प्रधानमंत्री मोदी यांचा या महिन्यात अमेरिका दौऱ्याचा नियोजित कार्यक्रम आहे. यावेळी याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसी ची ‘भारत: मोदी प्रश्न’ ‘India: The Modi Question’ हि डॉक्युमेंटरी अमेरिकेत दाखवली जाणार आहे. सोमवारी, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना ह्यूमन राइट्स वॉचने हे जाहीर केले की, मोदींच्या दौर्याअगोदर ही BBC Documentary डॉक्युमेंटरी जाणीवपूर्वक दाखली जाणार आहे कारण या माहितीपटावर भारतात बंदी घातली गेली आहे याची आठवण करून देण्यासाठी ही बीबीसी ची डॉक्युमेंटरी अमेरिका मध्ये दाखवली जात आहे.प्रधानमंत्री मोदी यांच्या भेटीच्या आधी ह्यूमन राइट्स वॉच आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने 20 जून रोजी डॉक्युमेंटरी स्क्रीनिंग आयोजित केले आहे. खासदार, पत्रकार, विश्लेषकांना डॉक्युमेंटरी स्क्रीनिंगमध्ये आमंत्रित केले गेले आहे. प्रधानमंत्री मोदींची अमेरिकेची भेट 21 जूनपासून सुरू होणार आहे, जी 24 जूनपर्यंत चालणार आहे.
बीबीसी माहितीपट डॉक्युमेंटरी ही जानेवारी महिन्यात दोन भागात प्रसिद्ध करण्यात आली होती.
ही डॉक्युमेंटरी २००२ च्या गुजरात दंगलीवर आधारित आहे, असा आरोप करण्यात आला होता की गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी दंगली रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली नाहीत.ही डॉक्युमेंटरी प्रसिद्ध झाल्यावर देशात एकच खळबळ माजली होती.
दुसरीकडे भारत (भाजप) सरकारकडून या डॉक्युमेंटरीवर आक्षेप घेण्यात आले.डॉक्युमेंटरी मधिल काही गोष्टी योग्य पद्धतीने दर्शविल्या गेल्या नाहीत असे सांगत भारत सरकारने या माहितीपटांवर बंदी घातली होती. भारत सरकारचे म्हणणे आहे की हा फक्त एक प्रोपौगंडा आहे.त्यानंतर बीबीसीच्या दिल्लीततील कार्यलयावर इडी मार्फत धाडी टाकून त्यांच्यावर जरब बसविण्याच्या प्रयत्न करण्यात आला होता.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सुद्धा दाखवली गेली होती डॉक्युमेंटरी
मे महिन्यात जेव्हा प्रधानमंत्री मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर होते, तेव्हा ऑस्ट्रेलियन संसदेत बीबीसी माहितीपट दाखविण्यात आला होता.
स्क्रिनिंग दरम्यान, अनेक नेत्यांनी ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्री अँथोनी अल्बानीज यांनी भारतातील मानवी हक्कांच्या उल्लंघनांच्या आरोपावर चर्चा केली पाहिजे आणि प्रेसचे स्वातंत्र्य कमी करण्यात आल्याबद्दलही चर्चा करावी अशी संसदेत मागणी करण्यात आली होती.
अमेरिकेतील होणाऱ्या बीबीसी डॉक्युमेंटरी स्क्रिनिंग मुळे आता एक नविन प्रश्न निर्माण झाला आहे.
यावर बॅन करता येऊ शकतं का? असं उगाच एक मन म्हणत आहे. 😉 पण खरच ते आता शक्य आहे?
Biparjoy:’बिपरजॉय’ म्हणजे काय? वादळाना नाव कोण देतं? जाणून घ्या
जात चोरी : उपसंचालक डॉ जसवंत दहिया ला अटक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 14, JUN 2023, 14:40 PM
WebTitle – Modi’s US visit; BBC documentary to be screened