पुणे : पुण्यात ४८ तासांत ५ खून; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवरपुणे शहरातील गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नाहीये. अवघ्या ४८ तासांत शहरात सहा खुनांच्या घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कोयता गँगची भीती आधीच आहे, त्यातच आता खुनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
पुण्यात ४८ तासांत ६ खून
१. सिंहगड रोड पोलिस स्टेशन हद्द – नऱ्हे परिसरातील घटना:
१८ वर्षीय तरुणावर गाडीतील पेट्रोल चोरी करत असल्याच्या संशयावरून चार जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
२. सिंहगड रोड पोलिस स्टेशन हद्द – दुसरी घटना:
मंगळवारी रात्री पूर्ववैमनस्यातून तीन अल्पवयीन तरुणांनी एका तरुणाचा खून केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
वानवडीमध्ये कोयत्याने वार करत अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन तरुणाचा खून केला. या धक्कादायक घटनेने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
३ . हडपसर – रामटेकडी खून:
सोमवारी सकाळी ७.१५ च्या सुमारास एका टोळक्याने १७ वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला केला आणि त्याचा निर्घृण खून केला. या घटनेनंतर अवघ्या १६ तासांत वडगाव बुद्रुक, निवृत्तीनगर येथे आणखी एका १७ वर्षीय मुलाचा खून करण्यात आला.
या घटनेतील मृत मुलाचं नाव श्रीपाद बनकर (१७) आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. जय काळभोर (१८) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.
४ . वाघोली पोलिस स्टेशन हद्द:
दरेकर वस्ती, लोहगाव-वाघोली रोड येथील राजू लोहार (४६) यांचा किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलाने खून केला. मद्यप्राशनानंतर झालेल्या वादातून मुलाने राजू यांच्यावर दगडाने हल्ला करून त्यांचा जीव घेतला. याप्रकरणी राज राजू लोहार (२८) यांनी तक्रार दिली आहे.
५ . कोंढवा पोलिस स्टेशन हद्द:
कोंढवा येथे डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून एका व्यक्तीचा खून करण्यात आला.
या घटनांमुळे पुण्यात भीतीचं वातावरण आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांवर मोठं दडपण आलं आहे.
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 05,2024 | 14:40 PM
WebTitle – Pune five Murders in 48 Hours, Law and Order in Question