अहमदाबाद, 27 एप्रिल: नर्मदाबेन मोदी (PM Narendra Modi Aunt died of covid-19) म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काकूचं मंगळवारी कोरोनामुळे निधन झालं. अहमदाबादमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
नर्मदाबेन यांच्या कुटुंबीयांनी त्यांचं निधन झाल्याची माहिती दिली.
नर्मदाबेन मोदी 80 वर्षांच्या होत्या. त्या अहमदाबादमधल्या राणीप भागात मुलांसमवेत राहात असत.
त्यांचे पती जगजीवनदास मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वडील दामोदरदास मोदी यांचे सख्खे बंधू होत.
जगजीवनदास यांचं अनेक वर्षांपूर्वी निधन झालं आहे.
नरेंद्र मोदी कोरोना चे सुपरस्प्रेडर ,मोदींमुळे कोरोना प्रलय
लोकसत्ता दैनिकाने दिलेल्या बातमी नुसार –
देशातील डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहिया यांनी प्रधानमंत्री नरेंद्र नरेंद्र मोदी कोरोना चे ‘सुपरस्प्रेडर’ असल्याचं म्हटलं आहे. देशामध्ये करोनाची दुसरी लाट आली असताना राजकीय सभा घेणे तसेच कुंभमेळ्यासारख्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सहमती दर्शवल्याने करोनाचा मोठ्याप्रमाणात प्रसार झाल्याने डॉ. नवज्योत यांनी मोदींना सुपर स्प्रेडर म्हटल्याचं, द ट्रेब्युन ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. सुपर स्प्रेडर म्हणजे अशी व्यक्ती जिच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना करोनाचा संसर्ग होतो.
“कोरोना विषाणूसंदर्भातील नियम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे यासाठी आरोग्य सेवेतील लोकं काम करत असतानाच दुसरीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रचार सभांना संबोधित करण्यासंदर्भातील निर्णय घेताना मागे पुढे पाहिले नाही. त्यांनी कोरोनासंदर्भातील सर्व नियम मोडले,” असं डॉ. नवज्योत म्हणाले आहेत.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on APRIL 28, 2021 10: 35 AM
WebTitle – pm narendra modi aunt narmadaben modi death due to coronavirus in hospital 2021-04-28