तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या ‘सनातन धर्म’ वरील वक्तव्यामुळे देशभरात खळबळ माजली असून हिंदुत्ववादी गटांकडून त्यांना धमक्या मिळाल्या आहेत. नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असणारे अयोध्येतील तपस्वी छावणी मंदिराचे मुख्य पुजारी परमहंस आचार्य यांनी ही धमकी दिली आहे. पुजारी परमहंस आचार्य म्हणाले की, जो उदयनिधी यांचे छिन्नविच्छिन्न शीर आणेल, त्याला मी 10 कोटी रुपयांचे बक्षीस देईन.असं जाहीर केलंय,यावर सरकारकडून कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही.उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचे समर्थन सुप्रसिद्ध दिग्दर्शक पा रंजित यांनी केले आहे,इतकेच नाहीतर मी स्पष्टपणे उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबत उभा आहे असंही म्हटलंय.pa ranjith support udhayanidhi-stalin-to-his-sanatana-dharma-remark
नेमकं काय म्हणाले पा रंजित ?
पा रंजित यांनी ट्विटर (x ) वर ट्विट करत म्हटलं की मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचे सनातन धर्म निर्मूलन संदर्भात आवाहन करणारे विधान हे शतकानुशतके जातिविरोधी चळवळीचे मुख्य तत्व आहे. जाती आणि लिंगाच्या नावाखाली चालणाऱ्या अमानुष प्रथांचं मूळ सनातन धर्मात आहे. क्रांतिकारी नेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अयोतेदास पंडितर,पेरियार स्वामी, महात्मा फुले, संत रविदास यांसारख्या जातिविरोधी सुधारकांनी त्यांच्या जातीविरोधी विचारसरणीचा पुरस्कार केला आहे.
मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानाचा विपर्यास करून त्याचा गैरवापर करत नरसंहाराची हाक देण्याची दुष्ट वृत्ती अस्वीकार्य आहे. त्यांच्या विरोधात वाढता द्वेष अत्यंत त्रासदायक आहे.
सामाजिक न्याय आणि समता असलेला समाज प्रस्थापित करण्यासाठी
सनातन धर्माचे निर्मूलन करण्याचे आवाहन करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांच्या शब्दांच्या समर्थनार्थ मी उभा आहे.
मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना माझे समर्थन!
असं ट्विट केल्यानंतर अनेकांनी पा.रंजित यांना समर्थन दिले आहे.तसेच हजारोच्या संख्येने हे ट्विट लोक शेअर करत आहेत.
पुजारी परमहंस आचार्य ने दिली धमकी
अयोध्येतील तपस्वी छावणी मंदिराचे मुख्य पुजारी परमहंस आचार्य यांनी ही धमकी दिली आहे.
पुजारी परमहंस आचार्य म्हणाले की, जो उदयनिधी यांचे छिन्नविच्छिन्न शीर आणेल, त्याला मी 10 कोटी रुपयांचे बक्षीस देईन.
जर त्याला कोणी मारले नाही तर मी मारेन.असंही हा पुजारी म्हणाला आहे.
या धमकीनंतर उदयनिधी स्टॅलिन यांनीही प्रत्युत्तर देताना सांगितले की, माझे डोके कापणाऱ्याला 10 कोटी रुपये देण्याचे परमहंस आचार्य यांनी सांगितले आहे, मात्र माझ्या डोक्यासाठी भांग पाडायला फक्त 10 रुपयांचा कंगवा पुरेसा अशा शब्दांत खिल्ली उडवली आहे. “अशा प्रकारच्या धमक्या आमच्यासाठी काही नवीन नाहीत… मी अशा व्यक्तीचा नातू आहे ज्यांनी तामिळनाडूसाठी आपले प्राण अर्पण केले आहेत. तामिळनाडूचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या करुणानिधी यांनी पेरियार यांनी सुरू केलेल्या विवेकवादी आणि ब्राह्मणविरोधी द्रविड चळवळीचे नेतृत्व केले होते.”
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 06,2023 | 14:06 PM
WebTitle – pa ranjith support udhayanidhi-stalin-to-his-sanatana-dharma-remark