लोकसत्ता दैनिकाने दिलेल्या बातमी नुसार –
देशातील डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहिया यांनी प्रधानमंत्री नरेंद्र नरेंद्र मोदी कोरोना चे ‘सुपरस्प्रेडर’ असल्याचं म्हटलं आहे. देशामध्ये करोनाची दुसरी लाट आली असताना राजकीय सभा घेणे तसेच कुंभमेळ्यासारख्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सहमती दर्शवल्याने करोनाचा मोठ्याप्रमाणात प्रसार झाल्याने डॉ. नवज्योत यांनी मोदींना सुपर स्प्रेडर म्हटल्याचं, द ट्रेब्युन ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. सुपर स्प्रेडर म्हणजे अशी व्यक्ती जिच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना करोनाचा संसर्ग होतो.
“कोरोना विषाणूसंदर्भातील नियम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे यासाठी आरोग्य सेवेतील लोकं काम करत असतानाच दुसरीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रचार सभांना संबोधित करण्यासंदर्भातील निर्णय घेताना मागे पुढे पाहिले नाही. त्यांनी कोरोनासंदर्भातील सर्व नियम मोडले,” असं डॉ. नवज्योत म्हणाले आहेत.
देशामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारी २०२० मध्ये आढळून आला, असं सांगत डॉ. नवज्योत यांनी त्यावेळीही मोदींनी या विषयाकडे गांभीर्याने पाहिलं नाही असं म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार डॉ. नवज्योत यांनी, “देशातील पहिला रुग्ण जानेवारी २०२० मध्ये देशात आढळल्यानंतर मोदींनी यासंदर्भातील उपाययोजना करुन प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात काम करण्याऐवजी गुजरातमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांसाठी लाखो लोकांना एकत्र करुन सभा घेतली,” असं म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी हेच कोरोना चे सुपरस्प्रेडर देशातील अनेक शहरांमध्ये स्मशानभूमींबाहेर
अंत्यविधीसाठी लागलेल्या रांगा या कोरोना परिस्थितीची दाहकता दर्शवणाऱ्या आहेत,असंही डॉ. नवज्योत म्हणाले आहेत.
“शेतकरी आंदोलनासंदर्भातही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग्य ते निर्णय घेतले नाही.मोठ्या प्रमाणात आंदोलक शेतकऱ्यांना एकत्र येऊ दिलं.
प्रश्न सोडवण्यापेक्षा आंदोलन होऊ दिलं आणि त्या माध्यमातून कोरोनाचा धोका वाढला,” असं डॉ. नवज्योत म्हणाले.
बाबा राम देव यांच्या पतांजलीच्या औषधांना समर्थन देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावरही डॉ. नवज्योत यांनी टीका केली.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on APRIL 28, 2021 18 : 03 PM
WebTitle – modi is a super spreader of coronavirus says ima vice president 2021-04-28