प्रती,
मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र राज्य
विषय- महा कुंभमेळा मधून परत येणाऱ्या व्यक्तीना लस टोचणे आणि चौदा दिवस सक्तीचे विलगीकरण करण्याबाबत
महोदय, महा कुंभमेळा मध्ये उत्तराखंड सरकारने हलगर्जीपणा केल्याचे देशासमोर आले आहे.या महाकुंभ मेळ्यामुळे अनेक साधू कोरोना बाधित झाल्याचे आपल्याला माहीत आहे.काही प्रमुख साधूंचा यात दुर्दैवाने मृत्यू देखील झालेला आहे.घटनेची गांभीर्यता पाहाता आणि तेथे जमलेले सुमारे वीस-पंचवीस लाख लोकांची संख्या विचारात घेता.कुंभमेळा हा उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरला आहे.या कुंभमेळ्या मुळे देशात कोरोनाचा प्रचंड मोठा विस्फोट होणार आहे हे सांगायला कुणीही शास्त्रज्ञ,जागतिक आरोग्य संघटना व डॉक्टरची सुद्धा गरज नाही,ज्याअर्थी महाराष्ट्रात 144 सेक्शन लागले गेले त्यावरुन संचार बंदी मुळे चार नागरिकांना एकत्र येण्यास संचार करण्यास जिथे मज्जाव आहे.त्याअर्थी एका विशिष्ट ठिकाणी शेकडा नाही हजार नाही तर लाखो लोकांना धर्माच्या नावाखाली जमवून एपेडेमीक डिसीज एक्टची सुद्धा धुळधाण उडवून देण्यात आल्याने देशावर मोठेच संकट उभे राहिले आहे.
निष्पाप नागरिकांचे प्राण वाचवणे ही आपली प्राथमिक जबाबदारी
यापासून देशातील इतर निष्पाप नागरिकांचे प्राण वाचवणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे.त्यामुळे महाराष्ट्रातून कुणी कुंभमेळ्यास गेले असल्यास किंवा तिकडून कुणी महाराष्ट्रात येणार असल्यास खबरदारीचा उपाय म्हणून अशा व्यक्तीस 14 दिवस सक्तीच्या घर विलगीकरणात ठेवून त्यांचे लसीकरण करणे हाच एकमेव उपाय याठिकाणी दिसतो आहे.अन्यथा अशा व्यक्ती अनेक नागरिकांना बाधित करू शकतात.याद्वारे नागरिकांना देखील आवाहन आहे की आपल्या ओळखीतील किंवा आजूबाजूला माहीत असणाऱ्या अशा व्यक्तींची माहिती आरोग्यकेंद्राकडे तातडीने कळवावी.एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य पार पाडावे.अनेक राज्यातील शेकडो धगधगणाऱ्या चितांचे व्हिडिओ हे हादरवणारे आहेत.धडकी भरवणारे आहेत.त्यामुळे आपण अशावेळी हलगर्जीपणा करून संकट ओढवून घेऊ नये.
अशा व्यक्तींना नागरिकांना देखील आवाहन आहे.आपण कुंभमेळ्यास उपस्थित राहिलात ही काही चुकीची गोष्ट नाही चुकीची वेळ आहे.त्यामुळे आपण मनात कोणत्याही भावना न ठेवता आपल्या देशासाठी देशप्रेम राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची भावना निर्माण करून स्वत:हून आरोग्यकेंद्रास माहिती द्यावी.आणि स्वत:च विलगीकरण करून देशाला संभाव्य संकटापासून वाचवावे.याशिवाय आपल्या प्रियजन घरातील इतर सदस्य यांनाही बाधा होणार नाही याची दक्षता घ्यावी.देशाचे हित आपल्या हाती आहे.आणि ते फक्त तुमच्या जबाबदार वागण्यातून कृतीतूनच साधले जाऊ शकते.
इतर तमाम नागरिकांना विनंती आहे.सरकारने दिलेले नियम पाळा.मास्क चा वापर करा.शारीरिक अंतर पाळा, बाहेर विनाकारण फिरू नका.लक्षणे दडवू नका.अंगावर काढू नका.आणि स्वत:चा जीव आणि आपल्या प्रियजनांचा जीव धोक्यात घालू नका.कोरोनापासून वाचण्यासाठी आपली सजगता हीच पहिली साधी सोपी लस आहे.
कळावे
मिलिंद धुमाळे
16-04-2021
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
First Published on APRIL 16, 2021 11: 10 PM
WebTitle – Kumbh Mela 2021- Open letter to Chief Minister Uddhav Thackeray 202104-16