मोबाईल हेरगिरी
■हे फारच भयंकर आणि थरारक आहे.■
ईजराईलमध्ये एक कंपनी आहे ASO Group म्हणून. ही एक सॉफ्टवेअर बनवणारी कंपनी आहे. यांनी एक Pegasus नावाचं स्पायवेयर बनवलं.
तुम्ही फोन फॉरमॅट केला किंवा अगदी फॅक्टरी रिसेट जरी केला तरी हा स्पायवेयर तुमच्या मोबाईलमधून जात नाही.
आता स्पायवेयर कसं काम करते ते बघू. तुमच्या स्मार्टफोन किंवा iफोनवर व्हिडिओ कॉल येतो किंवा मिसकॉल येतो. तुम्ही तो कॉल रिसिव्ह केला नाही तरी काही फरक पडत नाही. एकदा का असा मिसकॉल आला की मग या स्पायवेयरचं काम सुरू होतं. अँड्रॉइड फोनसाठी त्याचं नाव क्रायझर असं आहे. हा स्पायवेयर तुमच्या मोबाईल मध्ये घुसताच तो मोबाईलच्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये इन्स्टॉल होतो. आणि मग तुम्ही जी काही app चॅटिंग साठी वापरता त्यांचा वापर करून तो मोबाईल मधला संपूर्ण डेटा चोरतो.
हा स्पायवेयर सर्वच चॅटिंग app वापरू शकतो जसे की viber, फेसबुक मेसेंजर, व्हाट्सएप, टेलिग्राम इत्यादी. हा तुमचा डेटा एनक्रिप्ट करून तुमच्या मोबाईल मधलं इंटरनेट वापरून ज्याला तो डेटा हवा आहे त्याला पाठवतो. यासाठी तो अगदी कमी इंटरनेट वापरतो त्यामुळे तुम्हाला काहीच संशय येत नाही. हे स्पायवेयर इन्स्टॉल झाल्यावर तुम्ही कितीही शोध घेतला तरी ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दिसणार नाही कारण ते तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये इन्स्टॉल झालेलं असतं. तुम्ही फोन फॉरमॅट केला किंवा अगदी फॅक्टरी रिसेट जरी केला तरी हा स्पायवेयर तुमच्या मोबाईलमधून जात नाही.
मोबाईल हेरगिरी
जगभरातून 1400 मोबाईल हॅक केले गेले 2016 ते 2018 या कालखंडात ह्या स्पायवेयरने आणि भारतातील 17 मोबाईल फोन हॅक करण्यात आले होते. हे स्पायवेयर अतिशय महागडं आहे त्याची किंमत करोडोंच्या घरात आहे. एक मोबाईल फोन हॅक करण्यासाठी कमीतकमी 4 करोड किंमत मोजावी लागते. ASO कंपनी या स्पायवेयरला फक्त सरकारलाच विकते आणि ज्या सरकारनी हे विकत घेतलं त्यांची मिल्ट्री याचा वापर जासुसी आणि आतंकवादाशी लढण्यासाठी करते.
टोरंटो मधील एक संस्था citizen lab ही अशा प्रकारच्या डेटाचोरीवर आणि मानवाधिकार उल्लंघनावर लक्ष ठेवून असते. त्यांना हा प्रकार उघडकीस आला आणि त्यांनी भारतातील त्या 17 मोबाईल धारकांना याची सूचना दिली. त्यातल्या काहींनी मग व्हाट्सएपकडे तक्रार केली की तुमचं app वापरल्या मुळे डेटाचोरी होत आहे. व्हाट्सएपने तपास केला आणि मान्य केलं की असा प्रकार घडला आहे आणि डेटाचोरी झाली आहे. भारत सरकारने आता व्हाट्सएपला स्पष्टीकरण मागितलं आहे.
भारतातून जे 17 मोबाईल हॅक झाले त्यामध्ये एल्गार परिषदेचे काही सदस्य, वकील, मानवाधिकार कार्यकर्ते, समाजसेवक यांचा समावेश आहे.
आता प्रश्न असा निर्माण होतो की भारतात इतकं महागडं स्पायवेयर कोण विकत घेऊ शकतो ? आणि ASO ग्रुप म्हणतो की आम्ही हे स्पायवेयर इतर देशांच्या सरकार शिवाय कुणालाही विकत नाही. बरं भारतातल्या या 17 व्यक्तींची जासुसी करण्याची गरज कुणाला पडली ? ज्यांचं सर्वच काम सार्वजनिक आहे.
तर अशी ही तंत्रज्ञानाची जासुसी दुनिया आहे.
EVM याच्यासमोर अगदीच क्षुल्लक वस्तू आहे.
काळजी घ्या.
by Swapnil Khadse
हेही वाचा.. डिजिटल युगातली गुन्हेगारी आणि घ्यावयाची काळजी
हेही वाचा.. व्हाटसेप पॉलिसी: सोशल मिडिया एप्सवरील तुमचा डाटा सुरक्षित आहे का?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)