जोगेंद्रनाथ मंडल यांचा जन्म २९ जानेवारी १९०४ रोजी बंगाल प्रांतातील बारिसाल जिल्ह्यातील मैस्तरकंदी या खेड्यात नामशूद्र या जातीत झाला.त्या गावच्या शाळेत जोगेंद्रनाथ हे एकमेव अस्पृश्य विद्यार्थी होते.१९२४ साली अंकगणित आणि संस्कृत विषय घेऊन जोगेंद्रनाथ उच्च माध्यमिक परीक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले.यथावकाश बारिसाल येथील बी.एम.काॅलेजमधून ते बी.ए.झाले व नंतर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मिळेल ती नौकरी करून कोलकाता विद्यापीठातून त्यानी कायद्याची पदवी घेतली व बारिसाल येथील जिल्हा कोर्टात त्यानी वकिलीचा व्यवसाय सुरू केला.१९३६ मध्ये ते बारिसाल लोकल बोर्डाचे सदस्य म्हणून निवडूण आले.ही त्यांच्या सार्वजनिक आयुष्याची सुरवात होती.
विविध प्रांतातील पुढारी बाबासाहेबांकडे आकर्षित झाले होते
१९३५ च्या भारत सरकार कायद्याने प्रांताना स्वायत्तता दिली होती.याचा एक भाग म्हणून झालेल्या प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीत बाकडगंज या खुल्या मतदारसंघातून त्यानी निवडणूक लढविली व ते प्रचंड बहुमताने निवडूण आले.ही एक अभूतपूर्व अशी घटना होती.एक अस्पृश्य उमेदवार खुल्या मतदारसंघातून प्रचंड बहुमताने निवडूण आलेला होता.
१९३२ साली झालेल्या पुणे करारामुळे बाबासाहेबांचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर गेले होते.जोगेंद्रनाथ मंडल यांच्यासारखे विविध प्रांतातील पुढारी बाबासाहेबांकडे आकर्षित झाले होते.बाबासाहेबाना राष्ट्रीय पातळीवर दलितांचा पक्ष स्थापण करावयाचा होता.त्यासाठी त्यानी मार्च १९४२ मध्ये दिल्ली येथे एक बैठक आयोजित केली होती.या बैठकीला वेगवेगळ्या प्रांतातील दलित नेते हजर होते.
अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन
बंगाल मधून जोगेंद्रनाथ मंडल व आर.एल.विश्वास, पंजाबमधून गोपालसिंग,
मध्य प्रांतातून रावसाहेब शामलाल धोबी,मद्रास प्रांतातून एन.शिवराज व रावबहादूर एम.सी. राजा.ई.
जुलै १९४२ मध्ये बाबासाहेबानी नागपूर येथे अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन ह्या पक्षाची स्थापना केली.एन.शिवराज हे या पक्षाचे पहिले अध्यक्ष होते.मंडल यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष बंगाल प्रातांत झपाट्याने वाढला.या पक्षाचे ख्वाजा नजीमुद्दिन हे बंगाल प्रातांतील सरकारमध्ये १९४३ मध्ये मंत्री होते.
१९४६ साली स्वातंत्र्याचा लढा गतिमान झाला.त्याच बरोबर देशात प्रांतिक व मध्यवर्ती कायदेमंडळाच्या निवडणुका झाल्या.
दुर्दैवाने या निवडणुकीत शे.का.फे.ला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
फक्त बंगाल प्रांतातून जोगेंद्रनाथ मंडल निवडून आले.बाबासाहेबानी ही निवडणुक लढविली नव्हती.
बाबासाहेबाना संविधान समितीवर निवडून आणण्यात यशस्वी
कॅबिनेट मिशन योजनेप्रमाणे देशात मध्यवर्ती सरकार बनविण्यात आले.यात फक्त काँग्रेस व मुस्लीम लीगचे प्रतिनिधी होते.अस्पृश्य-दलित समाजाचा कोणीच विचार केला नाही. काँग्रेसने जगजीवनराम याना मंत्रीपद दिले.त्याना शह देण्यासाठी बॅरिस्टर जीनानी मंडल याना मंत्रिपद दिले.या संदर्भातील अतिशय महत्त्वाची घटना म्हणजे घटना समितीची निवडणुक.बाबासाहेबांसारखा घटनेचा अभ्यासक आणि दलितांच्या उद्धाराची तळमळ असलेला नेता घटनासमितीत निवडूण जाणे आवश्यक होते.
मात्र काँग्रेसने बाबासाहेबांसाठी संविधान सभेची दारे-खिडक्या इतकेच काय पण तावदाने सुध्दा बंद केली होती.बाबासाहेब मुंबई प्रांतातून संविधान सभेवर निवडूण जाणे शक्य नव्हते.अशावेळी त्याना बंगाल मधून निवडूण आणण्याची व संविधान सभेत पाठवण्याची अवघड जबाबदारी जोगेंद्रनाथ मंडल यानी स्वीकारली बंगाल विधानसभेद्वारे संविधान समितीच्या प्रतिनिधित्वासाठी १७ जुलै १९४६ ला झालेल्या निवडणुकीत मंडल यानी सर्व विरोधी शक्तीना शह दिला व बाबासाहेबाना पहिल्या क्रमांकाची आवश्यक मते मिळवून देण्यात व त्याना संविधान समितीवर निवडूण आणण्यात ते यशस्वी झाले.
प्रथम क्रंमाकाच्या पाच मताची गरज असताना त्यानी काँग्रेसच्या चार आमदारांची मते फोडण्यात मंडल याना यश आले.
थोडक्यात मंडल यानी घेतलेल्या अविश्रांत परिश्रमामुळे बाबासाहेब संविधान सभेवर निवडून गेले.
अशा या महान व्यक्तिमत्वाचा आज स्मृतिदिन. विनम्र अभिवादन.
हे ही वाचा.. डॉ.आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा स्थापन करणारा मराठा
दुर्गाबाई भागवत यांच्या वेश्यासंबंधीत मतावर समाचार घेणारे राजा ढाले
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 05, 2021 19 :30 PM
WebTitle – Jogendranath Mandal: who sent ambedkar to the Constitution Committee