राजस्थान : २१ व्या शतकातही अस्तित्वात नसलेल्या जातीच्या अहंगंडातून खून करण्याचे प्रकार पाहायला मिळत आहेत.जात व्यवस्था हा हिंदू धर्माचा पाया असल्याने या गोष्टी कधी थांबणार हे सांगणे कठीण आहे.अर्थात जात आधारित समाज जात त्यागण्यास तयार झाला तर कित्येक निरपराध लोकांचे जीव वाचतील.पदोपदी होत असणाऱ्या हेटाळणी अपमानजनक वागणूक थांबेल.हिंदू धर्मातील तथाकथित खालच्या जातीतील म्हणजे हिंदू-दलित व्यक्तीने मिशी ठेवली,चांगले कपडे परिधान केल्याने,चांगले शिक्षण घेतल्याने,चांगले घर बांधल्याने,लग्नाच्या वरातीत घोडीवर बसल्याने हिंदू धर्मातीलच तथाकथित उच्च जातीयवादी लोकांकडून खून केले जातात.अशीच एक घटना राजस्थानमध्ये घडलीय.राजस्थानच्या (rajasthan) पाली (pali) जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, बाली येथील सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या कोविड आरोग्य सहाय्यकाची सार्वजनिकरित्या भोसकून हत्या करण्यात आली आहे. बरवा गावात राहणाऱ्या जितेंद्र मेघवाल (jitendra meghwal murder) यांची मंगळवारी दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी भोसकून हत्या केली.
जितेंद्र मेघवाल कोविड रुग्णालयात सहाय्यक
जितेंद्र मेघवाल हे सरकारी कोविड रुग्णालयात सहाय्यक पदावर कार्यरत होते.नोकरी लागल्याने जितेंद्र यांचे राहणीमान सुधारले होते.ते सोशल मिडीयावर ऍक्टिव्ह असायचे.आपले फोटो,सेल्फी शेअर करायचे.
मंगळवारी झालेल्या खून प्रकरणात पाली पोलिसांना गुरुवारी मोठे यश मिळाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जितेंद्र मेघवाल यांच्या दोन्ही मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. बाली एएसपी ब्रिजेश सोनी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर दोन्ही आरोपींना पाली जिल्हा मुख्यालयात पाठवण्यात आले आहे.हल्लेखोरांनी जितेंद्र यांच्यावर चाकूने सात वेळा हल्ला केला, घटनेनंतर मृताचे नातेवाईक आणि ग्रामस्थ आरोपींना पकडण्याच्या मागणीसाठी बाली रुग्णालयाबाहेर धरणे धरून बसले होते. मृतदेह स्वीकारण्यास नकार देत मृताचे नातेवाईक बाली-सादडी रस्त्यावर शासकीय रुग्णालयासमोर तंबू ठोकून बसले होते.
हत्येविरोधात निदर्शने
सुरज सिंग उर्फ सुरेश राजपुरोहित, आणि बरवा येथील रमेश सिंग राजपुरोहित अशी आरोपींची नावे आहेत.
मृतदेह सुमेरपूर रुग्णालयाच्या मोर्चात ठेवण्यात आला आहे.येथे मेघवाल समाजासह दलित संघटनांनी हत्येविरोधात बाली रुग्णालय ते रंजन चौकापर्यंत निदर्शने करण्यात आली.
आराेपींच्या अटकेची मागणी करत ते धरणे आंदोलनात बसले, त्यावरून त्यांना रात्री उशिरापर्यंत समजविण्याचे प्रयत्न सुरू होते. एसपी राजन दुष्यंत म्हणाले की जितेंद्रपाल यांचा मुलगा देवराम मेघवाल रहिवासी बरवा आणि हरीश वर्मा रहिवासी लुनावा हे दोघेही बाली रुग्णालयात कोविड आरोग्य सहाय्यक आहेत. मंगळवारी सुट्टी संपवून दोघेही घरी परतत होते. हरीश दुचाकी चालवत होता.
बाईकवरून पाठीमागून केला हल्ला
जितेंद्र मागे बसला होता. सेसली मार्गावर दुचाकी घेऊन आलेल्या बरवा येथील सुरजसिंग आणि रमेश सिंग यांनी जितेंद्रची मागून चाकूने वार करून हत्या केली. कोपऱ्यात चाकू फेकून हल्लेखोर पळून गेले. हरीशच्या माहितीवरून 108 रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी जितेंद्रला बाली रुग्णालयात नेले.तेथून त्याला सुमेरपूरला रेफर करण्यात आले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मृताच्या शरीरावर 7 जखमा होत्या, त्यापैकी 3 जखमा पाठीच्या कण्याला, 1 मानेला आणि 3 पोटात. मृतदेह सुमेरपूर शवागारात ठेवण्यात आला. माहिती मिळताच एएसपी ब्रजेश सैनी, सीओ बाली अचल सिंग देवरा यांच्यासह अधिकारी घटनास्थळी पोहोचले.हॉस्पिटलमधून ड्युटी आटोपून जितेंद्र आपल्या सहकारी हरीश सोबत घरी परतत असताना मागून आलेल्या हल्लेखोराने त्याच्यावर चालत्या बाईकवरून वार केला.
मिशी ठेवली म्हणून या हिंदू-दलित तरुणाचा खून
जितेंद्र मेघवाल यांची हत्या ज्या निर्दयतेने करण्यात आली, त्यावरून दोन वर्षांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्याची घटना या हत्येमागील कारण असू शकत नाही, असे पोलिसांना वाटते. मृताचे सूरजसिंगसोबत जुने वैर होते, मात्र रमेश सिंगसोबत त्यांचे काहीही वैर नव्हते.दोघांनी चालत्या बाईकवरून जितेंद्रवर हल्ला केला, मात्र मृताचा सहकारी हरीश याला कोणत्याही प्रकारे मारहाण केली नाही. जितेंद्रला ज्या क्रूरतेने मारण्यात आले, त्यावरून हल्लेखोर यांच्या मनात प्रचंड द्वेष होता असे दिसते.
जितेंद्र मेघवाल मिशी ठेवत असे,आणि स्वतःचे मिशी असणारे फोटो सोशल मिडियात अपलोड करत असे.
जितेंद्र मेघवाल यांचे चांगले शरीर, चांगले राहणीमान आणि चांगल्या कपड्यांमुळे सूरज सिंह राजपुरोहित जळत होता.
यावरून त्यांच्यात वादावादी झाली, जी पुढे हाणामारीपर्यंत गेली.अशी माहिती समोर आली आहे.
2 वर्षांपासून वैर होते,मारेकरी सुरतहून बालीला आले
23 जून 2020 रोजी जितेंद्र मेघवाल हे आपल्या घराबाहेर बसले होते. त्याच गावातील सूरजसिंग राजपुरोहित याच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला. जितेंद्रची नजर वर करून कसाकाय बोलतो यावरून सुरजने टोकले होते. प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचले.सुरज आणि त्याच्या दोन साथीदारांनी जितेंद्र मेघवाल यांना मारहाण केली आणि त्यांच्या मदतीला आलेल्या त्यांच्या आईशीही त्यांनी असभ्य वर्तन केले. याबाबत जितेंद्र मेघवाल यांनी बाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.यावरून आरोपी सूरजसिंग राजपुरोहित त्याच्यावर नाराज होत होते. या प्रकरणी त्यांनी अनेकदा गुन्हा मागे घेण्यासाठी बोलण्यात आले पण जितेंद्र मेघवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांना ते मान्य नव्हते. जितेंद्रचे चांगले शरीर, राहणीमान आणि कपड्यांमुळे सूरज सिंह जळत असे. यावरून त्यांच्यात वादावादी झाली, जी पुढे हाणामारीपर्यंत गेली.
यांनतर हल्लेखोर सूरजसिंग राजपुरोहित कुटुंबासह सुरतला शिफ्ट झाला होता.
काही दिवसांपूर्वी गावात येऊन त्याने मंगळवारी जितेंद्र यांची हत्या केली.
या हत्येमागे जुन्या वैमनस्याच्या कारणाबद्दलही पोलीस विचार करत आहेत.
हल्लेखोरांनी केली होती रेकी
गुन्हा करण्याच्या मार्गावरून हल्लेखोरांनी जितेंद्रच्या येण्याजाण्याचा हालचालीचा मागोवा घेतल्याचे रेकी केल्याचे दिसते. मंगळवारी हरीशसह जितेंद्र 3 वाजता ड्युटी संपल्यानंतर हॉस्पिटलमधून बाहेर पडले.त्यांच्या दुचाकीचा वेग कमी होताच मागून आलेल्या दोन हल्लेखोरानी चाकूने हल्ला केला.
जितेंद्र मेघवाल शरीरयष्टीने मजबूत कणखर होते. त्यामुळेच हल्लेखोरांनी चालत्या दुचाकीवर मागून हल्ला केला. खाली पडल्यावर त्यांच्यावर चाकूने आणखी वार करण्यात आले.अशा अवस्थेतही जितेंद्र यांनी निकराने संघर्ष करत झुंज दिली.या झटापटीत हल्लेखोरांच्या हातातून चाकू खाली पडला.हल्लेखोर चाकू खाली सोडून तसेच पळून गेले.नंतर सोबतचे सहकारी हरीश यांनी अँब्युलन्स बोलवली.जिंतेद्र याना बाली रुग्णालयात गंभीर अवस्थेत आणण्यात आले,अशा अवस्थेतच त्यांनी हल्लेखोरांची नावे सांगितली.
जितेंद्र यांच्या हत्येचे प्रकरण विधानसभेत गाजले
विधानसभेत बालीचे आमदार पुष्पेंद्रसिंह राणावत आणि मारवाड जंक्शनचे आमदार खुशवीर सिंह जोजावर यांनी बाली भागातील बरवा गावातील रहिवासी जितेंद्र मेघवाल यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला. आरोपींना लवकरात लवकर अटक करणे, पीडितेच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणे, कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरी देण्याबाबत त्यांनी मागणी केली.
२१ व्या शतकातही अशाप्रकारची मानसिकता असून हिंदू धर्मातील तथाकथित उच्चजातीयांकडून आपल्याच धर्मातील तथाकथित खालच्या जातीतल्या हिंदू- दलित तरुणाला मिशी ठेवली म्हणून ,स्वतःच्या लग्नाच्या वरातीत घोडीवर बसून वरात काढणे यावरून खून केले जात असतील तर हे आजही समाज जातीयवादी रोगाने किती पछाडलेला आहे.जातग्रस्त होऊन सडला आहे.याची प्रचिती येते.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दर्जाचे दिग्गज खेळाडू
झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
झुंड मुव्ही: रितेश देशमुख यांची पोस्ट व्हायरल; दोन भारताचा विचार..
झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”
Jhund film।झुंड चित्रपट,आंबेडकरांचे पोस्टर व्हायरल,पाहा रिलीज डेट
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 18, 2022 12: 15 AM
WebTitle – Murder of Dalit youth for keeping mustache; Tension in the area