स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देशातील नागरिकांना आंबेडकर जयंती आणि अन्य स्थानिक मंदिर उत्सव एकाच वेळी साजरे करता आले पाहिजेत, असे मत मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले.कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती टी राजा आणि न्यायमूर्ती डी भरत चक्रवर्ती यांच्या खंडपीठाने नागापट्टिनम जिल्ह्यात 14 एप्रिल रोजी या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्येच्या भीतीचा हवाला देऊन मोठा मेळावा घेण्यास मज्जाव करण्याच्या आदेशाची मागणी करणारी याचिका फेटाळताना हे निरीक्षण नोंदवले आहे.
मुख्य न्यायमूर्ती टी राजा आणि न्यायमूर्ती डी भरत चक्रवर्ती यांच्या खंडपीठाने नागापट्टिनम जिल्ह्यात
14 एप्रिल रोजी या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्येच्या भीतीचा हवाला देऊन
मोठा मेळावा घेण्यास मज्जाव करण्याच्या आदेशाची मागणी करणारी याचिका फेटाळताना हे निरीक्षण नोंदविले आहे.
“स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि एकाच वेळी गावात मंदिर उत्सव साजरा करू शकत नसू, तर लोक आपल्या देशाबद्दल काय विचार करतील?” असं मत न्यायालयाने मांडलं आहे.
लाईव लॉ या कायदेविषयक वृत्त माध्यमाच्या बातमी नुसार,याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितले की डिसेंबर 2021 मध्ये नागपट्टिनम येथील पट्टावर्ती गावात तथाकथित उच्च जातीतील हिंदू आणि अनुसूचित जाती समुदायामध्ये संघर्ष झाला होता, त्यानंतर त्यांनी स्थानिक बसस्थानकावर आंबेडकरांच्या प्रतिमेला आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच दिवशी गावात मंदिर उत्सव साजरा केला जात होता.
शुक्रवारी आंबेडकर जयंतीनिमित्त असाच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं याचिकाकर्त्याने म्हटलंय.
या याचिकेद्वारे त्यांनी न्यायालयाला विनंती केली की या परिसरात कोणताही मोठा मेळावा घेण्यास मनाई करण्याचे निर्देश जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात यावे.
मात्र, पोलीस पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.
दोन्ही कार्यक्रम शांततेत पार पडावेत यासाठी स्थानिक पोलिसांना तोंडी निर्देश दिले.
याचिकाकर्ते शिवप्रकाशम विरुद्ध जिल्हाधिकारी अशी ही याचिका असून
या प्रकरणाची सुनावणी प्रभारी मुख्य न्यायाधीश टी राजा आणि न्यायमूर्ती डी भरत चक्रवर्ती यांच्या बेंचसमोर सुरू होती.
अखिल भारतीय महिला संघ विरोध ; हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी भाग 4
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 13,2023 23:23 PM
WebTitle – Why can’t Ambedkar Jayanti and the temple festival be combined? Madras High Court