भारताचे पहिले कायदा मंत्री,ज्यांनी भारताचं संविधान लिहिलं इतकच नाहीतर याच संविधानाच्या आधारे भारतातील न्यायालये निर्णय घेत असतात,अशा न्यायालयात त्यांचाच फोटो/मूर्ती लावता येणार नाही.असा ठराव पास केला गेलाय.अजब आहे.पण हे भारतातील जळजळीत वास्तव आहे. मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधिल महात्मा गांधी आणि संत तिरुवल्लुवर यांच्या चित्रांव्यतिरिक्त इतर सर्व प्रतिमा आणि पुतळे न्यायालयाच्या आवारातून हटवण्यास सांगितले आहे. या निर्णयासह न्यायालयाने अलंदूर येथील संयुक्त न्यायालय संकुलातून भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा फोटो काढून टाकण्याच्या आपल्या पूर्वीच्या आदेशाचा संदर्भ दिला.मद्रास उच्च न्यायालयाचे हे परिपत्रक रजिस्ट्रार जनरल यांनी ७ जुलै रोजी सर्व जिल्हा न्यायालयांना पाठवले आहे.
काय आहे प्रकरण जाणून घेऊया
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मद्रास उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलने 7 जुलै 2023 रोजी कनिष्ठ न्यायालयांना एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात जुन्या आदेशांचा हवाला देत न्यायालयाच्या आवारात केवळ महात्मा गांधी आणि संत तिरुवल्लुवर यांचीच फोटो/छायाचित्रे लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.डॉ.आंबेडकर यांच्याशिवाय इतर सर्व चित्रे किंवा मूर्ती काढून टाकाव्यात असे आदेशात म्हटलं आहे. यासंदर्भात, डॉ.भीमराव आंबेडकर आणि असोसिएशनच्या ज्येष्ठ वकिलांच्या मंडळाने तसेच विविध बार असोसिएशनने न्यायालयाकडे परिसरात फोटो/ प्रतिमेचे अनावरण करण्यासाठी परवानगी मागितली होती. या मागणीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाने 11 एप्रिल 2023 रोजी बैठक घेतली. या बैठकीनंतर पूर्ण खंडपीठाने जुन्या आदेशांचा हवाला देत अशा सर्व मागण्या फेटाळून लावल्या. उच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की यापूर्वी 2008, 2010, 2011, 2013, 2019 आणि अलीकडे एप्रिल 2023 मध्येही अशाच बाबींचा विचार करण्यात आला होता.
जुन्या आदेशात काय आहे ? समजून घ्या
उच्च न्यायालयाकडून आपल्या परिपत्रकात एका जुन्या घटनेत राष्ट्रीय नेत्यांच्या पुतळ्यांची तोडफोड झाल्याच्या घटनांचा संदर्भ देण्यात आला आहे आणि त्यामुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. याशिवाय ठिकठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे अधोरेखित करण्यात आले. याच घटनेचा दाखला देत त्यावेळच्या जुन्या आदेशात 2010 साली न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालय तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधिल न्यायालयांमध्ये महात्मा गांधी आणि संत तिरुवल्लुवर यांच्या चित्रांव्यतिरिक्त इतर कुणाच्याही प्रतिमा आणि पुतळे न्यायालयाच्या आवारात लावता येणार नाहीत असे निर्णय घेतले होते.याच निर्णयाच्या आधारे आताही ही मागणी नाकारण्यात आलीय.
विशेष बाब ही की याच मद्रास न्यायालयाने आंबेडकर जयंती आणि मंदिर उत्सव एकत्र का करू शकत नाही? अशी विचारणा केली होती.
महात्मा गांधी बद्दल अनेकांना माहिती असेल तिरुवल्लुवर कोण आहे ? जाणून घेऊया
मद्रास न्यायालयाने कोर्टाच्या आवारात,कोर्ट रूममध्ये महात्मा गांधी आणि तिरुवल्लुवर यांचेच फोटो/प्रतिमा मूर्ती लावण्याचा निर्णय दिलाय,यात हे तिरुवल्लुवर कोण आहेत हे जाणून घेऊ. आम्ही गुगल केलं,विकिपीडिया मध्ये शोध घेतला असता.तिरुवल्लुवर हे एक तमिळ कवी आहेत असं म्हणतात.तसा उल्लेख आहे.परंतू त्यांचा जन्म कधी झाला? जन्म ठिकाण काय याबद्दल निश्चित माहिती मिळत नाही.
मराठी विकिपीडिया माहितीनुसार तिरुवल्लुवर म्हणजे वल्लुव जातीतील महापुरुष किंवा थोर भक्त.तिरुवल्लुवर यांनी तामिळ भाषेत तिरुक्कुरल नावाचा ग्रंथ तीन भागात लिहिला आहे,ज्यात पहिल्या भागात धर्म, दुसऱ्या भागात अर्थ आणि तिसऱ्या भागात काम असे वर्ण्य विषय आहेत. या ग्रंथात चतुर्विध पुरुषार्थापैकी पहिल्या तिहींवर काव्यमय वर्णन आहे. प्रथम धर्म्भाग म्हणून जो आहे, त्यात यति-जीवनावर असलेली प्रकरणे मोक्षासंबंधी आहेत, असेही कोणी म्हणतात.या ग्रंथाला फार मान आहे. याला ‘तामिळ वेद” म्हणतात.
इंग्रजी विकिपीडिया माहितीनुसार शैव तमिळ मजकूर तिरुवल्लुवा मालाईमध्ये वल्लुवरच्या आख्यायिकेचा सर्वात जुना शाब्दिक संदर्भ आहे, परंतु तो अप्रचलित आहे. या मजकुराने वसाहती युगात लक्ष वेधले कारण 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या भाष्यात त्याला “वल्लुवन” (वल्लुवर) असे संबोधले जाते. मूळ मजकूर संस्कृत साहित्याच्या संदर्भात कुरलशी संबंधित आहे. वल्लुवन चा जन्म त्याकाळच्या अस्पृश्य जातीत (तथाकथित खालच्या जातीत) झाला असे भाष्य या भाष्यात समाविष्ट आहे, परंतु काही लोकांच्या मते मूळ मजकुरात असे नाही. स्टुअर्ट ब्लॅकबर्न (इंग्रज साक्ष ग्राह्य धरायची?) च्या मते, हे भाष्य अतिरिक्त-मजकूर आणि शक्यतो मौखिक परंपरेवर आधारित असल्याचे दिसते. वल्लुवरांच्या जीवनाविषयीच्या कोणत्याही दंतकथांचे समर्थन करणारे इतर कोणतेही पूर्व-वसाहतपूर्व मजकूर स्रोत सापडत नाहीत. 19व्या शतकाच्या पूर्वार्धापासून, भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये वल्लुवरवर असंख्य दंतकथा प्रकाशित झाल्या.काही बुद्धीस्ट लोक तिरुवल्लुवर यांना बुद्धीस्ट तर काही ख्रिश्चनकडून त्यांना ख्रिस्ती असल्याचा देखील दावा करण्यात येतो.
आंबेडकरी म्हणवून घेणाऱ्या वकिलांसाठी हे एक मोठे चॅलेंज
किती भारी तर्क दिला जातोय,ज्यांनी कायदे बनवले ज्यांच्या कायद्याच्या घटनेच्या आधारे न्यायालये निर्णय घेतात
त्यांचाच फोटो.मूर्ती लावल्यावर म्हणे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.
आंबेडकरी म्हणवून घेणाऱ्या वकिलांसाठी हे एक मोठे चॅलेंज उभे ठाकले आहे.
खरंतर याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची गरज आहे.
राजस्थान कोर्टाचा बाहेर मनुचा पुतळा उभारण्यात आलाय,मध्यंतरी दोन भीमाच्या वाघीणींनी त्याला काळे फासले होते,
तेव्हाही मग अशाच प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता ना? मग तो पुतळा मात्र हटवलेला नाही.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 23,2023 | 23:24 PM
WebTitle – Madras Court: Dr. Ambedkar’s photo cannot be displayed in the court, only photos of Gandhi and Thiruvalluvar























































