नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड केस (National Herald Case) प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने आता 23 जून रोजी सोनिया गांधींना चौकशीसाठी बोलावले आहे. यासाठी ईडीने काँग्रेस अध्यक्षांना नव्याने समन्स पाठवले आहे. या प्रकरणी सोनिया गांधी 8 जून रोजी ईडीसमोर हजर होणार होत्या, मात्र कोरोनाची लागण झाल्यामुळे त्या हजर होऊ शकल्या नाहीत.
त्यांनी ईडीकडे तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. नॅशनल हेराल्ड केस (National Herald Case) प्रकरणाशी संबंधित सोनिया गांधी यांना दिल्लीत ईडीसमोर हजर राहण्यासाठी 23 जून ही नवीन तारीख देण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ईडी त्याची चौकशी करणार आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी 13 जूनला ईडीसमोर हजर होणार आहेत. काँग्रेस त्यादिवशी दिल्लीसह देशभरात ईडी कार्यालयासमोर धरणे, निदर्शने, रॅली आणि सत्याग्रह करण्याची तयारी करत आहे.
दुसरीकडे काँग्रेसने या सत्याग्रह आणि निषेधाची घोषणा केल्यानंतर भाजप आमदार राजेश्वर सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधत कायदा नेहमीच काँग्रेसच्या वर असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस नेत्यांनी ईडीच्या तपासात सहकार्य करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एसआयटीसमोर हजर राहून कायद्याचे पालन केले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.
काय आहे संपूर्ण प्रकरण
1 नोव्हेंबर 2012 रोजी सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात केस दाखल केली होती. या प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांना आरोपी करण्यात आले होते. मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन झाले. आता हे प्रकरण राऊस अव्हेन्यू येथील विशेष न्यायालयात सुरू आहे.
असा आरोप आहे की यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडने असोसिएटेड जर्नल्सच्या 90.25 कोटी रुपयांच्या वसुलीचे अधिकार मिळवले,
तर हा अधिकार मिळवण्यासाठी केवळ 50 लाख रुपये दिले गेले.
या प्रकरणात 19 डिसेंबर 2015 रोजी पटियाला हाऊस कोर्टाने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सर्व आरोपींना नियमित जामीन मंजूर केला होता. आयकर विभाग आणि ईडीनेही दखल घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला. 2014 मध्ये नोंदवलेल्या प्रकरणात ईडीने 2019 मध्ये 64 कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त केली होती.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
राज्यसभा निवडणूक,आघाडीची मते फुटली – फडणवीसांची स्ट्रेटेजी यशस्वी
नूपुर शर्मा च्या अटकेच्या मागणीवरून हिंसाचार, रांचीमध्ये संचारबंदी
भीमा कोरेगाव चौकशी समितीचे मुख्यमंत्र्यांसह 6 राजकीय पक्षांना समन्स
दलित मुलाशी प्रेम ; पित्याने केली मुलीची हत्या : आई पाहत राहिली
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
Samrat Prithviraj Review : प्रेक्षकांनी टॅक्स फ्री सम्राट पृथ्वीराज का नाकारला?
Samrat Prithviraj Box Office Collection पहिल्याच दिवशी निराशा
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 11 2022, 08 : 20 AM
WebTitle – National Herald Case: ED sends new summons to Sonia Gandhi, asking her to join probe on June 23