पुणे: बाबासाहेब पुरंदरे (बलवंत मोरेश्वर पुरंदरे) यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची बातमी माध्यमांतून प्रसारित होत आहे.पुरंदरे यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ते व्हेंटीलेटरवर असल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या काही आठवडाभरापासून बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वृद्धापकाळाने तसेच न्यूमोनिया झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी दिली आहे.पुरंदरे यांची प्रकृती अधिकच खालावली असल्याची माहिती मिळत आहे.
मात्र सोशल मिडियावर त्यांना काही अतिउत्साही लोक श्रद्धांजली वाहायला लागले आहेत.
त्यामुळे रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी एक प्रेसनोट काढून याबाबतीची अधिकृत माहिती प्रसारित केलेली आहे.
आदरणीय बाबासाहेब पुरंदरे हे वृद्धपकाळाने आणि न्यूमोनियाने रुग्णालयात उपचार घेत आहेत.सद्य स्थितीत त्यांची प्रकृती चिंताजनक आहे व त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.
ही बातमी संपादित करत असताना हिंदुस्तान टाइम्सची लेटेस्ट अपडेट आली.त्यांच्या मुलाच्या माहितीवरून “माझ्या वडिलांची प्रकृती सध्या नाजूक आहे डॉ धनंजय केळकर उपचारांवर देखरेख करत आहेत.आणि डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत,” असे अमृत पुरंदरे, त्यांचा मुलगा म्हणाला.
मात्र काही लोकांनी सोशल मिडियात ट्विटर सारख्या प्लॅटफॉर्म वर श्रद्धांजली सुद्धा वाहिली असल्याचे दिसून येत आहे.
रुग्णालयाची माहिती
बातमीची खातरजमा करण्यासाठी आम्ही रुग्णालयाशीच थेट संपर्क केला.020-40151000 या क्रमांकावर फोन करून माहिती घेतली असता,रुग्णालयाने अजून असे काही अधिकृतपणे जाहीर केले नसल्य
बाबासाहेब पुरंदरे यांनी 1985 मध्ये “जाणता राजा” नावाचे नाटक लिहिले आणि दिग्दर्शित केले, जे 200 हून अधिक कलाकारांनी वर्षभरात सादर केलेले, पाच भाषांमध्ये अनुवादित आणि अभिनय केलेले आणि महाराष्ट्र, गोवा, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे असे या नाटकाचे 1,250 हून अधिक प्रयोग करण्यात आले होते.
नवी अपडेट
सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे.
गया मध्ये नक्षलवाद्यांचे तांडव, एकाच कुटुंबातील चार जणांना फाशी
डॉ.कफील खान यांना क्लीनचिट मिळूनही सरकारी सेवेतून केले बडतर्फ
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
हे वाचा जय भीम चित्रपटातील ती केस कायद्याच्यादृष्टीने का महत्वाची जाणून घ्या
जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 15, 2021 01:15 AM
WebTitle – Latest news update given by Dinanath Mangeshkar Hospital about the health of Babasaheb Purandare