कोरोना महामारीपासून देशवासियांना दिलासा देणाऱ्या आणि जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम असा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शनिवारी उद्घाटन करण्यात आले.त्याचा प्रसारमध्यमांनी नेहमीप्रमाणे इव्हेंट देखील केला.अनेक महिन्यांपासून सर्वांनाच प्रतीक्षा असलेल्या कोरोना लसीच्या वापराला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.कोव्हॅक्सिन चाचणी लसीच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह
मात्र, ‘कोव्हॅक्सिन’ या संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या लसीबाबतच्या चाचणी उपलब्ध माहितीच्या अभावामुळे लस घेणाऱ्यांना त्याच्या धोका संभवत असून लसीचा त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे सांगत या लसीच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
तिसऱ्या टप्याच्या चाचण्या अद्याप चालू
भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ला अद्याप पूर्णपणे मान्यता मिळालेली नाही. कंपनीने त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीचे निष्कर्ष आणि आकडेवारी कुठेही कागदोपत्री प्रसिद्ध केलेली नाही. आपत्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी’ `कोव्हॅक्सिन’ला डीसीजीआयनं ‘मंजूरी दिलेली आहे. लसीच्या चाचणीचा पहिला आणि दुसरा टप्या पूर्ण झाला असून तिसऱ्या टप्याच्या चाचण्या अद्याप चालू आहेत. या आशयाच्या केंद्र सरकारने 3 जानेवारी रोजी जारी केलेल्या परीपत्रकाचाही उल्लेख या याचिकेतून केला आहे.
तर दुसरीकडे, मध्य प्रदेशात ‘कोव्हॅक्सिन’ चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून शवविच्छेदन अहवालानुसार, संदिग्ध विषबाधामुळे उद्भवलेल्या श्वसनच्या त्रासामुळे हा मृत्यू झाल्याचा दावाही याचिकाकर्त्याने या याचिकेतून केलेला आहे.यामुळे लसीच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
माहिती अधिकारांर्तगत याचिकाकर्त्यांनी अर्ज दाखल केला
डीसीजीआयकडे लस उत्पादक कंपन्यांनी सादर केलेला डेटा आणि तज्ज्ञ समित्यांचा अंतिम अहवाल आणि ‘कोव्हॅक्सिन’ विषयीची माहिती मिळविण्याकरता माहिती अधिकारांर्तगत याचिकाकर्त्यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्याला कोणतेही उत्तर न आल्यामुळे गोखले यांनी त्याविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
दुसरा एक मुद्दा अमेरिकास्थित मिलिंद पदकी यांनी मांडला आहे.
जगात रोज सुमारे सव्वा लाख लोक निरनिराळ्या कारणांनी मरतात. सध्या त्यात कोव्हिडचे सुमारे १०-१५,००० एक्स्ट्रा मरत आहेत. जगात सार्वत्रिक लसीकरण चालू आहे. आता “कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ पडू शकते”. त्यामुळे “व्हॅक्सिनेशन आणि त्यानंतर मृत्यू!” अशा केसेस येतच राहणार आहेत.
हा मृत्यू व्हॅक्सिनेशन ने झाला हे सिद्ध किंवा असिद्ध करणे वैज्ञानिक दृष्ट्या फारच अवघड असणार आहे.
ऍनाफिलॅक्टिक शॉक (सध्याचे नोंदणीकृत प्रमाण १ लाखात १) घाबरविणारा असतो, पण त्यावर उत्तम उपचार होऊ शकतो.
कोव्हिडचा धोका ज्यांना सर्वाधिक आहे ( ८०+, इम्यून-दुबळे, कॅन्सर /किडनी/लिव्हरफेल्युअरने ग्रस्त इत्यादि ) अशाना घाईघाईने आधी व्हॅक्सिन दिले जात आहे.
नॉर्मल लोकांनी लस घ्यायची की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न
त्यातून “तशा ” लोकांचे नॉर्वेत २३ आणि जर्मनीत १० मृत्यू झालेले दिसतात.
त्या लोकांची वृद्ध आणि मरणासन्न स्थिती बघता त्यांना व्हॅक्सिन द्यायला नको होते अशी पश्चातबुद्धी आता होते आहे,
आणि ती योग्यही आहे.बाकी नॉर्मल लोकांनी लस घ्यायची की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे,आणि हे स्वातंत्र्य असलेच पाहिजे.
हा “किती रिस्क तुम्हाला भावनिक दृष्ट्या परवडते?” साधा प्रश्न आहे.
बाकी व्हायरस-प्रसाराने वृद्ध/इम्यून दुबळे मरु नयेत, राजकारण्यांनी वारंवार लॉक-डाऊन करून लोकांचे रोजगार हिरावू नयेत,
भारतातून आत-बाहेर आंतर-राष्ट्रीय प्रवास परत सुरु व्हावा ही इतर कारणे देता येतीलच.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)