नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. दोन हजार च्या नोटा जमा करण्याच्या प्रक्रियेला देशभरातील सर्व बँकांमध्ये सुरूवात झाली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या वार्षिक अहवालात ५०० रुपयांच्या नोटांच्या संदर्भात देखील मोठा खुलासा करण्यात आला आहे. 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी दिलेली 30 सप्टेंबरची मुदत संपण्यापूर्वीच 500 रुपयांच्या नोटांशी संबंधित ही अडचण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकेसमोर आली आहे.
2000 रुपये मूल्य असणाऱ्या नोटा बंद केल्यानंतर देशात चलन व्यवस्थेत असणाऱ्या सर्वात मोठे मूल्य असणाऱ्या
पाचशे रुपयांच्या चलनी नोटा रिझर्व्ह बँकेसाठी आता मोठी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसत आहे.
अहवालानुसार, 500 रुपयांच्या बनावट नोटांची भारतीय बाजारपेठेत सातत्याने वाढ होते आहे.
2022-23 मध्ये 500 रुपयांच्या सुमारे 91 हजार 110 बनावट नोटा पकडण्यात आल्या,
जे 2021-22 च्या तुलनेत 14.6 टक्क्यांनी जास्त आहे. सन 2020-21 मध्ये 500 रुपयांच्या 39,453 बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या.
सन 2021-22 मध्ये एकूण 76 हजार 669 किमतीच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या.
2000 च्या बनावट नोटांची संख्या घटली
बनावट नोटांच्या (Fake Currency) पुनर्प्राप्ती प्रकरणांमध्ये 500 रुपयांच्या नोटांव्यतिरिक्त 2000 रुपयांच्या बनावट नोटांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यांची संख्या कमी झाली असली आणि 2022-23 या आर्थिक वर्षात 2000 रुपये मूल्य असणाऱ्या बनावट नोटांची संख्येत 28 टक्क्यांची घट होऊन आता ती 9 हजार 806 नोटांवर आली आहे. 500 आणि 2 हजार रुपयांच्या नोटांशिवाय 100, 50, 20, 10 रुपये मूल्य असणाऱ्या बनावट नोटा पकडण्यात आल्या आहेत. आरबीआयच्या अहवालानुसार, बँकिंग क्षेत्रात एकूण 2 लाख 25 हजार 769 बनावट नोटा पकडल्या गेल्या होत्या, तर गेल्या वर्षी 2 लाख 30 हजार 971 च्या बनावट नोटा सापडल्या होत्या.
20 रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत देखील वाढ झाली असून,
यावेळी दोन हजार,500 रुपये मूल्य असणाऱ्या व्यतिरिक्त 20 रुपये मूल्य असणाऱ्या बनावट नोटांच्या संख्येतही वाढ होताना दिसते आहे.
2022-23 मध्ये 20 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 8.4 टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे 10 रुपये मूल्य असणाऱ्या बनावट नोटांच्या संख्येत 11.6 टक्क्यांनी घट झाली आहे, तर 100 रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत 14.7 टक्क्यांनी घट झाल्याचे समोर आले आहे. बनावट नोटांव्यतिरिक्त आरबीआयने आपल्या वार्षिक अहवालात नोटांच्या छपाईबाबतही संपूर्ण माहिती दिली आहे. आरबीआयने 2022-23 मध्ये नोटांच्या छपाईसाठी एकूण 4 हजार 682.80 कोटी रुपये खर्च केले होते. भारतीय चलन छपाई करण्याचा खर्च 2021-22 सालात 4 हजार 984.80 कोटी रुपये इतका होता
10 आणि 500 च्या नोटांचा भारतीय बाजारपेठेत चलन व्यवस्थेत मोठा वाटा असल्याचे दिसते.
बाजारात 10 आणि 500 रुपयांच्या नोटा सर्वाधिक चलनात आहेत. 31 मार्च 2023 पर्यंत व्हॉल्युमनुसार,
देशातील एकूण चलनापैकी 37.9 टक्के चलन हे 500 च्या नोटांचे आहे.
तर 10 रु.मूल्य असणाऱ्या नोटेचा यात 19.2 टक्के वाटा आहे.
एकूण सर्व परिस्थिती पाहता आता 500 रुपये मूल्य असणाऱ्या बनावट नोटांची
भारतीय अर्थव्यवस्थेतून सफाई करण्याची मोठी जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची आहे.
स्कॉलरशिप घोटाळा : ब्राह्मण आणि राजपूत मागास जातीचा दावा करून १० कोटींची शिष्यवृत्ती हडप
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 01, JUN 2023, 11:45 AM
WebTitle – Now big update on 500 rupees fake note,RBI’s tension increased