पेटीएम Paytm करो ! पर,सावधानी के साथ !
डिजिटल व्यवहार आता सामान्य बाब व्हायला लागली आहे.इंटरनेट आणि एंड्रॉयड फीचर्स असणारे स्मार्टफोन वापरणारी प्रत्येक व्यक्ती पैशांचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करते.
डिजिटल व्यवहार आणि काळजी
कोणतीही खरेदी विक्री बँकांचे डिजिटल व्यवहार आजकाल स्मार्टफोन मधून सहज होतात.
याशिवाय काही पेमेंट गेटवे आहेत.हे पेमेंट गेटवे देणाऱ्या संस्था आपल्याला डीजीटल मनी उपलब्ध करून देतात.
अर्थात हा डिजिटल मनी आपल्याच बँकेच्या खतातून आलेला असतो.
आपले बँक खाते अशा पेमेंट गेटवेला जोडलेले असते.हे पेमेंट गेटवे मोबाईल ऍप्सच्या माध्यमातून आपल्या फोनमध्ये स्टोर केले जातात.
यात काही आघाडीचे पेमेंट गेटवे आहेत.जसे की गुगल पेटीएम इझीपे भीमऍप इत्यादी
जसं जग ऑनलाईन होत चाललं आहे डिजिटल होत चाललं आहे तसे याक्षेत्रात फसवणूक करणारे फ्रोड करणारे देखिल हायटेक डिजिटल होत चालले आहे.
असाच एक अनुभव आम्हालाच आलेला आहे.आज आमच्या फोनवर एक मेसेज आला.त्याचा स्क्रीनशॉट खाली दिलेला आहे.
Dear PAYTM customer your paytm KYC has been suspended, paytm office PH 6290704857
account will block within 24hr. Thank you PAYTM TEAM
अशाप्रकारचा मेसेज आम्हाला पाठविण्यात आला.त्याची शाहनिशा करण्यासाठी आम्ही थेट PAYTM KYC customer care सेंटर गाठले.तीथे आम्हाला असे समजले की PAYTM या पेमेंट गेटवे कंपनीकडून अशाप्रकारचे कोणतेही मेसेज ग्राहकांना पाठवले जात नाहीत.
किंवा फोन करून इमेल करून सुद्धा सांगितले जात नाही.तुमच्या खात्यासंदर्भात काही तांत्रिक दोष उत्पन्न झाला तर त्याबद्दलच्या सूचना आणि माहिती तुम्हाला PAYTM App मध्येच नोटीफिकेशन देवून सांगितली जाते.
त्यामुळे यापुढे आपणही काळजी घ्यावी,अशाप्रकारचे कोणतेही मेसेज किंवा कॉल आले तर त्यांना प्रतिसाद देवू नका.आणि एक गोष्ट कायम स्वरूपी लक्षात ठेवा.बँक असो वा अशा पेमेंट गेटवे कंपन्या तुमचा लॉगीन पासवर्ड तुमच्या क्रेडीट/डेबिट कार्डचा पिन नंबर /पासवर्ड आणि कार्डच्या मागे असणारा सीवीवी नंबर कधीच कुणाला सांगू नका.
ते सांगाल तर बँकेची शिल्लक शून्य कराल.डिजिटल रहा परंतु स्मार्ट सुद्धा रहा.पेटीएम Paytm करो ! पर,सावधानी के साथ !
आपल्या जागल्याभारत च्या वाचकांना याबद्दल माहिती देणे आम्हाला गरजेचे वाटले.आम्ही तुमची काळजी घेतो.
अवतार सिंह पाश…. सबसे ख़तरनाक होता हैं अपने सपनो का मर जाना..
महाश्वेता देवी, शोषित-उत्पीडित वंचिताच्या वेदनेचा आवाज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)