मुंबई : (प्रतिनिधी) – कणकवली तालुक्यातील खारेपाटण दशक्रोशीत कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या खारेपाटण रामेश्वर नगर येथील कोविड केअर सेंटर ला देणगी करिता चिंचवली गावचे सुपुत्र तथा मुंबई येथील आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक, वृत्तपत्र लेखक, समिक्षक अन् सामाजिक कार्यकर्ते मिलिंद भिकाजी कांबळे चिंचवलकर यांनी दिलेली १०,०००/- रोख रुपये आर्थिक मदत पत्रकार संतोष पाटणकर यांनी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्याकडे सुपुर्द केली.
राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाने जनता त्रस्त आहे.त्यामुळे सरकारी यंत्रणांवर देखिल मोठ्याप्रमाणात ताण पडलेला पाहायला मिळत आहे.तसेच राज्यातील उद्योग धंदे बंद असल्याने सरकारी तिजोरीतही निधी जमा होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.अशातच कोविड बाधित रुग्णांसाठी कोरोना उपचार केंद्र चालवणे हे जिकिरीचे झाल्याचे दिसत आहे.त्यामुळे समाजातील जबाबदार आणि दानशूर व्यक्ती सामाजिक जबाबदारी निभावण्यास पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे.
यावेळी ग्रामविकास अधिकारी जि. सी. वेंगुर्लेकर, कोविड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजीत कदम, स्टाफ नर्स ईच्छा राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मिलिंद कांबळे चिंचवलकर यांनी कोरोनाच्या कार्यकाळात गेल्या दिड वर्षापासून काही जवळच्या मंडळींना आर्थिक मदत करत असून,
काही मंडळींना मनपाचे माजी कार्यकारी अभियंता संजयकुमार सुर्यवंशी,प्रविण मोहिते, कॅप्टन इंगळे, गौतम मोरे, संजय बेटकर अशा काही मान्यवर मंडळींच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य तसेच आमदार भाई गिरकर यांच्या माध्यमातून अन्न धान्यही मिळवून दिले आहे.
तर, काही मंडळींना ओळखीच्या माध्यमातून वैद्यकीय मदतही मिळवून दिली आहे.
त्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी अन् समाज भावना जपण्याचा प्रयत्न केला आहे.
खारेपाटण कोविड सेंटर ला देणगी स्वरूपात आर्थिक मदत केल्याबद्दल
खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी पत्रकार संतोष पाटणकर
तसेच सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चिंचवलकर यांचे आभार व्यक्त केले असून,
खारेपाटण ग्रामस्थांमध्येही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
डॉक्टर्समुळे कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणे झाले शक्य
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 05 , 2021 19 : 00 PM
WebTitle – Milind Chinchwalkar donates Rs. ten thousand to Kharepatan Covid Center 2021-07-05