उत्तरप्रदेश : यूपीमधील उन्नाव येथील भाजपचे माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर ला दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टातून दिलासा मिळाला आहे. २०१९ मध्ये झालेल्या एका अपघातात न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. कुलदीप सेंगरवर बलात्कार पीडितेवर कार चालवल्याचा आरोप होता. सध्या सेंगर बलात्कार आणि हत्येप्रकरणी तुरुंगात राहणार आहे.
हे प्रकरण 2019 चे आहे. उन्नाव बलात्कार पीडिता जेव्हा रायबरेलीला जात होती. त्यादरम्यान एका ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. गाडीत बलात्कार पीडितेसोबत तिची मावशी आणि वकीलही होते. पीडितेच्या मावशीचा या अपघातात मृत्यू झाला होता. तर पीडित महिला आणि वकील गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात कुलदीप सेंगर ने घडवून आणल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता
कुलदीप सेंगर ची पुराव्याअभावी दिल्लीच्या न्यायालयाने या कथित अपघात प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.
निकालात, न्यायालयाने म्हटले की, आरोपी कुलदीप सिंग सेंगर आणि इतर पाच आरोपींविरुद्ध
प्रथमदर्शनी असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत, जेणेकरून खटला पुढे चालवला जाऊ शकेल.
त्याचवेळी, न्यायालयाने ट्रकचा चालक आशिष कुमार पाल,विनोद मिश्रा, हरिपाल सिंग आणि नवीन सिंग या चार आरोपींवर आरोप निश्चित केले आहेत.
बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा
कुलदीपसिंग सेंगर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. उन्नाव पीडितेवर बलात्कार केल्याप्रकरणी
ट्रायल कोर्टाने कुलदीप सिंग सेंगरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
त्याचबरोबर पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी सेंगरला 10 वर्षांची शिक्षाही झाली आहे.
4 वेळा आमदार राहिलेल्या कुलदीप सिंह सेंगरवर 2017 मध्ये उन्नावमध्ये बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात कोर्टाने कलम ३७६ आणि पॉक्सो कलम ६ अंतर्गत दोषी ठरवले होते. सेंगरवर बलात्कार तसेच पीडितेची आणि तिच्या कुटुंबातील तीन सदस्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. सेंगरवर ज्या वेळी बलात्काराचा आरोप झाला, त्या वेळी सेंगर भाजपमध्ये होता. मात्र, या गंभीर आरोपानंतर राजकीय वातावरण तापू लागल्याने नाईलाजाने भाजपने सेंगर यांची पक्षातून हकालपट्टी केली. कुलदीप सिंह सेंगर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चा स्वयंसेवक असल्याचेही समोर आले होते.
भाजपकडून बलात्कारी नेत्याचा झाला होता बचाव
बलियाच्या बैरिया येथील भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी कुलदीप सिंह सेंगरच्या बचावासाठी वादग्रस्त विधान केले आहे. सुरेंद्र सिंह म्हणतात, तीन मुलांच्या आईवर कोणी बलात्कार करेल का ? असा संतापजनक प्रश्न विचारून भाजपची विचारसरणी जाहीर केली होती.कुलदीप सेगर यांच्याविरोधात षडयंत्र रचण्यात आल्याचे आमदार म्हणाले. आमदार सुरेंद्र म्हणाले की, तिच्या (पीडितेच्या) वडिलांना काही लोकांनी मारहाण केली असावी, पण मी बलात्काराच्या आरोपावर विश्वास ठेवत नाही.असे तारे सुद्धा तोडून बचाव करण्यात आला होता.
अखेर गुन्हेगार कुलदीप सिंग सेंगर ला शिक्षा झाली.
जेम्स वेब दुर्बीण (स्पेस टेलिस्कोप ) इतिहासाचे साक्षीदार बना
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 21, 2021 12: 37 PM
WebTitle – Kuldeep Singh Sengar acquitted in Unnao rape victim’s accident case