मुंबई:गुढी पाडाव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची दादर,छत्रपती शिवाजी पार्क येथे सभा झाली.या सभेत त्यांनी मशिदीच्या भोंग्यासमोर मोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा (Hanuman chalisa ) म्हणा असे आवाहन मनसे कार्यकर्त्यांना केले होते.त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघाले आहे.मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न केला,त्यांना पोलिसांनी अटक केली.भोंगा प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजात आंबेडकर यांनी मनसेला थेट आव्हान दिले आहे.त्यावर आज मनसे ने प्रत्युत्तर दिले आहे.
मशीद भोंगा प्रकरणावर मनसे च्या भूमिकेवर सुजात आंबेडकर काय म्हणाले होते?
माझा तुमच्या वक्तव्याला शंभर टक्के पाठिंबा आहे…फक्त एक गोष्ट आहे.. तिकडे अमित ठाकरेंना हनुमान चाळीसा म्हणायला लावा.. मला एकही बहुजन पोरगा नकोय तिकडे..जी कुणी जात आहेत तिकडे हनुमान चालीसा म्हणायला.. त्यांनी टीशर्ट काढून जानवं दाखवा आतमध्ये.. मग हनुमान चालीसा म्हणा..मला एकही एक बहुजन माणूस तिथे नकोय तिकडे.
राज साहेबांना ही कळकळीची विनंती..तुम्ही शरद पवारांचा इंटरव्हू घ्या…
तुम्ही स्वतःचा उभा पक्ष भाड्यानं लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा..पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लिम दंगलीवर उभा नका करु,
एवढी कळकळीची विनंती आहे आणि महाराष्ट्र ऑथोरीटी, मुंबई ऑथोरीटी, महाराष्ट्र मुंबई पोलीस, या सगळ्यांना एवढं आव्हान देतो..
की तुमच्या सगळ्यांसमोर हे वक्तव्य केलंय त्यांनी! जर दंगल झाली, तर तुम्हाला माहितीये कुणाला पकडायचं..
असं सुजात आंबेडकर म्हणाले होते.
सुजात आंबेडकर याना शालिनी ठाकरेंचं उत्तर
मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray ) यांनी ट्वीट करत (Sujat Ambedkar) सुजात आंबेडकरांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. “मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है,” असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय “सुजात यांना कोणी मध्ये बोलायला सांगितलं आहे , तुमचे राजकारणातले वय काय, आपण कोणाबद्दल बोलतोय आणि काय बोलतोय याची तरी समज आली आहे का….?,” असंही शालिनी ठाकरे यांनी म्हटलंय.
मनसेला आणखी एक धक्का
मशिदीवरील भोंगा काढण्याच्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण आता तापू लागले असून.राज ठाकरेंच्या भूमिकेवरून पुण्यातील मनसे च्या मुस्लिम पदाधिका-यांमध्ये नाराजी पसरली.या पार्श्वभूमीवर मनसे मधील मुस्लिम कार्यकर्त्यांनी आता मनसे सोडण्याचा निर्णय घेतला.(MNS Muslim workers resign from Party) “राज साहेब आणि मनसेला शेवटचा जय महाराष्ट्र” असं म्हणत शहराचे उपाध्यक्ष अझरुद्दीन बाशीर सय्यद यांनीसुद्धा मनसेला शेवटचा जय महाराष्ट्र सांगून राजीनामा दिला आहे.यामुळे मनसेला मोठे खिंडार पडत चालले असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या ९ तारखेला ठाण्यात उत्तरसभा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.उद्याच्या उत्तर सभेत राजठाकरे काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
अमित ठाकरे याना हनुमान चालीसा म्हणायला सांगा – सुजात आंबेडकर
आर्यन खान:समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्या साक्षीदाराचा मृत्यू
द काश्मिर फाईल्स:भाजप देशाचे वातावरण बिघडवत आहे:शरद पवार
Bank frauds in india मागील सात वर्षात सर्वात मोठा घोटाळा
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on APR 08, 2022 13:05 PM
WebTitle – Masjid loudspeaker : MNS’s reply to Sujat Ambedkar