Letter To Babasaheb ✍️
Corona outbreak has affected a lot of things over the year, especially maintaining social distance has been a key factor to get less affected from it and reduce its spreading intensity.
As we know, #MahaparinirvanDin is one of the largest social events which happens in #Chaityabhoomi, Mumbai in which lakhs of people from all over the country visit the place to pay tribute to Dr. #Babasaheb #Ambedkar. In the current situation, it is not really advisable for people to travel in groups and pay a visit to Chaityabhoomi on 5-6th December in big groups. Hence as an alternative for this year, we can take up other local activities which will be productive as well as pay tribute to Babasaheb adhering to all the norms. This could include online programs, sessions, donations, etc.
Letter To Babasaheb
Also in addition to it, we can pay tribute without going by having Letter To Babasaheb initiative in which you can send your message in form of a postal letter to Chaityabhoomi’s address as mentioned in the photo which will act as a virtual tribute to Babasaheb. This can serve as a message to everyone that in spite of not visiting Chaityabhoomi physically this year still we tried to pay the tribute virtually and have not missed the legacy post-Mahaparinirvana.
So I urge all of you to write a small Letter to Babasaheb and send it over to Chaityabhoomi Memorial, Dadar, Mumbai- 400028. We have given notifications to Chaityabhoomi Committee as well as Dadar Post Office for this initiative. Also post the letter on social media with the #LetterToBabasaheb hashtag. If you like the concept, Do share this all over on social media.
#JayBhim!
Siddhartha Chabukswar
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासंबंधी
विनम्र आवाहन
—————————-
बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दरवर्षी 1 ते 6 डिसेंबर रोजी देशभरातुन लाखों भीम अनुयायी व जनता
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभुमी येथे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात.
यावर्षी कोरोना महामारीचे संकट आले आहे ते अद्याप टळले नाही,कोरोनावरची लस अद्याप आलेली नाही. आता दिवाळी नंतर देशातील विविध शहरात कोरोना रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत सुध्दा रुग्ण संख्येत वाढ होत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेवुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतातील तमाम भीम अनुयायांना व जनतेला खालीलप्रमाणे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
अभिवादन पोस्टकार्ड
1) भारतातील सर्व भीम अनुयायी व जनतेने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभुमी येथे न येता,आपल्या स्थानिक ठिकाणी असलेल्या ( उदा.शहर,गाव, वार्ड, परिसर,बुद्ध विहार, स्मारक इत्यादी) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व प्रत्येकाने घरातील फोटोला पुष्पहार अर्पण करुन, विनम्र अभिवादन करावे. या अभिवादनाचे फोटो सोशल मिडियावर, व्हाट्सअॅप ग्रुपवर पाठवावेत.
2) कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून स्थानिक ठिकाणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना, प्रत्येकाने शासनाच्या आदेशानुसार मास्क लावुन, फिजिकल डिस्टंसिंग च्या नियमांचे पालन करावयाचे आहे.
3) तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचे पोस्टकार्ड डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभुमी या पत्त्यावर पाठवावे.
चैत्यभूमी ची ट्रस्टी या नात्याने भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे निवडक वरिष्ठ पदाधिकारी व समता सैनिक दलाचे 100 निवडक सैनिक यांची पोलिस, प्रशासन यांच्या सोबत व्यवस्थेसाठी नेमणूक करण्यात येणार आहे.
तरी, भीम अनुयायांनी व जनतेने चैत्यभूमीमध्ये न येता, वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या स्थानिक ठिकाणी, घरीच अभिवादन करावे, ही नम्र विनंती .
जयभीम! नमो बुद्धाय!!
भारतीय बौद्ध महासभा
आपले धम्म बंधु,
भीमराव य आंबेडकर
राष्ट्रीय कार्याध्यक्ष,
भारतीय बौध्द महासभा व
राष्ट्रीय अध्यक्ष,
समता सैनिक दल, हेडक्वार्टर-चैत्यभुमी, मुंबई
जगदीश गवई,
राष्ट्रीय महासचिव,
भारतीय बौद्ध महासभा
एस. के. भंडारे,
राष्ट्रीय सचिव व स्टाफ आॅफीसर, समता सैनिक दल
एन. एम. आगाणे,
राष्ट्रीय सचिव व मुबई प्रदेश पालक मंत्री,
भारतीय बौध्द महासभा
भिकाजी कांबळे,
राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र राज्य पालक मंत्री,
भारतीय बौध्द महासभा
Do Share in all groups :
BY Siddhartha Chabukswar
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
Comments 1