भारत नाना भालके
प्रिय नाना,
स.न.वि. वि..पत्रास करण की,
मला आजही आठवतंय नुकत्याच झालेल्या २००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एक मातब्बर नेते असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करून राज्याच्या राजकीय इतिहासात आपल्या नावाची नोंद केली होती, त्याच वेळी ध्यानीमनी नसतांना मा. माजी राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड यांनी शिफारस केल्याने आपला P. A. म्हणून माझी आपण निवड केली. वय लहान होतं अवघे २२ वर्ष, तरी पण आपण माझ्यावर महत्वाची जबाबदारी टाकली.
जास्त काम असतांना देखील आपण मला परीक्षेसाठी सुट्टी द्यायचा
आणि मी आपला P.A. म्हणून दि.०९/११/२००९ रोजी रुजू झालो.खरं तर मनावर दडपण होतं भीती वाटत होती एवढया मोठया व्यक्तीचं काम आपल्याला जमेल का म्हणून ? परंतु आपल्या स्वभावामुळे माझ्यावर आलेले दडपण गायब झालं.आपल्या बरोबर काम करत असतानाच मी कायद्याचं शिक्षण घेत होतो. मला शिकायला आपणच वेळ दिला होतात,काही वेळा तर परीक्षा ह्या नेमक्या अधिवेशनाच्या वेळेसच यायच्या , अधिवेशन काळात जास्त काम असतांना देखील आपण मला परीक्षेसाठी सुट्टी द्यायचा.
आपल्या मुलाच्या वयाचा असून सुद्धा आपण कधीही मला ऐकेरी नावाने हाक मारली नाही.आपल्या सोबत काम करतांना माझ्याकडून काही चुका व्ह्यायच्या त्यावर तुम्हीं रागवायचे परंतु हा राग कायम राहत नसायचा. मला आठवतंय एका वर्षी अर्थसंकल्प पुस्तिकेतील आपल्या मतदार संघातील कामाच्या तरतुदी पाहत असताना माझ्याकडून आकडेवारी चुकीची वाचली गेली हे तुमच्या लक्षात आलं ती आकडेवारी आपण बरोबर वाचलीत आणि मला म्हणालात,राहुल मी असाच साखर कारखाना काही चालवत नाही.
विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष
आपल्या बरोबर काम करत असताना ग्रामीण भागातील जनतेच्या नेमक्या अडचणी आणि त्यांच्या कामाची मला जाणीव झाली.
समाजाच्या वंचित घटकापर्यंत आपण पोहचला होतात, सर्व समाजातील लोकांना तुमचा आधार होता.
२००९ च्या निवडणुकीमध्ये मंगळवेढ्याच्या ३५ गावचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला होता
या निवडणुकीत आपण मंगवेढया च्या जनतेला पाणी देऊ हा शब्द दिला होता आणि हा शब्द पूर्ण करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करीत होता.
मंगळवेढ्याच्या जनतेला पाणी हे येणाऱ्या काही दिवसातच मिळेल अशी खात्री आहे.
हा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण विधिमंडळात तारांकित प्रश्न,लक्षवेधी सूचना अशा अनेक संसदीय आयुधांचा वापर केलात.
विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष असतांना राज्यातील ईतर भागातील सिंचन योजना मंजूर होत नसतांना महाराष्ट्राच्या राज्यपालांनी मंगळवेढ्याच्या उपसा जलसिंचन योजनेस मान्यता दिली.
विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष असतांना उर्वरीत महाराष्ट्रातील मान्यता दिलेली आपली ही योजना पहिलीच होती.
डोक्याला फेटा बांधायला आपण नसणार आहात
राज्यात सत्ता बदल झाल्याने ही योजना बंद होण्याच्या मार्गावर आली होती.
पण प्रसंगी आपण राज्यसरकाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाऊन याचिका दाखल केलीत
शेवटी न्यायालयाने सिंचन योजना सुरू करण्यासाठी सरकारला आदेश दिले.
आपण अगदी चिकाटीने शेवटपर्यंत पाठपुरावा केल्याने ही योजना लवकरच मार्गी लागेल.
जोपर्यंत मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न सुटत नाही तो पर्यंत डोक्याला फेटा बांधणार नाही अशी प्रतिज्ञा आपण केली होती.
येणाऱ्या काही दिवसात ही योजना पूर्ण होईल पण “डोक्याला फेटा बांधायला आपण नसणार आहात”नाना मला आठवतंय की, तुमच्या बरोबर काम करायच्या अगोदर मला लवकर जेवण करायची सवय नव्हती पण तुमच्या मुळे आजपर्यंत तीच सवय लागली. तुमचं म्हणणं असायचं की , दिवसभर आपण कामात असल्याने जेवायला वेळ मिळणार नाही त्यामुळे घराच्या बाहेर पडत असताना जेवून निघायचं.नाना, २०१२ ला मला शासकीय नोकरीचा कॉल आला होता त्यावेळेस मी शासकीय सेवा करण्यासाठी इच्छुक नव्हतो पण तुमच्या इच्छेखातर मी शासकीय सेवेत जायचा निर्णय घेतला.मी लवकर लग्न करावं ही आपली इच्छा होती आपण ही मुलगी बघण्यास पुढाकार घ्यायचे, तुम्हांला जर मुलगी पसंद असली तर मी पुढचे बघतो हा दिलासा आपण कायम देत गेलात. माझ्यावर मुलाप्रमाणेच आपलं कायम लक्ष असायचं नाना.
कोरोना काळात तब्येत चांगली नसताना सुद्धा मतदार संघातील कामे , साखर कारखान्याच्या कामासाठी आपण मुंबईला यायचे मी सांगितलं होतं नाना तब्येतीची काळजी घ्या , पण तुम्हीं बोलले “मला काय नाय होत.”उलट तुम्हींच अत्यावश्यक सेवेत आहात , तुमची काळजी घ्या. असं मला म्हणालात.आणि जे घडायला जे नको होतं तेच घडलं , कोरोना ने तुम्हांला शेवटी गाठलंच, त्यावर ही तुम्हीं नुकतीच मात करून घरी परतला होतात.परत काही वैद्यकीय अडचणीस्तव रुग्णालयात दाखल झालात, वाटलं होतं रुग्णालयातून परत घरी याल परंतु शेवटी काळाने घात घातलाच.
तुमच्या राहुल ला तुम्हीं कायमचं पोरकं करून गेलात.
भावपूर्ण आदरांजली नाना…..!
कळावे,
कायम आपलाच
तुमचा राहुल.
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)