भारतीय लष्कराच्या “इलेकंट्रोनिक एन्ड मेकॅनिकल कॉर्प” मधे ३० वर्ष सेवा केल्यानंतर ऑगस्ट २०१७ ला वयाच्या ५२व्या वर्षी मोहम्मद सनाउल्लाह सन्मानाने निवृत्त झाले. त्यांनी कारगिल युद्धात देशाची सेवा केली होती. त्यांना देश सेवेसाठी राष्ट्रपती पदक सुद्धा मिळाले आहे. जुलै मधे NRC लिस्ट मधे त्यांचे नाव वगळले गेले आणि त्यांच्या आयुष्याने वेगळे वळण घेतले. ३० वर्ष लष्करात सेवा बजावलेले सनाउल्लाह घुसखोर ठरवले गेले. त्यांच्या सहित त्यांची दोन मुले सुद्धा घुसखोर ठरवले गेले आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव मात्र लिस्ट मधे आहे.
खोट्या रिपोर्टच्या आधारावर NRC लिस्ट मधून त्यांचे नाव वगळले गेले असे आता स्पष्ट झाले आहे.
जुलै २०१८ला #NRC लिस्ट मधून नाव वगळले गेल्यावर त्यांनी त्याविरोधात फॉरेनर ट्रिब्युनल मधे त्या विरोधात अपील केले मागितली मात्र ऑगस्ट २०१९ मध्ये त्यांचे अपील फेटाळले गेले. त्यानंतर घुसखोरांचा शोध घेणाऱ्या आसाम बॉर्डर पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांची रवानगी डिटेन्शन कॅम्प मधे केली. ३० वर्ष देशसेवा केलेले सनाउल्लाह घुसखोर ठरवले गेले. १२ दिवसानंतर गुवाहाटी हायकोर्टाने त्यांना बेल दिला आहे. त्यांची डिटेन्शन कॅम्प मधून सुटका झाली. डिटेन्शन कॅम्प मधे अनेक वयोवृद्ध लोक डांबून ठेवल्याचे त्यांनी संगीतले आहे.
विशेष म्हणजे स्वतः सनाउल्लाह निवृत्ती नंतर आसाम बॉर्डर पोलीस मधे नोकरीला लागले. त्यासाठी आवश्यक परीक्षा त्यांनी पास केल्या होत्या. त्यांच्याकडे १९३५ पासूनची कागदपत्रे आहेत पण फॉरेनर ट्रिब्युनलच्या ऑफिसरने तयार केलेल्या खोट्या रिपोर्टच्या आधारावर NRC लिस्ट मधून त्यांचे नाव वगळले गेले असे आता स्पष्ट झाले आहे. चौकशी अंती रिपोर्ट तयार करणाऱ्या तपास अधिकाऱ्याने साक्षीदार म्हणून ज्यांची नावे नोंदली आहेत त्यांनी या प्रकरणात आपण कधीही साक्षीदार नव्हतो आणि आमच्या नकळत आमची नावे साक्षीदार म्हणून नोंदली गेली आहेत असा खुलासा केला आहे. तपास अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक किंवा केवळ कामाच्या आळसातून किती लोकांच्या जीवनाचा नरक केला आले याचा विचार तरी करून बघा!
लष्करी सेवेतून सुभेदार पदावरून रिटायर्ड झालेल्या अधिकाऱ्याची ही अवस्था असेल तर निरक्षर, गरीब नागरिकांची NRC मुळे किती ससेहोलपट झाली असे
लष्करी सेवेतून सुभेदार पदावरून रिटायर्ड झालेल्या अधिकाऱ्याची ही अवस्था असेल तर
निरक्षर, गरीब नागरिकांची NRC मुळे किती ससेहोलपट झाली असेल याची आपण कल्पना तरी करू शकतो का?
जो पर्यंत सनाउल्लाह यांचे नाव NRC लिस्ट मधे येत नाही तो पर्यंत ते आणि त्यांची मुले घुसखोर समजले जातील.
सनाउल्लाह सुशिक्षित आहेत, त्यांच्याकडे हायकोर्टात जाण्याएवढा पैसा आहे
पण जे गरीब आहेत, निरक्षर आहेत ते हायकोर्टात दादू मागू शकणार नाहीत.
मोहम्मद सनाउल्लाह यांच्याविषयी बरीच माहिती गुगल सर्च मध्ये सापडेल. इंडिया टुडे, इंडियन एक्सप्रेस मध्ये त्यांच्यावर विशेष लेख आलेले आहेत.
जरा विचार करा. भविष्यात NRC महाराष्ट्रात लागू झाल्यास केवळ सरकारी कागदपत्रांची पूर्तता न करता आल्यामुळे अनेक गरीब, निरक्षर, भटके-विमुक्त या देशात घुसखोर ठरवले जातील. त्यातील जे हिंदू, बौद्ध, शीख, ख्रिश्चन असतील त्यांना डिटेन्शन कॅम्प मधे ६ वर्ष काढल्यानंतर नागरिकत्व मिळेल आणि जे मुस्लिम असतील त्यांना एक तर उर्वरित आयुष्य डिटेन्शन कॅम्प मधेच काढावे लागेल किंवा परागंदा व्हावे लागेल. तुम्हाला जर स्वतःवर केवळ कागदपत्रांच्या अभावी किंवा तपास अधिकाऱ्याच्या चुकीमुळे स्वतःच्याच देशात घुसखोर ठरवले जाऊ नये असे वाटत असेल तर, कोणावरही केवळ धर्मावरून कोणाचा छळ होऊ नये असे वाटत असेल तर #NRC आणि #CAB चा विरोध करा.
by Nitin Divekar
अवतार सिंह पाश…. सबसे ख़तरनाक होता हैं अपने सपनो का मर जाना..
महाश्वेता देवी, शोषित-उत्पीडित वंचिताच्या वेदनेचा आवाज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)