युएस मधिल ,मैन राज्यातील एका उदारमतवादी कला महाविद्यालयात जातीय अत्याचार भेदभाव विरोधी आधारित कायदा पारित करण्यात आला आहे.याद्वारे आता जात-आधारित भेदभाव अन्याय अत्याचार यावर प्रतिबंधित लागू करण्यात आले आहेत. Colby महाविद्यालयाने मंगळवारी घोषित केले की आम्ही आमच्या भेदभाव धोरणामध्ये जातीची मुद्याची भर घातली आहे, “वर्णद्वेषाप्रमाणे, जातिवाद हा वंश-आधारित भेदभावाचाच एक प्रकार आहे, जिथे एखाद्याची कौटुंबिक पार्श्वभूमी जन्माच्या वेळी कोणत्या जातीशी संबंधित आहे हे ठरवते.”
जात व्यवस्था ही एखाद्या पिरामिड सारखी
जात व्यवस्था ही एखाद्या पिरामिडच्या रूपात असते, जे तथाकथित प्रबळ जातीतील किंवा पिरॅमिडच्या शीर्षस्थानी असतात, त्यांना पिढ्यान्पिढ्या मिळवलेल्या संपत्तीद्वारे प्रत्येक संधींमध्ये सर्वात अगोदर प्रवेश असतो.जसे आपण खाली जातो,तसे लक्षात येते की तथाकथित खालच्या जातीत याच संधी कमी होत जातात.विशेषत: आदिवासी (दक्षिण आशियातील आदिवासी) आणि दलित (जातिव्यवस्थेतील सर्वात जास्त शोषण करण्यात आलेला वर्ग ) हे इतर तथाकथित खालच्या जातीपेक्षाही खाली असल्याने त्यांना संधी अत्यल्प प्रमाणात मिळते.
महिला,जेंडर आणि लैंगिकता अभ्यासाच्या सहयोगी प्राध्यापक आणि विभागाच्या अध्यक्षा सोन्जा थॉमस यांनी या धोरण बदलाचे नेतृत्व केले.
“मला आशा आहे की हे इतर विद्यालयांसाठी हे आदर्श असेल,” त्या म्हणाल्या. “हा वादळी परिणाम असू शकतो.”
थॉमस म्हणाल्या की, भारतासारख्या देशामध्ये जाती-आधारित व्यवस्था पाहिली जाते,
ती “हिंदू धर्माशी जोडलेली ही एक विचित्र प्राचीन गोष्ट आहे” आणि ही धारणा एक “गैरसमज” आहे.
“जात आधारित भेदभाव धर्मांमध्ये होतो … आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर –
दक्षिण आशियाई अमेरिकन आणि इतर वंश दोन्ही मध्ये – उच्च शिक्षण घेताना होतो ” त्या पुढे म्हणाल्या.
उच्च देणाऱ्या अनेक शिक्षण संस्थांनी यासाठी आता धोरणे बनवली आहेत.
युएस मधिल विद्यापीठात जातीय अत्याचार विरोधी कायदा
जसे की कॅलिफोर्नियाच्या एका प्राध्यापकाला कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांना अधिक गुणांक देण्यास नकार दिल्याबद्दल निलंबित करण्यात आले तर वॉशिंग्टन विद्यापीठ ब्लॅक अॅफिनिटी हाऊसिंग प्रोग्रामला स्वतंत्र घरांची ऑफर देते जे “कृष्णवर्णीय आणि आफ्रिकन अमेरिकन लोकांची आणि संस्कृतीची विविधता साजरी करते.”
Colby हे मॅसेच्युसेट्समधील ब्रँडेईस विद्यापीठाच्या मागे नवीन गैर -भेदभाव धोरण लागू करणारे दुसरे महाविद्यालय आहे, ज्याने 2019 मध्ये विद्यापीठ धोरणात जातीव्यवस्थेच्या भेदभावावर बंदी घातली.
‘सफरचंद’ हे नाव आलं कुठून? जाणून घ्या,शब्दांचे प्रवास
व्लाद दी इम्पेलर : पराकोटीचा द्वेष करणारा शासक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 19, 2021 16 :16 PM
WebTitle – Law against caste-based discrimination in universities in the US