चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलीन यांच्या सनातन धर्म संबंधित वक्तव्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे,अनेक हिंदुत्ववादी गटांनी त्यांना ट्विटरवर ट्रोल करायला सुरुवात केलीय.उदयनिधी स्टॅलीन यांच्या बहाण्याने भारतीय जनता पक्षासह उजव्या विचारसरणीच्या गटांनी द्रमुकवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला.भावना दुखावणारे वक्तव्य केल्याबद्दल एका वकिलाने उदयनिधी यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रारही केली आहे. मात्र उदयनिधीही सनातन धर्म संबंधातील आपल्या विधानावर ठाम आहेत. आपण कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर कारवाईला तयार आहोत, असे आव्हानच त्यांनी विरोधकांना दिले आहे.
सनातन धर्म हा डेंग्यू मलेरिया प्रमाणे,त्याचं उच्चाटन करायला हवं उदयनिधी स्टॅलीन
शनिवारी एका कार्यक्रमात उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली.सनातनला विरोध करू नये, तर डेंग्यू, मलेरियाप्रमाणे या रोगाला समूळ नष्ट केलं पाहिजे, असे ते म्हणाले होते.उदयनिधींच्या या विधानाने द्रविड राजकारण करणाऱ्या द्रमुकला फारसा फरक पडणार नाही, पण उदयनिधींच्या सनातनबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी विरोधी पक्ष आघाडीच्या (I.N.D.I.A.) नेत्यांवर दबाव वाढत आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप मीडिया सेलचे प्रमुख अमित मालवीय याच्यासह भाजप नेत्यांनी उदयनिधी यांचे विधान गणिती राजकारणाचा भाग असल्याचा आरोप केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार उदयनिधी यांच्या वक्तव्याचे वर्णन अमानवीय आहे.भाजप नेते यासिर जिलानी यांनी त्यांना सनातन धर्माविषयी वाचण्याचा सल्ला दिला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, सनातनला चिरडणाऱ्यांची राख झाली आहे, ज्यांनी हिंदूंना संपवण्याची स्वप्ने पाहिली त्यांची राख झाली आहे. सनातन होता,सनातन आहे सनातन राहील.
उदयनिधी स्टॅलिन हे आपल्या विधानावर ठाम असले तरी लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी इंडिया आघाडीला अडचण केली असल्याचे बोलले जात आहे.उत्तर भारताच्या राजकारणात राम, गाय, गंगा आणि हिंदुत्व असे मुद्दे बनले आहेत, ज्यामुळे काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अलिकडे राजकारण बदललं आहे. राहुल, प्रियांका, लालू यादव, अखिलेश यादव असे नेते मंदिर ते मंदिर फिरत आहेत. आता हे नेते उदयनिधींच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष कसे करणार? तामिळनाडूमध्ये काँग्रेस द्रमुकचा जुना निवडणूक भागीदार आहे.
उदयनिधी यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन केले
पेरियार आणि अण्णादुराई यांच्या द्रविड चळवळीला तामिळनाडूच्या राजकारणात पाच दशकांचा इतिहास आहे.
उदयनिधी स्टॅलिन यांचे आजोबा आणि द्रमुकचे ज्येष्ठ नेते करुणानिधी यांनी
1965 पासून द्रविड चळवळीच्या ज्योतीवर राजकारण धगधगत ठेवले होते.
1965 मध्ये दक्षिणेकडील राज्यांमध्ये हिंदीला राजभाषा बनवण्याविरोधात आंदोलने झाली.
तमिळनाडूमध्ये करुणानिधी यांनी हिंदीविरोधी आंदोलनाचे नेतृत्व केले आणि ते राज्याच्या राजकारणात मजबुतीने प्रस्थापित झाले.
अण्णादुराई यांच्यानंतर करुणानिधी यांनी १९६९ मध्ये तामिळनाडूची सूत्रे हाती घेतली,
तेव्हा तमिळ राजकारणात हिंदीविरोधी आणि तमिळ अस्मितेचा अभिमान हा मुद्दा आवश्यक झाला.
उत्तर, पूर्व आणि पश्चिम भारतात भाजपने हातपाय पसरले असले तरी
दक्षिण भारतात विशेषत: तामिळनाडूमध्ये भाजपला अजूनही प्रवेश करता आलेला नाही.
त्याचं कारणही याच द्रविड राजकारणात आहे.भाजप तिकडे घुसण्याच्या तयारीत असल्याने
तामिळ राजकारणात भाजपच्या प्रवेशापूर्वी तामिळ संगम सारख्या कार्यक्रमांनी, द्रमुकने आपल्या जुन्या ओळखीच्या
द्रविडीय राजकारणाला धार देण्यास सुरुवात केली आहे.सनातनसंदर्भातील उदयनिधी स्टॅलिन चे विधान ही त्या राजकारणाची नांदी आहे.
उदयनिधी द्रविड राजकारणाचे वारस
तामिळनाडूमध्ये तमिळ भाषिक मुस्लिमांची लोकसंख्या ४५ लाख मानली जाते. तमिळ मुस्लिम डीएमके, मनिथय्या मक्कल कांची आणि एआयएडीएमकेला मतदान करत आहेत. हिंदूंची लोकसंख्या अंदाजे 6.50 कोटी आहे.200 हून अधिक विधानसभांमध्ये मुस्लिम मतदारांचे प्राबल्य आहे, जेथे अल्पसंख्याक मतदारांची संख्या 5000 ते 80 हजार दरम्यान आहे. तमिळनाडूमध्ये दलित मतदारांची लोकसंख्याही २० टक्के आहे.काँग्रेस, द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांनाही ही मते मिळत आहेत. कोईम्बतूरसारख्या भागातही ख्रिश्चन मतदारांची संख्या चांगली आहे. हिंदीविरोधी राजकारणाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा स्थितीत केवळ भाषेच्या आधारे मतांचे एकत्रीकरण शक्य नाही.
उदयनिधींनी सनातनवर वक्तव्य करत द्रविड चळवळ भाग-2 ला हवा दिली आहे. सीएम स्टॅलिन मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपला मुलगा उदयनिधी यांना मंत्री करून आपला उत्तराधिकारी जाहीर केला आहे. सनातनच्या वादानंतर द्रविड राजकारणात त्यांची प्रस्थापित होण्याची शक्यता वाढली आहे.
जालना लाठीचार्ज, या सात जिल्ह्यात बंद ची हाक,जाळपोळ, नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 04,2023 | 16:45 PM
WebTitle – Sanatan Dharma is like dengue malaria, it should be eradicated Udayanidhi Stalin