जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सुप्रसिद्ध पत्रकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत 2019 च्या पुलवामा हल्ल्यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरताना अनेक खळबळजनक दावे केले आहेत.जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी प्रसिद्ध पत्रकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत 2019 च्या पुलवामा हल्ल्यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरण्याचे अनेक धक्कादायक दावे केले आहेत.
मलिक यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचाराबाबतच्या कथित ‘झीरो टॉलरन्स’ धोरणावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत
आणि असा दावा केला आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भ्रष्टाचाराचा फारसा तिरस्कार नाही.
‘द वायर’ या न्यूज पोर्टलला दिलेल्या या मुलाखतीत त्यांनी कलम 370 रद्द करणे,
आणि भाजप नेते राम माधव यांच्याशी संबंधित वादांवरही आपले मत मांडले आहे.
सत्यपाल मलिक यांच्या या आरोपांनंतर विरोधी पक्षांसह इतर अनेक सामान्य लोकही
या मुलाखतीच्या क्लिप ट्विट करत सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करत आहेत.
काँग्रेस ने काय म्हटल?
काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये प्रधानमंत्री मोदींवर आरोप केला आहे की,
पुलवामा हल्ला आणि त्यात 40 शूरवीर शहीद झाले ते सरकारच्या चुकीमुळे झाले.
या ट्विटनुसार, “नरेंद्र मोदी जी, पुलवामा हल्ला आणि त्यात 40 शूरवीरांचे हौतात्म्य तुमच्या सरकारच्या चुकीमुळे घडले. आमच्या जवानांना विमान मिळाले असते तर दहशतवाद्यांचा डाव फसला असता. या चुकीसाठी तुम्हाला कारवाई करावी लागली आणि तुम्ही हे प्रकरण केवळ दडपले नाही तर तुमची प्रतिमा वाचवायला सुरुवात केली. सत्यपाल मलिक यांचे पुलवामावरील वक्तव्य ऐकून देश हादरला आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्विट केले आहे की, “माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या खुलाशांवरून असे दिसते की मोदीजींना ‘देशाच्या-नुकसानाची’ जितकी भीती वाटत नाही तितकी (स्वत:च्या) ‘मानहानीची’ भीती वाटते!”
History repeats itself असं म्हणतात,करन थापर हे तेच पत्रकार आहेत. ज्यांच्या सोबत नरेंद्र मोदी यांची मुलाखत होती,करन थापर यांनी त्यावेळी काही प्रश्न विचारले होते,तेव्हा मोदींचा घसा कोरडा पडला,घाम फुटला त्यांनी पाणी मागितलं.मोदी करन थापरना म्हणाले,मला असे प्रश्न विचारू नका,”दोस्ती बनी रहे” मोदी या मुलाखातीत एक्सपोज झाले.ही क्लिप सुद्ध खूप गाजली होती.या गोष्टीला दहा वर्षे झाली.
करन थापर यांनी काल जम्मू काश्मिर चे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा इंटरव्ह्यू केला.या मुलाखातीत देखील नरेंद्र मोदी एक्सपोज झाले.ही मुलाखात भाजपचे सरकार पाय उतार व्हायला पुरेशी आहे.
या मुलाखातीत अनेक गंभीर गोष्टी आहेत.त्यातील सर्वात गंभीर गोष्ट हीच एक मुलाखत घेणारे करन थापर वारंवार सत्यपाल मलिक यांना इशारा देतात सावध करतात की तुम्ही हे जे बोलताय त्याची चिंता फिकीर वाटत नाही का? तुम्ही जे मांडत आहात त्यामुळे मोदी खूप नाराज होतील.
यावर सत्यपाल मलिक निडरपणे म्हणतात की मला काही फरक पडत नाही,मी घाबरत नाही,जास्तीत जास्त काय करतील?
जेलमध्ये टाकतील? मी अनेकदा गेलोय,माझ्याकडे कोणतीही संपत्ती नाही,भाड्याच्या घरात राहतो.
राष्ट्रपती पद हे केवळ पपेट म्हणजे पोपट आहेत असंही या मुलाखातीत स्पष्ट झालं . जेकी लोकही म्हणत होते,
याशिवाय मलिक यांनी काश्मिर च्या मुद्यावर बोलू नये अशी सक्त ताकीद दिली गेली होती.
सत्यपाल मलिक जाट समुदायातून आहेत.किसान मोर्चाच्या वेळीही त्यांनी शेतकऱ्यांची साथ दिली,सरकारला घरचा आहेर दिला होता.
त्यावेळीही त्यांनी मोदींना भेटण्याचा प्रयत्न केला होता,सत्यपाल यांनी काश्मिर मधिल अंबानी
आणि आरएसएस च्या एका मोठ्या नेत्याच्या कथित भ्रष्टाचाराची देखील पोलखोल केली होती.
गोव्याचे मुख्यमंत्री सुद्धा भ्रष्टाचारी असल्याचे स्पष्ट केलेय.
सत्यपाल मलिक असेही म्हणलेत की हे लोक मला मारू नाही शकत,तसं केलं तर माझी कम्युनिटी यांना सोडणार नाही,एकही पब्लिक मीटिंग माझा समाज करू देणार नाही.
करन थापर शेवटी म्हणाले,मी प्रार्थना करतो की तुमच्या जीवाला काही धोका होऊ नये.हे विधान देशात कोणती व्यवस्था आहे हे स्पष्ट करायला पुरेसं आहे.
सत्यपाल मलिक ; RSS नेत्याची डील, अंबानींची फाईल,गोवा भाजपचा भ्रष्टाचा
डॉ.आंबेडकर यांचा भारतातील सर्वात उंच पुतळा
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 15,2023 20:05 PM
WebTitle – Pulwama attack; Satyapal Malik on Modi , country shook