पतंजली आणि रामदेव बाबा अलीकडे कायम विवादात सापडत आहेत,या अगोदरही त्यांनी कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला आणि नंतर ते औषध मागे घेण्यात आले.केंद्रसरकारला पुढे येवून स्पष्टीकरण द्यावे लागले.त्यावेळी याची प्रसारमाध्यमांनी मोठ्याप्रमाणावर प्रसिद्धी केल्याने लोकांनी ही मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद देण्यास उत्सुक होते.इंडिया टीव्ही चे मुख्य संपादक रजत शर्मा यांना याबाबत जनतेने प्रश्न विचारले असता त्यांनी उत्तर देणे टाळले आहे.
WHO ने मान्यता दिल्याचा बनाव
मात्र राजस्थान सरकार व उत्तराखंड सरकारने कारवाईचा बडगा उगारताच असे औषध निर्माण केलेच नाही, असा पवित्रा पतंजलीने घेतला होता.कारवाईच्या भीतीने त्यांनी भूमिका बदलली,मात्र कोरोना बरा करणारे औषध निर्माण केल्याचा खोटा दावा करून जनतेची दिशाभूल, फसवणूक व बनवाबनवी केल्याबद्दल रामदेव बाबा, आचार्य बालकृष्ण,डॉ. बलबीर सिंह तोमर यांच्यासह त्यांच्या ६ सहकाऱ्यांवर ४२० कलमाखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राज्य सरकारकडे केली होती.
आता पुन्हा “कोरोनील”बाजारात आणले,आणि यावेळीही त्यांनी WHO ने मान्यता दिल्याचा बनाव केला.तसेच केंद्रातील महत्वाचे मंत्री नितीन गडकरी आणि खुद्द केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत हा लॉंचिंग कार्यक्रम करण्यात आला.या कार्यक्रमाच्या बॅनरवर सुद्धा जागतिक आरोग्य संघटना मान्यताप्राप्त असा स्पष्ट आणि आवर्जून उल्लेख करण्यात आल्याचे दिसते.
मात्र यानंतर लोकानी पुन्हा यातील तथ्य जाणून घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO) ची वेबसाईट धुंडाळली, जेष्ठ पत्रकार दिलीप मंडल यांनी टर दावाच केली की बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल,त्यामुळे पुन्हा या औषधावरून सोशल मिडियातून सर्वच स्तरातून पुरावे दाखवा म्हणून रेटा सुरू झाला.
बचावात्मक पवित्रा
आणि मग पतंजली आयुर्वेद चे आचार्य बाळकृष्ण यांना पुढे येवून यावर स्पष्टीकरण द्यावे लागले.
त्यांचे स्पष्टीकरण धक्कादायक असून यामुळे पुन्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत,
याशिवाय या औषधाची सुरक्षितता नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता
आणि दोन महत्वाचे केंद्रीय मंत्री हे सगळे मुद्दे अतिशय चिंताजनक बाब आहे.
आचार्य बाळकृष्ण याने स्पष्ट केले की आमच्या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली नाही,
आणि मान्यता नाकरलेली सुद्धा नाही,बचावात्मक पवित्रा असला तरी मान्यता नाही हा मुद्दा लोकांच्या जीविताच्या दृष्टीने इथे महत्वाचा आहे.
मात्र अशा चुकीच्या गोष्टी लोकांच्या समोर आणून दिशाभूल करणे कधीही योग्य ठरत नाही.
यावर फॅक्टचेक करणारी वेबसाइट औल्टन्यूज नेही हे दावे खोडून काढले आहेत.
देशातील अनेक प्रसारमध्यमांनी मात्र नेहमीप्रमाणे तथ्य न शोधता कोरोना वर औषध शोधल्याची बातमी लावून धरली. अशाप्रकारे लोकांची दिशभुल करणे अयोग्य आहे,जर खरोखर औषध गुणकारी आहे आणि ते मानवजातीच्या उपयोगाचे आहे. तर पंतजलीने रामदेव बाबाने त्याबद्दलचे योग्य पुरावे सादर करणे गरजेचे आहे.यामुळे लोकांचा फायदाच होईल आणि लोकांच्या मनातील भीतीही दूर होईल,शिवाय कुणी संशय देखील घेणार नाही.
यात इंडिया टीव्ही चे मुख्य संपादक रजत शर्मा देखील आहेत.
https://twitter.com/RajatSharmaLive/status/1363102825350189056
जनतेला सत्य आणि योग्य माहितीचा अधिकारांपासून वंचित राहावे लागेल.
इंडिया टीव्ही चे मुख्य संपादक रजत शर्मा यांना याबाबत जनतेने प्रश्न विचारले असता त्यांनी उत्तर देणे टाळले आहे.
ते स्वत: एडिटर्स गील्ड मध्ये सदस्य असून लोकाना सत्य आणि योग्य माहिती देण्यासाठी एडिटर्स गील्ड ने काही नियमावली आखली आहे.
मात्र ती सदस्यच पायदळी तुडवत असतील तर जनतेला सत्य आणि योग्य माहितीचा अधिकारांपासून वंचित राहावे लागेल.
प्रत्येक प्रसार माध्यमांच्या मुलाखातीत रामदेव बाबा एक गोष्ट सतत मांडत होते की लोकाना एलोपॅथीवर विश्वास असतो,
लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात मात्र आयुर्वेद म्हटले की लोक लगेच संशय घेतात
आणि अशी एक गॅंगच आहे असा बेछूट आणि बेजबाबदार आरोपही ते करतात.
मात्र आपल्या औषधांबद्दलची गुणवत्ता त्यांची उपयोगिता त्यांचे रिसर्च पेपर हे सगळं ते जनतेसमोर प्रश्न उपस्थित करणाऱ्या समोर न ठेवता त्यांना भावनिक स्तरावर गळी उतरविण्यास का उत्सुक असतात हा एक चिंताजनक प्रश्न आहे.तुमचं औषध शंभर टक्के गुणकारी आहे तर तुम्हाला अशा खोट्या गोष्टींचा आधार का घ्यावा लागतो हा मिलियन डॉलर प्रश्न जनतेला पडत असेल तर त्यात चुकीचे काही नाही. जागतिक
लेटेस्ट अपडेट
जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या उपचारांसाठी कोणत्याही पारंपारिक उपचारांना परवानगी दिलेली नाही तसंच अशा उपचारांचा दावा करत असलेल्या कोणत्याही संस्थेला सर्टिफिकेट्ही दिलेलं नाही.असं स्पष्ट करून या दाव्यातील हवाच काढून घेतली आहे.(Coronil is not WHO certified)
टीम जागल्या भारत
हेही वाचा.. गाढवाच्या लीद पासून खाण्याचा मसाला,हिंदू युवा वाहिनीचा नेता अटकेत
First Published on February 21 , 2021 15 :45 pm
Web Title – patanjalis-coronil-is-neither-who-certified-nor-approved