1. शिवसेना नेते प्रतापसरनाईक यांच्या घरावर ईडी चा छापा
( प्रतापसरनाईक ईडी छापा ) शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकल्याची माहिती मिळत आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांवर सकाळी छापा टाकण्यात आला आहे.सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली असून एकूण १० ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे. कारवाईचं नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत.ED raids residence offices of shivsena mla pratap sarnaik (प्रतापसरनाईक ईडी छापा )
2. लव्ह जिहादवरुन योगी सरकार पडले तोंडघशी?; SIT म्हणते, “ना धर्मांतराचे पुरावे,ना पैसे पुरवल्याचे”
देशभरात लव्ह जिहादच्या मुद्यावरून भाजपने वातावरण तापवले असताना एसआयटीने महत्वाचा खुलासा केल्याने या मुद्यावर आता भाजप तोंडघशी पडल्याचे दिसून येत आहे.लव्ह जिहाद प्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारनं नेमलेल्या एसआयटीच्या तपासात कोणतेही पुरावे आढळले नसल्याचं समोर आलं आहे.पोलीस उपअधीक्षक विकास पांडेय यांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली होती.
3. “३० हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद झाली तेव्हा अमित शाह झोपा काढत होते का?” ओवेसी यांचा सवाल
हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि एआयएमआयएममध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.एक डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. भाजपाने या निवडणुकींसाठी आपली संपूर्ण ताकद लावली आहे. भाजपाचे अनेक नेते या निवडणुकीसाठी प्रचारसभा घेत आहेत. तर दुसरीकडे;एआयएमआयएमनेही निवडणुकीचा प्रचार सुरु केला आहे. अशाच एका प्रचारसभेमध्ये भाजपाचा खासदार तेजस्वी सूर्या यांनी रोहिंग्यांच्या मुद्द्यावरुन केलेल्या आरोपांना ओवेसींनी उत्तर दिलं. “जर मतदार यादीमध्ये ३० हजार रोहिंग्यांची नोंद आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काय करत आहेत? ते झोपा काढत आहेत का? ३० ते ४० हजार रोहिग्यांची नोंद मतदार यादीमध्ये कशी झाली याकडे लक्ष देण्याचं काम त्यांचं नाही का? भाजपाचे दावे खरे असतील तर त्यांनी उद्या (मंगळवार) संध्याकाळपर्यंत अशा एक हजार नावांची तरी यादी द्यावी,” असं आव्हानच ओवेसींनी भाजापाच्या नेत्यांना केलं आहे.
4.महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी करू नये
‘महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी करू नये’ –
मुख्यमंत्र्यांचे आवाहन ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महापरिनिर्वाण दिनाला भीम अनुयायांनी
अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
यासंदर्भातील आढावा बैठक नुकतीच पार पडली.’महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व तयारी केली जाईल.
पण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अनुयायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
5. ‘योग्य वेळ आल्यावर मराठा आरक्षणावर बोलणार
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून योग्य वेळ आल्यावर भूमिका मांडेन
असे सूचक विधान भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
‘योग्य वेळ आल्यानंतर सरकारच्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सपाटून बोलणार आहे,’ असंही उदयनराजे भोसले म्हणाले.वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, असेही वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी नुकतेच केले होते.आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळाले पाहिजे या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.बांदा येथे त्यांनी मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष राजाराम सावंत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशीही अनौपचारिक गप्पा मारताना आपली भूमिका स्पष्ट केली.
6. उत्तर प्रदेशात सामूहिक धर्मांतरणाविरोधात कायदा, 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद
लव्ह जिहाद’ प्रकरणी कडक भूमिका घेणाऱ्या योगी सरकारने आता सामूहिक धर्मांतरणाविरोधातही कडक कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे.उत्तर प्रदेशात यासंदर्भातील नवीन कायदा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येणार आहे. सामूहिक धर्मांतरण प्रकरणात आरोपींना 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद या मसुद्यात करण्यात आली आहे. तसेच हा गुन्हा अजामीनपात्र असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. हे विधेयक लवकरच अधिवेशनात सादर केले जाईल.
7 सार्वजनिक शौचालयाची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू; तिघे जखमी
कुर्ला येथे मोडकळीस आलेल्या शौचालयाची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. तर तिघे जखमी झाले. द्रौपदी परशुराम रावले (५५) असे मृत महिलेचे नाव आहे. कुर्ला येथील नौपाडा बॉम्बे उत्कल समिती परिसरात ही घटना घडली. येथील शौचालये मोडकळीस आल्याने दुरुस्तीचे काम सुरू होते. पर्यायी व्यवस्था नसल्याने महिला याच शौचालयांचा वापर करत होत्या.सोमवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास नैसर्गिक विधीस आलेल्यांच्या अंगावर भिंत काेसळून चाैघे अडकले. स्थानिकांनी तिघांना बाहेर काढले. अग्निशमन दलाने दोन तासांच्या प्रयत्नानंतर रावले यांना बाहेर काढलेे. उपचारादरम्यान त्यांचा राजावाडी रुग्णालयात मृत्यू झाला.
8.तामिळनाडु, पाँडेचरीला चक्रीवादळाचा इशारा; विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले असून त्यामुळे तामिळनाडु, पॉडेचरी यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे रायलसीमा, तेलंगणासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी सकाळी पाँडेचरीपासून ६०० किमी तर चिन्न्ईपासून ६३० किमी दूर होते. मंगळवारी पहाटे त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवारी दुपारी त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल. २५ नोव्हेंबर रोजी ते कराईकल आणि ममालीपूरम दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम २६ नोव्हेंबरपर्यंत जाणवणार आहे.
9.अकोला जिल्ह्यातील ४६२ शाळा सुरू; सहा हजारांवर विद्यार्थ्यांची उपस्थिती!
शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सोमवारपासून नियमांचे पालन करीत, इयत्ता नववी, दहावी, अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी केवळ १० टक्केच विद्यार्थ्यांची उपस्थिती शाळांमध्ये दिसून आली. जिल्ह्यातील ५३८ शाळांपैकी सोमवारी ४६२ उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सोमवारी शाळांमध्ये ६ हजार ९५६ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली तर ४,२०० पैकी ३ हजार ५२९ शिक्षकांची उपस्थिती होती.
10.कोरोना उद्रेकामुळे पाकमधील शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद
पाकिस्तानमध्ये कोरोना उद्रेकामुळे सर्व शैक्षणिक संस्था २६ नोव्हेंबरपासून १० जानेवारीपर्यंत पुन्हा बंद करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. पाकिस्तानच्या शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच शाळा, महाविद्यालये उघडण्यात आली होती.पाकमध्ये मागील चोवीस तासांत कोरोनाचे २,७५६ नवे रुग्ण आढळले आहेत. याबरोबरच देशातील एकूण रुग्णांची संख्या ३,७६,९२९ झाली आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महामारीमुळे आणखी ३४ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ७.६९६ वर गेली आहे.
Jaaglyabharat_Top_10 नियमित अपडेट्स साठी
या लिंकवर क्लिक करून आपलं हक्काचं जागल्याभारत हे फेसबुक पेज लाईक करा,फॉलो करा, सी फर्स्ट करा
ताज्या घडामोडींसाठी jaaglyabharat.com हा ग्रुप जाईन करा
===========================================
News date 24 – NOV-2020
Thanks Team Jaaglyabharat