मुस्लिम व्यक्तीच्या मालकीचे रेस्टॉरंट उघडण्यास विरोध करणारा हिंदू कट्टरपंथी जमाव आणि त्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर फिरत आहे. Twitter वर MuslimMirror.com ने पोस्ट केलेल्या व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.या व्हिडिओ मध्ये कट्टरपंथी हिंदूत्ववादी जमावाचा घोषणा देताना दिसत आहे. “तुम्हाला भारतात रहायचे असेल, तर तुम्हाला भगवान रामचा जयजयकार करावा लागेल.” हिंदुस्तान में रहना होगा, जय श्री राम कहना होगा, देश के गद्दारो को जुते मारो सालो को अशी तेढ निर्माण करणारी जहाल घोषणाबाजी करताना दिसत आहे.
हिंदू कट्टरपंथी जमाव, ज्यामध्ये महिलांचा देखिल समावेश आहे, घोषणाबाजी करताना एका मुस्लिम व्यक्तीच्या मालकीच्या हॉटेल बाहेर कॅमेऱ्यांसमोर फोटो काढताना पाहिले जाऊ शकते.एका ट्विटर वापरकर्त्यांच्या मते हा गट त्यांच्या शेजारी मुस्लिमांच्या मालकीचे रेस्टॉरंट उघडण्यास विरोध करत होता.
एका ट्विटर वापरकर्त्याच्या म्हणण्यानुसार, “मुस्लिम मालकीच्या हॉटेलच्या बाथरूमच्या बाहेरील टाइलवर हिंदू देवतांच्या प्रतिमा असल्यामुळे हा गट निषेध करत आहे.”
धार्मिक द्वेष-गुन्ह्यांची मालिका
मुस्लिमांच्या मालकीची दुकाने आणि व्यवसाय अलीकडे कट्टरपंथिय हिंदू अतिरेक्यांचे लक्ष्य बनले आहेत. एका दुसऱ्या घटनेत, गेल्या आठवड्यांपासून द्वेष-गुन्ह्यांची मालिका सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.कर्नाटकातील बेलगावी येथे एका हिंदुत्ववादी गटाने मुस्लिम कुटुंबाच्या चिकनच्या दुकानाची तोडफोड केली,मात्र पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्याचा आरोप आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मुस्लिम कुटुंबाने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, परिसरातील एका मंदिराचे उद्घाटन होते तेव्हा आम्हाला सकाळी 11 वाजेपर्यंत दुकान उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती.आम्ही त्यावेळी (11 वाजता) ते बंद केले. मात्र दुपारी काही कामगार साफसफाई करत असताना जमावाने तोडफोड केली आणि दुकान न उघडण्याची धमकी दिली.
8 ऑक्टोबर रोजी बेळगाव शहराबाहेर ही घटना घडली होती,
मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते.
“पोलिसांनी आम्हाला सांगितले की त्यांनी हे प्रकरण शांत केले आहे आणि ते त्यात पुढे हस्तक्षेप करणार नाहीत,” अफसाना (दुकान मालकिन) म्हणाली.पोलिसानी सांगितले की याची तक्रार करण्याची गरज नाही.बेळगावचे पोलिस आयुक्त के. त्यागराजन यांनी या माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांना या घटनेची माहिती नव्हती. जर या जोडप्याला न्याय मिळाला नव्हता तर त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे संपर्क साधायला हवा होता. असे ते म्हणाले.
एनसीबीच्या अधिकाऱ्याने नवाब मलिक यांना पत्र पाठवून समीर वानखेडेचा पर्दाफाश केला?
टी-20 पाकिस्तानच्या विजयानंतर पाक फॅन ‘सैराट’, हवेत गोळीबार, 12 लोक जखमी
आर्यन खान प्रकरण; वानखेडेंवर आरोप;पंच चा धक्कादायक गौप्यस्फोट!
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 26, 2021 19:00 PM
WebTitle – Radical Hindu mob opposes opening of Muslim-owned restaurant?