मुंबई : मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीने छापा टाकत बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर काही लोकांना अटक केली होती.25 दिवस मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात काढल्यानंतर आर्यन खानला आज जामीन मंजूर झाला.न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे कॉँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.”पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त” असं ट्विट नवाब मलिक यांनी केले आहे.
“पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त” असं ट्विट नवाब मलिक यांनी केले आहे.
आर्यन खानच्या जामिनावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली.यावेळी आर्यनच्या जामिनासाठी
जेष्ठ वकील मुकुल रोहोतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला.
त्यानंतर न्यायालयाने आर्यन खानचा जामीन मंजूर केला.
यासोबतच अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा यांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
काय म्हणाले मुकुल रोहतगी?
मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानसाठी माजी केंद्रीय अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी बाजू मांडत होते.
न्यायालयाच्या निर्देशांनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. “न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन मंजूर केला आहे. सविस्तर ऑर्डर उद्या हातात येईल. मला आशा आहे की हे तिघे उद्या किंवा शनिवारपर्यंत बाहेर येतील”, असं ते म्हणाले.
एनसीबीच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला?
एनसीबीच्या वतीने अनिल सिंग बाजू मांडत होते. ते म्हणाले, “आर्यन खान ड्रग्जचं नियमित सेवन करत होता. हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. आर्यनने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले होते. दोन व्यक्ती सोबत आहेत, त्यातील दुसऱ्याला ड्रग्ज असल्याचं माहिती आहे. त्याने ड्रग्ज घेतले तर पहिला व्यक्तीने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले असा अर्थ निघतो. आर्यन आणि अरबाज बालपणापासूनचे मित्र आहेत. ते सोबत फिरले आणि एकाच रूममध्ये राहिले.”
“आरोपींचे वकील ड्रग्ज सेवन केलं होतं की नाही हे स्पष्ट होण्यासाठी वैद्यकीय चाचणी का केली नाही असा युक्तीवाद करत आहेत. मात्र, आमचा आरोप सेवनाचा नाही, तर ड्रग्ज बाळगल्याचा आहे. आर्यन खानने सेवनाच्या उद्देशाने ड्रग्ज बाळगले. हे प्रकरण सेवन करण्याच्या उद्देशानं जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगण्याचं आहे. आरोपींकडे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडलीय. सर्व ८ आरोपींकडे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज सापडले. याची एकूण मात्रा पाहिली असता यात व्यापक विक्रीचा कट दिसतो,” असं अनिल सिंग म्हणाले.
मुकुल रोहतगी यांचा युक्तिवाद
माजी केंद्रीय अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची बाजू मांडताना कोर्टापुढे आर्यनच्या वतीने प्रतिज्ञा पत्र सादर केले.रोहतगी यांनी सांगितले की, कोणतेही इथे कोणतेही षडयंत्र नव्हते कारण त्यांच्या डोक्यात असे काही नव्हते किंवा ते तिथे भेटून अंमली पदार्थ मिळवतील आणि स्मोक मिळेल अशी कोणतीही चर्चाही झाली नाही. रोहतगी यांनी असेही स्पष्ट केले की सर्व आरोपींपैकी खान फक्त अरबाज मर्चंट आणि अर्चित यांना ओळखतो.हे एक षडयंत्र आहे.“जहाजावर 1300 लोक होते. अरबाज आणि अर्चित व्यतिरिक्त आर्यन इतर कोणाला ओळखतो हे दाखवण्यासाठी एनसीबीने कोणतेही पुरावे सादर केले नाहीत,” रोहतगी म्हणाले.आर्यनकडून कोणतीही गोष्ट मिळून आली नसल्याचा पुनरुच्चार केला. “अरबाज काय घेऊन जात होता हे मला माहीत नव्हते.पण ते माझ्यावर टाकले जात आहे ते कटकारस्थानातून थोपवले जात आहे,” असा दावा (युक्तिवाद) रोहतगी यांनी आर्यनच्या वतीने केला.
किरण गोसावी चा अटक होण्यापूर्वी आला नवा व्हिडिओ
आर्यन खान प्रकरण; वानखेडेंवर आरोप;पंच चा धक्कादायक गौप्यस्फोट!
फॅक्ट चेक : शाहरुख खानचे वडील स्वातंत्र्यसैनिक नव्हते का?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 28, 2021 22:05 PM
WebTitle – picture abhi baki hai mere dost Nawab Malik’s reaction to bail