भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानविरुद्ध टी-20 विश्वचषक सामना सुरू होण्यापूर्वी ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ चळवळीसाठी गुडघ्यावर टेकून समर्थन दिले.त्यामुळे त्यांचे देशातही कौतुक झाले.सामान्यपणे कृष्णवर्णीय लोकांच्या समर्थनार्थ गुडघ्यावर बसून एक हात उंचावून माफी मागितली जाते.अशी एक सांकेतिक प्रथा अलिकडे सुरू झाली आहे.भारतीय क्रिकेट टीम ने हीच प्रथा जोपासली.मात्र या कृतीवर पत्रकार आणि समालोचक अँड्र्यू बोल्ट यांनी या कृतीला हास्यास्पद ठरवत भारतीय क्रिकेट संघाला खडे बोल सुनावत फटकारले आहे.यामुळे आता नवी चर्चा सुरू झाली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हीडिओत अँड्र्यू बोल्टने मायदेशात जात-संबंधित अत्याचारांविरुद्ध असे गुडघे का टेकले नाहीत म्हणून भारतीय संघाला फटकारले
ट्विटरवरील भारतीय त्यांच्या स्वतःच्या प्रतिक्रियांसह सदर व्हिडिओ रिट्विट करत आहेत
मागेही हार्दिक पंड्याने गुडघ्यावर बसून या मोहिमेला समर्थन दिले होते
नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२० मध्ये देखील भारतीय खेळाडू हार्दिक पंड्याने अर्धशतकानंतर गुडघ्यावर बसून या मोहिमेला समर्थन दिले होते. तेव्हाही लोकांनी त्याला प्रश्न विचारले होते.
अमेरिकेतून झाली होती मोहिमेला सुरुवात
अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांवर झालेल्या हल्ल्यानंतर, ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ या मोहिमेने जोर धरला होता.त्यानंतर ती जगभरात प्रसिद्ध झाली.जगभरातील महत्वाच्या प्रसिद्ध व्यक्ती खेळाडू यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवून आपली सॉलिडेरिटी दाखवत असतात.
अँड्र्यू बोल्ट यांनी भारतीय क्रिकेट संघाला खडे बोल सुनावत फटकारल्या नंतर तरी भारतीय क्रिकेट संघ भारतातील मानव निर्मित अमानवीय क्रूर अशा विषमतावादी जात व्यवस्थेवर काही भाष्य करणार का? हा प्रश्न लोक विचारू लागले आहेत.
जय भीम मुवी मधील प्रकाश राजच्या ‘झापड मारण्याच्या’ सीनने नवा वाद
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
किरण गोसावी चा अटक होण्यापूर्वी आला नवा व्हिडिओ
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; जामिनावर नवाब मलिकांची प्रतिक्रिया
आर्यन खान प्रकरण; वानखेडेंवर आरोप;पंच चा धक्कादायक गौप्यस्फोट!
फॅक्ट चेक : शाहरुख खानचे वडील स्वातंत्र्यसैनिक नव्हते का?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 03, 2021 18:55 PM
WebTitle – Make annihilation of the caste system in your country ; Andrew Bolt hit the Indian team on black lives matter racism