पोहाळे-कोल्हापूर : (प्रतिनिधी) / कोल्हापूर जिल्हयातील पोहाळे येथील बौद्ध लेणी वर कल्याणमैत्री पौर्णिमा साजरी करण्यात आली. प्रत्येक पौर्णिमेला बौद्ध धर्मीयात विशेष असे महत्व आहे. पौर्णिमाना मागे पूढे विशिष्ट नावे देऊन आणि त्यामागे काल्पनिक भाकडकथा आणि अंद्धश्रद्धेचा लेप देऊन बौद्ध-बहुजनांच्या माथी आजतागायत मारल्या गेल्या आहेत.
कल्याणमैत्री पौर्णिमा सोहळा
पौर्णिमा सोहळ्याचे झालेले दैवतीकरण आणि ब्राह्मणीकरण लक्षात घेऊन त्या पौर्णिमा पूर्ववत बौध्द परंपरेनुसार साजऱ्या व्हाव्यात यासाठी युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य या बौध्द धम्म संस्थेने पौर्णिमांचे बौद्धीकरण करण्यासाठी “कल्याणमैत्री पौर्णिमा सोहळा” या नावाने गावोगावी साजरी करायला सुरूवात केली आहे. विहारात साजरा होणारा हा उत्सव लेणीपर्यंत जाऊन पोहचला आहे. रविवार दि. ०४/०६/२०२३ रोजी पन्हाळा तालुक्यातील पोहाळे लेणीवर हा सोहळा साजरा करण्यात आला.
प्रत्येक पौर्णिमेला गावोगावची बौद्ध विहारे आणि लेण्या नटल्या पाहिजेत
दीपोत्सव, बुध्द वंदना, लेणी अभ्यास आणि धम्मचर्चा असे याचे स्वरूप होते. प्रत्येक पौर्णिमेला गावोगावची बौद्ध विहारे
आणि लेण्या नटल्या पाहिजेत हा उद्देश घेऊन या कृती कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आलेली आहे.
कोल्हापूर येथील पोहाळे लेणी ही प्राचीन कालीन व्यापारी मार्गावरील बौद्ध परंपरेतील थेरवादी लेणी आहे.
ईथे बुद्ध मूर्ती, शिलालेख, शिल्प आदी वैशिष्ट्ये पहायला मिळत नाहीत, पण लेणीचा दगड,
पूर्वेकडील तोंड, स्तूप, संघाराम, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत (पोडी), सभागृह, सभागृहातील अष्टकोनी स्तंभ,
सभागृहाची रचना, आजूबाजूचा निसर्ग आणि लोक विविधता, लेणीसमोरील प्रांगण इत्यादि सगळी वैशिष्ट्ये ही बौध्द परंपरेची आहेत.
राजपत्रात पोहाळे लेणीची नोंद “बौद्ध लेणी” म्हणून उल्लेख
कल्याणमैत्री पौर्णिमा सोहळा साजरा करण्यात आलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजपत्रात या पोहाळे लेणीची नोंद “बौद्ध लेणी” म्हणून करण्यात आली आहे. त्यामुळे ही लेणी जागतिक स्तरावर महत्वपूर्ण ठरते.ही पौर्णिमा साजरी करण्यासाठी आयु. प्रा. डॉ. विशाल वाघमारे, आयु. मोहिंदर लीगाडे, आयुनी. सुकन्या लिगाडे कोल्हापूर, आयु. श्री चंद्रकांत कांबळे धामोड, आयु. वैभव शैलेश कांबळे जैनाळ, आयु. विजय कांबळे, आयुनी. स्वाती कांबळे, आयु. वेदांत कांबळे, आयुनी. वेदिका कांबळे पाचगाव आणि आयु. डॉ. संतोष भोसले वारणानगर यांची महत्वपूर्ण उपस्थीती होती.
वर्षावास अन गुरू पौर्णिमा म्हणजे काय?
व्लाद दी इम्पेलर : पराकोटीचा द्वेष करणारा शासक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 10, JUN 2023, 19:02 PM
WebTitle – Kalyan Maitri Purnima was celebrated with enthusiasm at Pohale Caves Kolhapur