लातूर: लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मधिल ताडमुगली गावात (Tadmugli Village of Nilanga Taluka Latur) मागासवर्गीय समाजावर गेल्या तीन दिवसांपासून बहिष्कार घालण्यात आलाय,पोलिसांच्या मध्यस्थीतीने प्रकरण मिटल्याचा दावा केला जात आहे.मात्र घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला असला तरी अद्याप पोलिसांनी कुणावरही गुन्हा दाखल केलेला नाही अशी माहिती मिळत आहे.
एकेठिकाणी वाचलं की लातूर येथील मागासवर्गीय समाजावर बहिष्कार घालण्यात आलाय त्या घटनेतील पीडित समाज हा बौद्ध समाज आहे.या बौद्ध समाजातील एका तरुणाने मारुतीच्या मंदिरात जाऊन नारळ फोडला म्हणून त्यांच्यावर बहिष्कार घालण्यात आला आहे.त्यातील एक व्हिडीओ पाहण्यात आला.दोन स्त्रिया आहेत ज्या वृद्ध व्यक्तीला आर्जव करत आहेत,मदत मागत आहेत.हा वृद्ध व्यक्ती चक्कीवाला आहे असे समजते.
त्या दोन स्त्रिया त्याला दळण दळून देण्यासाठी विनंती करत आहेत.त्यातील एक स्त्री म्हणत आहे,आम्ही लांबूनच दर्शन घेतलेलं आहे.आम्ही आत नाही गेलो.चक्कीला म्हणतो मी तुम्हाला दळून दिले तर या दहा रुपयांसाठी मला गाव पन्नास हजार दंड करेल,तो कुठून भरू? स्त्री म्हणतेय दर्शन घेतले एवढाच गुन्हा झालाय आमचा.मिटिंग घ्या आम्ही पाया पडतो. तो वृद्ध म्हणत आहे की हे वर्षानू वर्षे सुरु आहे.तुमचे सासू सासरे मरून गेले.होळी असो कोणताही सण असो ते कधीच मंदिरात गेले नाहीत,पायरीला बसून त्यांनी तिथूनच लांबून दर्शन घेतलं आहे.(ही हिंदु धर्मातील धार्मिक परंपरा आहे अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा एक गुण आहे,दलित अस्पृश्य असल्याचा समाज आजही हिंदू धर्मातील व्यक्तीना वाटत असल्याने त्यांना आत प्रवेश नाही असा मुद्दा आहे) कायद्याने आणि संविधानात अशी अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे.
काही निरीक्षणे –
काही आंबेडकरी तरुण मंदिरात प्रवेश का केला म्हणून पीडित व्यक्तींना दोष देत आहेत.यात चुकीचं काही वाटत नाही.
तुम्हाला घाणीतून माणसात आणलं असताना तुम्ही पुन्हा घाणीत जाऊन
स्वतः:वर अशा गोष्टी ओढवून घेत आहात असे समजणे चुकीचे ठरत नाही.
परंतु मूलभूत मुद्दा हा आहे की इथं मानवी हक्काचं हनन झालेलं आहे.
त्यांना किराणा दळण पाणी नाकारणे शेतीतील मजुरीची कामे नाकारणे
हा मानवी हक्क नाकारणारा माणूसपण नाकारणारा गुन्हा आहे.
पुरोगामी महाराष्ट्र म्हणताना हे वास्तव नाकारून चालत नाही.२०२२ मध्ये असतानाही महाराष्ट्रातील काही गावात रानटी मध्ययुगीन कालखंडातील अस्पृश्यता पालन केले जात आहे.याबद्दल आधुनिक समाजाला शरम वाटली पाहिजे.मात्र याला आधार धर्म आणि धर्म व्यवस्थेला बळकट करणारी जात व्यवस्था असल्याने याकडे आजही फारसे गांभीर्याने पाहिले जाणार नाही.कारण जात व्यवस्थेनुसार आपली मानसिकता तशी बोथट बनलेली आहे.
पुरोगामी नेते,पुरोगामी संघटना यांच्याकडून अशा काही घटनांवर आता अलिकडे बोलणेच बंद झालेय असे दिसून येतेय.महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा अशा घटना घडल्या आहेत.पुरोगामी म्हणून निवडणुकीत मिरवणारे नेते आणि पुरोगामी संघटना तोंडात मिठाची गुळणी धरून बसल्याचे चित्र दिसून आलेले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील अशा जातीयवादी अत्याचाराच्या घटना थांबविण्याचे आव्हान आहे.
आजवर कोणत्याही घटनेत पुरोगामी संघटनांची पुढाकार घेऊन तो प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केलेला नाही.
यामुळे स्वतःला स्वयंघोषीत पुरोगामी असं बिरुद लावून मिरवून घेणाऱ्या समाजातील
वकील डॉक्टर नेते अभिनेते याना नैतिक अधिकार उरलेला नाही. हे या निमित्ताने पुन्हा एकदा ठळक झाले आहे.
Instagram कंपनी स्वतः म्हणतेय,Take a Break! जाणून घ्या कारण
बजेट 2022 सोप्या भाषेत:15 सर्वात मोठ्या गोष्टी माहित हव्या
पुष्पा बॉक्स ऑफिस कलेक्शन: चित्रपटाची हिंदी आवृत्ती 75 कोटीजवळ
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 05, 2022 15: 55 PM
WebTitle – Latur viral Video: Nilanga village Boycott on backward class community for entering in the temple