मधु कामरू डामोर ही आदिवासी महिला शेतकरी असून त्यांच्याकडे 5 बीघा जमीन (शेती) आहे.मुख्यतः शेतीच्या लागवडीमध्ये मका, गहू, मूग आणि भाज्या असतात. मधू यांची शेती कोरडवाहू होती त्यांनी पावसाळ्याच्या शेतीच्या उत्पन्नातून काही रक्कम वाचवून आपल्या शेतात बोअरवेल लावून आपली शेती बागायती केली.
मधुच्या कुटुंबात तिला 2 मुले आणि एक मुलगी आणि तिचा नवरा कामरू असे एकूण 5 लोक आहेत. त्याच्याकडे 2 शेळ्या , 2 बैल, 1 गाय, जनावरे आहेत.
आपल्या माताजी महिला सक्षम समूह आणि वाघधारा संस्था यांच्याशी असलेल्या संबंधाबद्दल मधु सांगतो ,की या महिला साक्षम समूहाची स्थापना 2018 मध्ये वागधारा संस्थेने केली.यामध्ये मी पण या सक्षम महीला समूह पदाधिकारी आहे.महीलांना स्वावलंबी,आत्मविश्वास निर्माण करुन सक्षम बनविण्यासाठी वाघधारा ने हा समूह तयार केला आणि महिला गटांना सेन्द्रीय शेती करावी म्हणून कार्यरत आहे.तसेच सरकारी योजनांचा लाभ घेऊन त्यांचे जीवन ध्येय आणि जीवनमान सुलभतेने व जीवन निर्वाह करण्यास सक्षम बनविणे हा प्रमुख उद्देश या समुहाचे आहेत..
सक्षम महीला समूहाच्या महिन्याच्या मासिक सभेत वाघधारा संस्थेचे क्षेत्रकार्यकर्ता छगनलाल निनामा यांनी महिलांना सांगितले की
सरकारी विविध योजना आणि पंचायत राजमध्ये आमची काय भूमिका आहे.
या महिला सक्षम समुहाच्या माध्यमातून आपला जीवनस्तर वाढवू शकतो तसेच वाघधाराचे मुख्य तीन बिंदू , खरी शेती, खरे बालपण, खरा स्वराज, या बद्दल निनामा यांनी माहीती दिली ,खरी शेती म्हणजे काय आणि आज शाश्वत सेंद्रिय शेती ,व देशी बियाणे (वाण) करण्याची गरज काय हे सांगितले तसेच गांडूळखत, दसपर्णी औषध ,कंपोस्टखत ,कसे तयार करायचे यांचे प्रशिक्षण छगनलाल निनामा व स्वराज मित्र परमेश्वर यांनी दिले प्रशिक्षण.
आणि झारा टँकसारख्या सक्षम गटाच्या सर्व महिलांसाठी गांडूळखत बेड्स आणि औषधे बनवण्याचे साधन विनामूल्य वितरीत केले गेले आहे जेणेकरून सर्व स्त्रिया स्वतःच घरात गांडूळ खत तयार करू शकतील आणि खऱ्या अर्थाने सेन्द्रीय शाश्वत शेतीच्या दिशेने पाऊल उचलू लागलो .
वाघाधारा संस्थेने सेन्द्रीय परसबाग तयार करण्यास मदत केली.
आम्ही आमच्या पोषण बागेत वांगे, टोमॅटो, काकडी, मिरची,दोडका, कारली,लवकी, कोथिंबीर, इत्यादी भाज्यांची बियाणे लागवड केली.
जून 2020 मध्ये खरीप हंगामात लागवड केली.
ऑगस्ट 2020 ते मार्च 2021 या काळात मी 25000 /- रुपये भाजीपाला विकला.
आणि 8 महिन्यांत मला बाजारातून कोणतीही भाजीपाला खरेदी करायची गरज भासली नाही.
आम्ही जवळपास 10000 / – रुपये वाचवले.
वाघधाराने मला माझ्या परहबागेसाठी मिरची चे बियाणे दीले .त्या बियाणाची लागवड करुन मला 30 किलो लाल मिरचीचे उत्पादन झाले . या मधील मी 20 लाल मिरची 280 रुपये / किलो दराने विकल्या, म्हणून मी 5600 / – रुपये मिळाले. वागधारा ने मला कांद्याचा बियाण परसबागेसाठी दीला तो 15/6 या भुक्षेत्रात लागवड केली आणि मला कांद्याचे 50 किलो उत्पादन झाले.आता वर्षभर कांदा विकत घ्यावा लागणार नाही कारण परसबागेने आमची गरजा पूर्ण केली..
वागाधारा संस्थेने स्थापन केलेल्या सक्षम महीला समुहाच्या मासिक सभेत मी नेहमी उपस्थित राहत असतो.
अशातच क्षेत्रकार्यकर्ता छगनलाल निनामा यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आणि त्यातील अर्जाची प्रक्रिया सांगितली.
आणि मी व माझे पती कामरू डामोर यांना छगनलाल यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात नेऊन माजे आणि माझ्या पतीचे जाँबकार्ड तयार करून दिले.
मनरेगामध्ये 97 काम मिळाले,आम्हाला ती ऑक्टोबर 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत मिळाली.
मला व माझ्या पतीला 180 / – रुपये प्रती दिवस मजूरी प्रमाणे 34930/- रक्कम मिळाली.
ही रक्कम माझ्या तीन मुलांच्या शिक्षणासाठी साठी आणि कुटुंबाची उदरनिर्वाह करण्यासाठी उपयुक्त ठरली!
या सेन्द्रीय परसबागेमुळे माझे बाजारपेठेतील अवलंबन कमी झाले.माझी आजीविका सुधारली या मध्ये वागधारा संस्थेचा आणि सक्षम महीला समूहाचा आभारी आहे.
आणि पुढे मी वाघधारा संस्थेच्या श्वाशवत कार्यात सहभागी होत राहू!
लेखन – विकास परसराम मेश्राम
कार्यक्रम अधिकारी खरी शेती
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
हे ही वाचा.. कांदा पिकाने आणले केसरबाई बामनिया च्या जिवनात आनंद अश्रू…
हे ही वाचा…समाजवादी अर्थव्यवस्था व कल्याणकरी राज्य संकल्पनेची पायमल्ली…
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on MAY 02, 2021 20:45 PM
WebTitle – Madhu Kamru Damor’s move towards self-reliance 2021-05-02