
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील मायक्रो फायनान्स महिला बचत गटांना दिलेले मार्च 2020 चे कर्ज संपूर्ण माफ करावे या मागणी साठी महिला छत गट सदस्य मागील एकवीस दिवसापासून कलेक्टर ऑफिस जळगाव महाराष्ट्र येथे साखळी धरणे आंदोलन करत आहोत.मोदी सरकारने 22 मार्च 2020 ला कोणतीही पूर्व सूचना तसेच नियोजन शून्य लॉकडाउन संपूर्ण देशावर लादले जसे मनात आले तेव्हा नॉटबंदी, GST…या संपूर्ण लॉक डाउनचा संपूर्ण भारतातील लोकांच्या आयुष्यावर झाला.असा दुष्परिणाम की संपूर्ण भारतीयांना अनेक वर्षे भोगावा लागेल. तुम्ही जाणून आहात की यामध्ये सर्वात जास्त नुकसान भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगार मजूर वर्गावर झाला.पायी घरी पोहचण्यापासून ते उपचार अभावी हॉस्पिटलमध्ये बेड न भेटणे यामुळे लाखो लोक मृत्युमुखी पडली.





या सर्व अराजकते मध्ये भारतातील असंघटित महिला वर्गाला काय दिव्यातून जावे लागत आहे याकडे कोणत्याही सरकार आणि प्रशासनाचे लक्ष नाही. आम्ही महाराष्ट्रातील महिला साधारण मागील बारा ते पंधरा वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध मायक्रो फायनान्स कडून घरगुती उद्योगासाठी साधारण वीस ते पन्नास हजारापर्यंत लोन घेऊन दर हाफत्याला किंवा महिन्याला भरत आलो आहोत. परंतु मागील दीड वर्षांमध्ये लॉक डाउन मुळे आमच्या हातातील काम गेलीत, रोजच जगन मुश्किल झालं आहे. घरातील रोजचा खर्च, घरभाडे, दवाखाना, मुलानेचे शिक्षण कसेबसे करत आहोत. आमच्यातील बऱ्याच महिला ह्या परित्यक्ता, विधवा आहेत, बऱ्याच महिलांचे पतींचे कोविड काळात मृत्यू झाल्यामुळे त्या विधवा होऊन संपूर्ण भार त्यांचा एकटीच्या खांद्यावर आला आहे.
रिकव्हरी एजंट कडून महिलांचा छळ
अश्यात मायक्रो फायनान्स चे रिकव्हरी एजंट सकाळी घरी येऊन ठिय्या मांडतात,अपमानित करतात.
काहीही करा पण आताच पैसे हवे त्याशिवाय आम्ही घरातून जाणार नाही असे सांगून तासन्तास घरात बसून असतात.
अगोदरच हाताला काम नाही त्यात होणारा मानसिक छळ आणि अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने
संपूर्ण परिवारासोबत आत्महत्या करावी अशी मानसिकता होत चालली आहे.
असे आंदोलन सुरू झाल्यापासून काही महिलांनी प्रत्यक्ष येऊन त्यांची व्यथा आमच्या जवळ व्यक्त केली.
आम्ही महाराष्ट्रातील महिला स्वाभिमानी आहोत, आजवर सर्व कर्ज वेळेवर भरत आलो आहोत,
परंतु सक्तीच्या आणि नियोजन शून्य लादलेल्या लॉक डाउन व आज नव्याने घरगुती व्यवसाय करण्यासाठी भांडवल नसल्यामुळे
आम्ही केंद्र सरकारला मदतीचा हात मागत आहोत. की अमच्यावरील मायक्रो फायनान्स चे मार्च 2020 पासूनचे कर्ज माफ करून मिळावे.
प्रमुख प्रसारमाध्यमांनी देखिल दखल घेतली नाही.
महिला बचत गट सदस्यांनी आंदोलन सुरू केल्यापासून जळगाव मधील बरेच समाजसेवक, सामाजिक संस्था
यांनी येऊन पाठिंबा दिला तसेच काही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकत आलेत पाठिंबा दिला काहींनी सांगितले की काहीच होणार नाही.
स्थानिक काही न्युज पेपर आणि काही स्थानिक ऑनलाईन न्युज चॅनल्स सोडली तर
कोणत्याही मोठ्या न्युज पेपर आणि न्यूज चॅनेल्स आमच्या मागणीला प्रतिसात दिला नाही.
आंदोलनांच्या अठराव्या दिवशी खासदार रक्षा खडसे (रावेर लोकसभा),
खासदार उन्मेष पाटील (एरंडोल/ जळगाव लोकसभा), आमदार सुरेश भोळे (जळगाव शहर) सर्व भाजपा चे व मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्यासोबत आमची कलेक्टर ऑफिस ला मिटींग झाली. मीटिंग मध्ये आम्हाला आमची मागणी नीट मांडू दिली गेली नाही.

आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव
वरील सर्वांनी एकाच सांगितले की आम्ही बँकांना आणि मायक्रो फायनान्स पत्र व्यवहार करून रिक्वेस्ट करू की काही इंटरेस्ट कमी करावा आणि एक किंवा दोन महिन्याचे मुदत वाढ द्यावी (संपूर्ण अधिकार बँक आणि मायक्रो फायनान्स कडे). परंतु कर्ज माफी देने हे बँकेच्या किंवा मायक्रो फायनान्स च्या हातात नाही हे जाणून पण आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला व आमच्यावर आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव आणला गेला. आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात, तुम्ही पुढाकार घेऊन मोदी सरकारला आम्हा महिलांची मागणी मान्य करायला लावून आमचे कर्ज माफ करावे सांगितले तरी त्यांनी असमर्थता दर्शवली.आज एकविसाव्या दिवशी सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती, हमी ठोस आश्वासन मिळाले नाही.आम्ही सर्व महिला तुम्हाला विनंती करतो की आमचा आवाज आणि मागण्या सरकार पर्यंत पोहचवण्यासाठी मदत करा.
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
किरण गोसावी चा अटक होण्यापूर्वी आला नवा व्हिडिओ
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; जामिनावर नवाब मलिकांची प्रतिक्रिया
आर्यन खान प्रकरण; वानखेडेंवर आरोप;पंच चा धक्कादायक गौप्यस्फोट!
फॅक्ट चेक : शाहरुख खानचे वडील स्वातंत्र्यसैनिक नव्हते का?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 01, 2021 21:00 PM
WebTitle – Pressure to withdraw the bear movement of women self-help group members