बेंगळुरूमध्ये एनडीएला सत्तेवरून दूर करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली २६ राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्ष एकत्र आले असले, विरोधकांची आघाडी झाली असली आंबेडकरी दलित चेहरा असलेला पक्ष या आघाडीत दिसत नाही. दलितांशिवाय विरोधी एकजूट प्रभावी ठरणार का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे! या बैठकीत हिंदी भाषिक पट्यातील उत्तरेकडील, उत्तर प्रदेशातील आंबेडकरी दलित वर्गामध्ये मजबूत पकड असलेल्या कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधित्व असणारा पक्ष सामावून घेतला गेला नाही.हिंदी भाषिक पट्यातील आंबेडकरी दलित राजकारणातील महत्वाचा चेहरा असणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती तसेच दुसरीकडे महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडी प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय जाणकारांना देखील आश्चर्य वाटत आहे.
हीच गोष्ट विरोधकांच्या आघाडीला देश पातळीवर अडचणीची ठरू शकते
या दोघांच्या अनुपस्थितीमुळे विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
खरे तर, 2024 मध्ये, आंबेडकरी दलितांच्या पाठिंब्याशिवाय यूपी, आणि महाराष्ट्रातील निवडणूक लढाईत
यश मिळवणे केवळ कठीणच नाही तर अशक्य मानले जात आहे.
अशावेळी या दोन जेष्ठ आणि दीर्घकाळ राजकारणाचा अनुभव आणि निश्चित अशी मतांची टक्केवारी सोबत असणाऱ्या
मायावती आणि ॲड.प्रकाश आंबेडकर यांना स्थान असण्यास काही हरकत नव्हती,
मात्र विरोधकांनी आंबेडकरी राजकारण अनुषंगाने आंबेडकरी समाजाला सत्तेत वाटा देण्यास पुन्हा एकदा नाक मुरडल्याचे दिसून येत आहे.
हीच गोष्ट विरोधकांच्या आघाडीला देश पातळीवर अडचणीची ठरू शकते.
दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?
सध्याच्या विरोधी पक्षातील आघाडीत आंबेडकरी विचारांवर राजकारण करणारा एकही पक्ष नाही,जे पक्ष आहेत,ते एकतर बहुजनवादी आहेत. किंवा तथाकथित उच्चजातीयांच्या भल्याचे धोरण आखणारे असेच पक्ष आहेत,जे नाव तर सतत फुले शाहू आंबेडकरांचे घेतात मात्र सत्तेत आल्यावर त्यांचे धोरण वेगळे असते,याचा अनुभव त्यांच्या सत्तेत जनतेने घेतलेला आहे,त्यामुळे शुद्ध आंबेडकरी राजकारण करणारा एकही पक्ष या आघाडीत नाही. असं मत राजकीय जाणकार आंबेडकरी चळवळ अभ्यासक साक्य नितीन यांनी जागल्याभारत शी बोलताना व्यक्त केलं.
आंबेडकरी समाजाला गृहीत धरण्यात आलंय की दुजाभाव केला जात आहे असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.
INDIA मध्ये आंबेडकरी विचारधारा प्रमाण मानणारा कोणताही पक्ष का दिसत नाही? असा प्रश्न संदीप यांनी विचाराला आहे.
बंगळुरू मध्ये झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देश पातळीवरील २६ राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी एकत्र येत नविन आघाडी स्थापन केली असून तिचे नाव INDIA असं ‘इंडिया’ (भारत) ठेवण्यात आलं आहे.
विरोधकांच्या नव्या आघाडीच्या इंडिया या नावाचा अर्थ काय?
विरोधकांच्या इंडिया या आघाडीचं पूर्ण नाव INDIA – इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स.असं आहे.
What is the meaning of the name India of the opposition’s new front?
INDIA – Indian National Developmental Inclusive Alliance.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 18,2023 | 23:02 PM
WebTitle – No Ambedkrite party in opposition alliance will people accept?