कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गुजरातची आरोग्य व्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची परिस्थिती आहे.अहमदाबाद, सूरत, राजकोट, भावनगर, जामनगर या जिल्ह्यांत स्मशानभूमीत मृतदेहांच्या रांगा लागल्या आहेत. परंतु असे असूनही सरकार कोरोनाने मृत्यू झालेल्यांची नेमकी आकडेवारी लपविण्याचा प्रयत्न करीत आहे.भाजपप्रणित नरेंद्र मोदींच्या उच्चन्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकारने सारवासारव केली.गुजरात राज्यात ४ हजार २१८ लोकांचा मृत्यू झाले असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
मात्र, एका गुजराती दैनिकाने केलेल्या मृत्यूंच्या पडताळणीतून हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे.गुजरातमध्ये दिवसाला १,७४४ लोकांचा मृत्यू होत असून, अवघ्या ७१ दिवसात १ लाख २३ हजारांहून अधिक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.सरकारकडून इतके मृत्यूप्रमाणपत्र वाटण्यात आले असले, तरी गुजरात राज्यात ४ हजार २१८ मृत्यू झाले असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
गुजराती दैनिक,दैनिक भास्करच्या वृत्तानुसार 1 मार्च 2021 ते 10 मे 2021 पर्यंत मृत्यू प्रमाणपत्र डेटाची छाननी केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. असे आढळून आले की 1 लाख 23 हजार 871 मृत्यू प्रमाणपत्रे अवघ्या 71 दिवसात राज्यातील 33 जिल्हे आणि 8 महानगरपालिकांनी जारी केली आहेत. याउलट सरकारी आकडेवारीत कोरोनामुळे गुजरात मध्ये मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या केवळ 4,218 असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत प्रश्न असा आहे की केवळ 71 दिवसांत सुमारे 1.25 लाख लोकांचा मृत्यू कसा झाला?
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने मृत्यू
मृत्यू प्रमाणपत्रांनुसार यंदा मार्च महिन्यात राज्यात 26,026, एप्रिलमध्ये 57,796 आणि मेच्या पहिल्या 10 दिवसांत 40,051 मृत्यू झाले. आता या आकडेवारीची तुलना 2020 च्या तुलनेत केल्यास मार्च 2020 मध्ये 23,352, एप्रिल 2020 मध्ये 21,591 आणि मे 2020 मध्ये 13,125 मृत्यूची नोंद झाली आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षाच्या 71 दिवसांत मरण पावलेल्या लोकांची संख्या दुपटीने वाढली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला निशाणा
या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. “हे भयंकर आहे!
७१ दिवसांत १.२३ लाख मृत्यू. दररोज १७,४४ मृत्यू.गुजरात मॉडेल नेहमीच माहिती लपवून ठेवत
आणि अहवालात छेडछाड करण्याचंच काम करते,” असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं आहे.
“कोरोनासुद्धा एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार” माजी मुख्यमंत्र्याची मुक्ताफळे
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)
First Published on MAY 15, 2021 13: 45 PM
WebTitle – Modi’s Gujarat hiding truth ! 1.25 lakh deaths in 71 days 2021-05-15