देहराडून, दि 16 : देशात करोनाचे रुग्णांची संख्या वाढत आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातही हरिद्वारमध्ये कुंभमेळा होत आहे. तिथेही करोनाचा संसर्ग वाढला आहे. अनेक साधू संत करोना बाधित झाले आहेत.आता निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे करोनाने निधन देहराडूनमधील हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे.
उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचं करोनामुळे निधन झालं. महामंडलेश्वर कपिल देव हे मध्य प्रदेशातील चित्रकूटचे होते. कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी ते हरिद्वारला गेले होते. कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांना देहराडूनच्या कैलाश हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. हॉस्पिटल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी त्यांचे निधन झाले. कुंभमेळ्यात कोरोनाने निधन होणारे कपिल देव हे पहिले मोठे संत आहेत.
हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे मोठ्याप्रमाणावर उल्लंघन झाले. हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे मोठ्याप्रमाणावर उल्लंघन झाले होते. मागील ७२ तासांमध्ये दीड हजारांहून अधिक पॉझिटिव्ह केसस केवळ हरिद्वार कुंभ मेळा परिसरातू समोर आल्या आहेत. शिवाय अनेकांचा मृत्यू देखील झालेला आहे. करोनाबाधितांची संख्या आता आणखी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.
स्वत: कोरोनातून बरे झालेल्या मुख्यमंत्र्यांची मुक्ताफळे
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत हे करोनामधून पूर्णपणे बरे झाले असून सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थिती लावू लागले.
त्यांनी या कुंभ कुंभमेळ्यात देखील हजेरी लावली होती.कुंभमेळ्याच्या व्यवस्थेवर गर्दीवर देश भरातून टीका झाल्यावर
माध्यमांशी बोलताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी मुक्ताफळे उधळली होती.
“महाकुंभ १२ वर्षातून एकदा येतो, दरवर्षी येत नाही. जत्रा दरवर्षी होतात आणि कुठेही होऊ शकतात.
मात्र कुंभ हा हरिद्वारमध्येच होतो आणि १२ वर्षातून एकदाच होतो.हरिद्वार, बनारस आणि उज्जैनमध्येच महाकुंभ होतो.
त्यामुळेच महाकुंभचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आलं पाहिजे,” असं मत रावत यांनी व्यक्त केलं होतं.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on APRIL 16, 2021 12: 11 PM
WebTitle – Mahamandaleshwar Kapil Dev of Nirvani Akhada has passed away at a hospital in Dehradun 2021-04-16