत रहा.
राजू श्रीवास्तव यांचा जीवन प्रवास
नाव – सत्यप्रकाश उर्फ राजू श्रीवास्तव
टोपण नाव – गजोधर भैया
जन्म – 25 दिसंबर 1963
जन्मस्थान – कानपुर, उत्तर प्रदेश,भारत
आई – सरस्वती श्रीवास्तव
पिता – रमेश चंद्र श्रीवास्तव
पत्नी – शिखा श्रीवास्तव
मुलगा – आयुषमान श्रीवास्तव
मुलगी – अंतरा श्रीवास्तव
आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती
राजूच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे लहानपणापासून संघर्ष करावा लागला. राजू श्रीवास्तवकडे लहानपणापासूनच चांगली कॉमेडी सेन्स होता . तो लहानपणापासून मिमिक्री करायला लागला होता. प्रथम त्याने स्थानिक लोकांना हसायला सुरुवात केली. तो कोणत्याही विषयावर कॉमेडी करत असे.त्याची निरीक्षण शैली अफाट होती,ज्यामुळे तो आजूबाजूच्या लोकांचे निरीक्षण विशिष्ट लकबी याचा अभ्यास करून त्यावर विनोद निर्मिती करत असे.
गजोधर भय्या
त्याने साकारलेली ‘गजोधर भय्या’ ही व्यक्तीरेखा इतकी लोकप्रिय झाली होती की पुढे तीच त्याची ओळख बनली,लोकही त्याला गजोधर भय्या म्हणूनच संबोधू लागलो.खरतर हे पात्र एका अस्तित्वात असलेल्या व्यक्तीवर आधारित आहे , राजूच्या आजोळी गजोधर नावाचा एक नाभीक होता आणि त्यांच्याकडून राजू केस कापून घ्यायचा.त्याच्यावरूनच त्याला हे पात्र सुचलं
राजू श्रीवास्तव यांनी एका ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून हास्य कलाकार म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली होती.त्यांच्या विनोद निर्मितीत ग्रामीण भागातील व्यक्तिरेखा प्रामुख्याने असत,तर शहरी मध्यमवर्गीय मानसिकतेवर ते कायम आपल्या विनोदातून फटकारे मारत.विनोदी कार्यक्रम करताना विशिष्ट पोझ मध्ये उभं राहणं हातवारे करणं हे सामान्य लोकाना आपल्यातीलच एक व्यक्ती असल्याचा अनुभव देत असे त्यामुळे सामान्य वर्गात राजू कमालीचे लोकप्रिय झाले होते.
कुटुंबीयांना न सांगताच मुंबई गाठली
त्याची मिमिक्री लोकांना आवडू लागली होती,अशातच एक दिवस मिमिक्री केल्यानंतर एका व्यक्तीने त्याला 500 ची नोट दिली आणि सांगितलं की, तू एक चांगला कॉमेडियन बनू शकतोस. त्या व्यक्तीचा शब्द त्याच्या मनात घर करून राहिला अन त्याने मुंबईला जाण्याचा विचार केला.मुंबईला बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी राजू कुटुंबीयांना न सांगताच निघून आले होते.मुंबईत आल्यानंतरही त्यांना खूप संघर्ष करावा लागला. मुंबईत गुजराण करण्यासाठी त्यांनी छोटे छोटे स्टेज शो केले आणि त्याचवेळी ऑटो रिक्षाही चालवली.
ऑटो रिक्षा चालवतानाही त्यांची विनोद निर्मिती सुरूच असायची,त्यामुळे प्रवासीही आनंद घ्यायचे.1988 मध्ये रिलीज झालेल्या ‘तेजाब’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात त्याने छोटी छोटी भूमिका केली होती. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. मैंने प्यार किया, बाजीगर, मैं प्रेम की दीवानी हूँ, बॉम्बे टू गोवा,बिग ब्रदर, आमदनी अठन्नी खर्चा रुपया, वाह! तेरे क्या कहना, टॉयलेट-एक प्रेम कथा, फिरंगी यांसारख्या मोठ्या चित्रपटात त्यांनी आपली कला दाखवली.
एक टॅलेंट शो ने जीवन बदललं
2005 मध्ये स्टार वनवर प्रसारित झालेल्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या टॅलेंट शोने राजू ला मोठं यश मिळालं . हा शो त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. या टॅलेंट शोमध्ये राजू हा सेकंड रनर अप बनला असला तरी गजोधरच्या व्यक्तिरेखेने तो घरोघरी पोहोचला आणि सर्वजण त्याला ओळखू लागले आणि सर्वांचा आवडता कॉमेडियन बनला. त्याने पुन्हा ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज-चॅम्पियन्स’मध्ये भाग घेतला आणि ‘द किंग ऑफ कॉमेडी’ ही पदवी मिळवली आणि लोकांच्या हृदयावर राज्य करू लागला.
त्याने बिग बॉस सीझन 3 मध्येही भाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी कॉमेडी का महा मुकाबला या कॉमेडी शोमध्ये भाग घेतला आणि 2013 मध्ये पत्नी शिखासोबत नच बलिए सीझन 6 मध्ये भाग घेतला. राजू कॉमेडी नाईट्स विथ कपिलमध्येही दिसला. त्याने शक्तीमान, राजू हजीर हो, लाफ इंडिया लाफ आणि कॉमेडी सर्कस सारख्या इतर टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केले आहे.
राजकीय प्रवास
राजू श्रीवास्तव ची लोकप्रियता पाहून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कानपूरमधून श्रीवास्तव यांना उमेदवारी दिली होती. परंतु 11 मार्च 2014 रोजी श्रीवास्तव यांनी पक्षाच्या स्थानिक घटकांकडून पुरेसा पाठिंबा मिळत नसल्याचे सांगत तिकीट परत केले.त्यानंतर पुढे ते भाजप मध्ये गेले,भाजप मध्ये राजू श्रीवास्तवला स्वच्छ भारत अभियान उपक्रमाचा भाग बनले,त्याद्वारे ते या मोहिमेचा प्रचार प्रसार करत राहिले. सध्या राजू श्रीवास्तव हे उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पहात होते.
राजू यांची एकूण संपत्ती नेटवर्थ किती?
श्रीवास्तव हा सर्वात श्रीमंत विनोदी कलाकारांपैकी एक आहे आणि सर्वात लोकप्रिय विनोदी कलाकारांपैकी एक होते.उपलब्ध माहितीनुसार, विकिपीडिया, फोर्ब्स आणि बिझनेस इनसाइडर,श्रीवास्तव यांची एकूण संपत्ती सुमारे $1.5 दशलक्ष असल्याचे कळते. स्टेज शो, जाहिराती आणि अभिनयातून त्यांनी भरपूर कमावले होते.राजू श्रीवास्तव च्या स्टेज शोसाठी राजू ६-७ लाख रुपये घेत असल्याचे समजते. राजूकडे ऑडी Q-7 आणि BMW 3 सारखी लक्झरी वाहने आहेत.
राजू श्रीवास्तव सोबत वाद
2010 मध्ये राजूला थेट पाकिस्तानातून एक धमकीचा कॉल आला होता त्यात त्यांना इशारा देण्यात आला होता की तुमच्या शो मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानवार विनोद करायचे नाहीत.मात्र राजुने त्याच्या अंदाजात त्यांना उत्तर दिलं होतं. हम कनपुरिया हैं, अपने पर बने हैं, हम डरने और विचलित होने वाले नहीं हैं।
श्रीवास्तव यांनी मच्छर चालीसा,नावाने एक विनोदी स्किट केलं होतं तेव्हा हिंदू कट्टरपंथीयांकडून
त्यांना जहाल विरोध आणि टीका ऐकावी लागली होती. कुठल्याही राजकीय नेत्यावर विनोद केला की त्यांचे कार्यकर्ते राजू वर भडकायचे.
निधन
कॉमेडियन राजू यांचं 21 सप्टेंबर रोजी सकाळी रुग्णालयात निधन झालं. आपला जीव वाचवण्यासाठी गेल्या ४२ दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. सर्वांना हसवणाऱ्या राजू यांच्या निधनावर त्यांच्या चाहत्यांना अश्रू अनावर झाले.
FAQ
A राजू श्रीवास्तव यांचे खरे नाव काय आहे?
नाव – सत्यप्रकाश उर्फ राजू श्रीवास्तव
B राजू श्रीवास्तव यांची एकूण संपत्ती नेटवर्थ किती आहे?
राजू श्रीवास्तव यांची एकूण संपत्ती सुमारे $1.5 दशलक्ष असल्याचे कळते.
C राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी कोण आहेत?
शिखा श्रीवास्तव या राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी आहेत?
केंद्रीय तपास यंत्रणा च्या गैरवापराच्या विरोधात बंगाल विधानसभेत ठराव पास
जात मुद्यावरून अंत्यसंस्कार करण्यास रोखले; बाहेरच करावा लागला विधी
मराठा समाजाविषयी वादग्रस्त व्यक्तव्य ; किरणकुमार बकाले निलंबित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 21,2022, 16:12 PM
WebTitle – Raju Srivastava’s journey from auto rickshaw driver to comedy star