मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी नंतर बॉम्ब फोडणार असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती.त्याप्रमाणे आज त्यांनी मुंबई मध्ये पत्रकार परिषद घेतली.माय मराठीची क्षमा मागून आजची पत्रकार परिषद सुरुवातीला आपण राष्ट्रभाषेत करणार आहोत. मी एक घोषणा केली होती दिवाळीनंतर काही गोष्टी समोर आणणार आहे. उशीर झाला, काही कागदपत्रे गोळा करणे सुरू होते.काही लोकांच्या पत्रकार परिषदेच्या तारखा अगोदरच बुक होत्या.यामुळे मला थोडा उशीर झाला. मी जे सांगणार आहे ना ती सलीम जावेद यांची कथा नाही. ना तो इंटरवल नंतरचा चित्रपट नाही. हा एक राष्ट्राच्या सुरक्षेबद्दलचा मुद्दा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांवर खळबळजनक आरोप केले आहेत. नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
सरदार शहावली खान आणि सलीम पटेल कोण?
मी दोन कॅरेक्टर बद्दल सांगणार आहे.सरदार शहाबली खान हा 1993 चे गुन्हेगार आहे. त्यांना जन्मठेप झाली आहे आणि ते आता तुरुंगात आहेत. त्यांची शिक्षा सुप्रीम कोर्टानं कायम केली आहे. सरदार शहाबली खान याच्यावर टायगर मेमन याच्या नेतृत्त्वात फायर ट्रेनिंग मध्ये सहभागी होते.तसेच आणि बॉम्बे स्टॉक एक्सेंजमध्ये आणि मुंबई महानगर महापालिका या दोन्ही बिल्डिंगमध्ये बॉम्ब कुठे ठेवायचा याची रेकी केली होती. टायगर मेमनच्या घरी बैठक झाली होती. अल हुसेनी या टायगर मेमनच्या घरात गाडीत आरडीएक्स भरलं गेलं त्यामध्ये सरदार शहाबली खानचा समावेश होता. सरकारी साक्षीदारांच्या साक्षीनंतर त्यांना शिक्षा भोगावी लागत आहे.
दुसरी व्यक्ती सलीम पटेल आहे. तुम्हाला आठवत असेल स्वर्गीय आर.आर.पाटील एका इफ्तार पार्टीत गेले होते. त्यामध्ये आर.आर. पाटील यांचा यात काही दोष नव्हता. सलीम पटेल याच्यासोबत फोटो चालवला गेला होता.दाऊदचा माणूस म्हणून ज्याला सांगितलं गेलं तो हा सलीम पटेल हा हसीना पारकरचा ड्रायव्हर होता. बॉडीगार्ड सुद्धा होता.जेव्हा 2007 मध्ये हसीना पारकरला अटक झाली त्यावेळी सलीम पटेलला देखील अटक करण्यात आली होती. दाऊद फरार झाल्यानंतर हसीना पारकरच्या नावावर संपत्ती जमा करण्यात येत होती. सलीम पटेलच्या नावावर पॉवर ऑफ अटर्नी करण्यात येत होती, असा दावा फडणवीस यांनी केला.
सॉलिडसमध्ये नवाब मलिक यांचे कुटुंबीय – फडणवीस
कुर्ला येथे एक 3 एकर जागा आहे.1 लाख 23 स्क्वेअर फुट जमीन होती. याला गोवावाला कंपाऊंड म्हटले जाते. ही जमीन एलबीएस रोडवर आहे. ही जमीन आहे याची एक रजिस्ट्री सॉलिडस नावाच्या कंपनी सोबत झाली. मी त्याचे कागदपत्र तुम्हाला दिले आहेत.या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी सलीम पटेल याच्या नावावर आहे. विक्री सरदार शहा वली याच्या नावावर आहे. या दोघांनी मिळून विक्री केलीय सॉलिडस कंपनीला ही कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे. या कागदपत्रावरील सही फराज मलिक यांची आहे. सॉलिडसमध्ये 2019 मध्ये नवाब मलिक स्वत: देखील होते. काही वेळ त्यावर ते होते मंत्री बनल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.त्यावेळी त्याठिकाणच्या रेडी रेकनरदर काय आहे तुम्हाला माहीत असेल. या फोनिक्स मार्केटच्या जमिनीची खरेदी झाली 2053 रुपये स्वे. फीटने झाली. आणि अंडरवल्डच्या लोकांकडून घेतलेली जमीन 3 एकर खरेदी झाली 30 लाखात, त्यातील 20 लाखांचंच पेमेंट झालं. यातील सलीम पटेलला 15 लाख मिळाले आणि 10 लाख शाह वली खान म्हणजेच सरदार खानला मिळाले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जय भीम मुवी मधील प्रकाश राजच्या ‘झापड मारण्याच्या’ सीनने नवा वाद
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 09, 2021 15:21 PM
WebTitle – Nawab Malik, why did you do business with the Mumbai killers? – Devendra Fadnavis