‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ मध्ये
शेड्युल कास्ट फेडरेशन एक घटक पक्ष होता.
गुजरात्यांना मुंबई हवी होती,मी काल रात्रभर विचार करत बसलो होतो.म्हणजे झोपच लागत नव्हती.हे लॉजिक मला समजतच नव्हतं.कारण भौगोलिकदृष्ट्या एकवेळ पालघर वसई बोईसर किंवा विरार सुद्धा विचार करण्यासारखं होतं.
ते मागितलं तर त्यात लॉजिक दिसून येतेय.पण मुंबई..?
मुंबईचा तसाही काहीच संबंध येत नव्हता.गुजरात कुठे तिकडं खोनपाड्यात अन मुंबई कुठे इकडे टोकावर.तरीही गुजरात्यांना मुंबईचं हवी असणे हा टोकाचा हट्ट होता.अरेरावी होती.
आणि ही अरेरावीची मस्ती माझ्या महाराष्ट्राने उतरवली.
वाईट याचं वाटतं की यासाठी एकदोन नाही तब्बल 105 लोकांना प्राण द्यावे लागले.आपल्या देशात कोणत्याही गोष्टीसाठी जीव जाईपर्यंत निर्णय घेतले जात नाहीत.हे दु:खद आहे.
मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असली तरी आजही गुजराती मुंबईकडे आदराने पाहत नाहीत.
“मुंबई तुमची भांडी,घासा आमची” ही वृत्ती आजही स्पष्ट दिसते.म्हणून राज्याला मदत करायचे नाकारत केंद्राला मदत केली जाते.कारण केंद्रात दोन गुजराती बसले आहेत.
आणि त्यांना महाराष्ट्राशी गद्दारी करणारे साथ देत आहेत.
त्यावेळीही स.का.पाटील सारखे काँग्रेसी नेते ज्यांनी निवडून येण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांकडे समर्थन देण्याची भिक मागितली होती.
असे नेते मराठी असूनही महाराष्ट्राशी बेईमानी करत होते.इतिहास तुमची नोंद घेतो तो असा.
स.का.पाटील यांनी चौपाटीवर सभा घेऊन प्रक्षोभक विधाने केली.पाटलांनी ‘पाच हजार वर्षांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही व मोरारजींनी ‘काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल’
यशवंतरावांनी नेहरू आणि महाराष्ट्र ह्यात मी नेहरूंच्या बाजूने उभा राहीन असे म्हटले होते.
आज भाजपचे नेते ही बेईमानी करताना दिसतात.महाराष्ट्रातील जनतेच्या तोंडाला पाने पुसून केंद्राला मदत करा म्हणून लोकांना आवाहन करतात.उद्या ते महाराष्ट्रात मत मागत फिरणार आहेत.
तेव्हा मत सुद्धा केंद्रातून मागा असे महाराष्ट्राने त्यांना ठणकावून सांगतिले पाहिजे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा देण्यासाठी प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांचे मित्र आणि भारताचे संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पत्र लिहिलं होतं.
महाराष्ट्राचा हा सुपुत्र एका क्षणात होकर देत चळवळीची धुरा सांभाळायला पुढे आला.
डॉ.बाबासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेक सभा घेतल्या आहेत.त्यांनी प्रबोधनकारांना शब्द दिला होता.माझा शेड्युल कास्ट फेडरेशन संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पाठीशी जिब्राल्टर सारखा उभा राहील.आणि तो शेवटपर्यंत राहिला.तो संयुक्त महाराष्ट्र मिळवूनच.
‘संयुक्त महाराष्ट्र समिती’तीत तो एक घटक पक्ष होता.हा इतिहास आजच्या तरुणांना माहित असावा.
याच एक कारण हेही.की आपण ज्या मातीत जन्माला येतो त्या मातीशी ईमान राखतो.
आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत आणि नंतर आम्ही महाराष्ट्रायीन आहोत.मराठी आहोत,आणि त्यानंतर शेवटी आमची जात धर्म.
त्यामुळे महाराष्ट्राशी बेईमानी करणाऱ्या कुणालाही आम्ही माफ करणार नाही.त्याला धडा शिकवूच. महाराष्ट्रासाठी आपण तेव्हाही बलिदान दिलेय वेळ येईल तेव्हाही देऊ.
प्रबोधनकार ठाकरे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,सेनापती बापट,एस.एम.जोशी,प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख,भाई उद्धवराव पाटील, दादासाहेब गायकवाड.आणि भैय्यासाहेब आंबेडकर हे चळवळीतील महत्त्वाचे नेते होते.
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस किंवा संयुक्त महाराष्ट्र दिन म्हणून १ मे, १९६० पासून साजरा करण्यात येऊ लागला.
संयुक्त महाराष्ट्र दिन च्या महाराष्ट्रातील तमाम बांधवांना हार्दिक शुभेच्छा
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on MAY 01, 2021 08: 35 AM
WebTitle – Maharashtra Day and Dr B R Ambedkar 2021-05-01